दक्षता ब्युरोच्या अधिकाऱ्याचे सोंग घेऊन, पंजाब पोलिसात नोकरी मिळवून देण्याच्या आमिषाने दोन बहिणींना ४.२५ लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या माजी सैनिक जसबीर सिंगच्या अटकेमुळे राज्यातील महिलांच्या खाकी परिधान करण्याच्या उत्सुकतेवर प्रकाश टाकला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अधिकृत नोंदीनुसार ८,४९५ महिला या ७३ हजार ७९७ पुरुष पंजाब पोलिसांसह काम करत आहेत; ज्यामध्ये दोन महिला डीजीपी अधिकारी, अनेक एडीजीपी, डीआयजी, तसेच एसएसपी अधिकाऱ्यांसह हेड कॉन्स्टेबल आणि कॉन्स्टेबल यांचा समावेश आहे. राज्यातील एकूण पोलिसांच्या संख्येचा विचार करता, त्यामध्ये ११.५ टक्के महिला कर्मचाऱ्यांचा वाटा आहे.

कायदा आणि सुव्यवस्थेसाठी पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून महिला पोलिसदेखील धडाडीने काम करत आहेत. पंजाब पोलिसमध्ये २२ महिला भारतीय पोलिस सेवेतील (IPS) अधिकारी, ४९ राज्य पोलिस सेवेतील अधिकारी, १९३ निरीक्षक, ४६८ उपनिरीक्षक, ४१९ सहाय्यक उपनिरीक्षक, ७२० हेड कॉन्स्टेबल आणि ६,६२२ कॉन्स्टेबल आहेत; ज्या प्रत्येक प्रकारचे कर्तव्य मेहनतीने पार पाडत आहेत.

हेही वाचा : इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी दिली ‘पॉवर ड्रेसिंग’ला नवी ओळख; सर्वत्र होते ‘अरमानी’ची चर्चा, पाहा

मागील वर्षी नोव्हेंबरमध्ये प्रथमच पंजाब राज्यातील चार महिला दल पंजाब बाहेर मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये निवडणुकीसंदर्भातील कामगिरी पार पाडण्यासाठी गेले होते.

पंजाबच्या २५० सशस्त्र महिला पोलिसांच्या तुकडीचे सहाय्यक महानिरीक्षक, ऑलिंपियन अवनीत कौर सिद्धू यांच्या नेतृत्वाखाली केलेल्या उल्लेखनीय कामगिरीचे स्थानिक पोलिसांनी भरभरून कौतुक केले होते.

“पुरुष पोलिस करू शकतात, मात्र महिला पोलिस करू शकत नाहीत अशी कोणतीही गोष्ट नाही. या महिला कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस स्टेशनमधील त्यांच्या नेमणुकीवरून सर्व कर्तव्ये पार पाडत आहेत”, असे पंजाब स्पेशल डीजीपी अर्पित शुक्ला यांनी म्हटले आहे.

“राज्य पोलिस दलात भरती होण्यासाठी महिला प्रचंड उत्सुक असतात. याची प्रचिती नोकरीची भरती कारण्यादरम्यान येते. जाहिरातीत दिलेल्या पदसंख्येपेक्षा कितीतरी मोठ्या संख्येने त्यांचे अर्ज आलेले असतात”, असे पुढे शुक्ला म्हणतात.

हेही वाचा : जुने भंगार, फर्निचर विकून कसा निर्माण केला मॉलीने लाखो रुपयांचा व्यवसाय? जाणून घ्या

विविध कामांसाठी पंजाब पोलिसांत अनेक महिला कर्मचारी तैनात असून, त्यामध्ये दोन महिला आयपीएस अधिकारी, डीजीपी म्हणून कार्यरत असून, सात महिला आयपीएस अधिकारी पंजाब जिल्ह्याचे पोलिस प्रमुख म्हणून काम करत आहेत.

दोन डीजीपी पदाच्या महिला अधिकाऱ्यांमधील गुरप्रीत कौर देव यांच्याकडे सामुदायिक व्यवहार विभाग आणि महिला व्यवहार विभाग असून, शशी प्रभा द्विवेदी, रेल्वेमधील विशेष डीजीपी आहेत.

तर, अश्विनी गोट्याल (बाटला-Batala), वत्सला गुप्ता (कपूरथळा), डॉ. सिमरत कौर (मालेरकोटला), रवज्योत ग्रेवाल (फतेहगढ साहिब), अमनीत कोंडल (खन्ना), सौम्या मिश्रा (फिरोजपूर) आणि डॉ. प्रज्ञा जैन (फाजिल्का) या सात महिला आयपीएस अधिकारी, वरिष्ठ पोलिस अधीक्षक (ASP) म्हणून कार्यरत आहेत.

आणि शेवटी पंजाबमधील ADGP रँकच्या आयपीएस अधिकारी या पुढील पदांवर काम करत आहेत; व्ही. नीरजा (सायबर क्राईम), विभू राज इन्व्हेस्टिगेशन लोकपाल डीजीपी आणि अनिता पुंज (एडीजीपी-कम-संचालक पीपीए, फिल्लौर) अशी माहिती द इंडियन एक्स्प्रेसच्या एका लेखावरून समजते.

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Woman in punjab are very eager to get job in police department how many female officers are there in state in marathi chdc dha