Success Story of Neetu Singh: शिक्षणाच्या जोरावर व्यक्ती जगातील सर्व काही मिळवू शकतो, साध्य करू शकतो. मात्र, अनेकांना शिक्षण घेण्यासाठी वर्षानुवर्षे संघर्ष करावा लागतो. परिस्थितीशी झगडत आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी लढावे लागते. प्रसिद्ध इंग्रजी शिक्षिका नीतू सिंग यांचीही अशीच कहाणी आहे. अगदी लहान वयातच वडिलांचे छत्र हरपले, मात्र यानंतर खचून न जाता त्यांनी शिक्षणाच्या जोरावर समाजात आपले नाव रोशन केले.

वडिलांच्या निधनानंतर समाजातील लोकांनी त्यांना मुलींच्या शाळेत दाखल करण्यास सांगितले. यावेळी त्यांच्या आईने मुलीच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष न करता त्यांना चांगले शिक्षण देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले.

Scientist Rahul Damale selected for Netaji Subhash ICAR International Fellowship
वडील तिसरी उत्तीर्ण तर आई निरक्षर, मुलगा शास्त्रज्ञ झाला, आता परदेशी शिक्षणासाठी निवड
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Image of Baba Abhay Singh or a related graphic
महाकुंभमेळ्यात अस्खलित इंग्रजी बोलणारे IIT Baba नेमके कोण आहेत? आयआयटी मुंबईत शिकलेले अभय सिंग आध्यात्माकडे कसे वळाले
sharad pawar slams amit shah news in marathi
देशाचे पहिले तडीपार गृहमंत्री! शरद पवारांचा अमित शहांवर प्रतिहल्ला
1 25 crores is proposed for purchasing educational materials to strengthen math foundation
माजी मंत्र्यांच्या हट्टामुळे महापालिकेचा सव्वा कोटी खर्चाचा घाट?
Prajna pathshala mandal vai Higher Education in Kashi
तर्कतीर्थ विचार: काशीतील उच्चशिक्षण
RTE, RTE Admission, RTE Admission Registration,
‘आरटीई’ प्रवेश नोंदणी १३ जानेवारीपासून, जाणून घ्या सविस्तर…
Manjit Singh Success Story
Success Story : “शेतकरी असावा तर असा…” भाड्याने जमीन घेऊन केली हळदीची शेती; डॉक्टर ऑफ ॲग्रीकल्चर म्हणून झाला लोकप्रिय

दिल्ली विद्यापीठातून घेतले शिक्षण

प्रसिद्ध इंग्रजी शिक्षिका नीतू सिंग यांचे आज लाखो सब्स्क्रायबर आहेत. प्रत्येक जण नीतू सिंग यांना प्रेमाने नीतू मॅडम नावाने ओळखतात. नीतू सिंग या मूळच्या झारखंडच्या आहेत. जरी त्या झारखंडच्या असल्या तरी त्यांचे पालनपोषण बिहारमध्ये झाले. नीतू सिंग या अभ्यास साहित्य, सराव चाचण्या आणि लाइव्ह शंका-निराकरण सत्रांसह विविध कार्यक्रम घेतात. त्यांची शिकवण्याची शैलीही अनोखी आहे. यामुळेच नीतू सिंग विद्यार्थ्यांमध्ये खूप लोकप्रिय आहेत. त्यांनी दिल्ली विद्यापीठातून एलएलबीचे शिक्षण घेतले आहे. एलएलबीची पदवी घेतल्यानंतर त्या कोर्टात जाऊ लागल्या. मात्र यातून आर्थिक गरजा भागत नसल्याने त्यांनी शिकवणी घेण्याचे ठरवले.

हेही वाचा- Kolkata and Badlapur Case : कोलकाता आणि बदलापूर प्रकरणात फरक काय? गुन्हेगाराला शिक्षा मिळाली तरी गुन्हे थांबतील?

सुरुवातीला नीतू सिंग यांना शिकवणी घेण्यासाठी खूप कष्ट करावे लागले. पण, मेहनतीला न घाबरता न डगमगता त्या काम करत राहिल्या. एका मुलाखतीदरम्यान त्यांनी सांगितले होते की, जेव्हा त्या शिकवायला गेल्या तेव्हा त्यांनी पाहिले की, मुलांबरोबर त्यांच्या आईलाही इंग्रजी शिकायचे आहे. एका मुलाच्या आईने सांगितले की, जेव्हा ती किटी पार्टीला जाते तेव्हा तिचे कपडे पाहून सर्वांना वाटायचे की, ती चांगली इंग्रजी बोलते. पण, यावेळी जेव्हा त्यांच्याबरोबर इतर लोक इंग्रजीत बोलायचे तेव्हा त्यांनी इंग्रजी नीट बोलता येत नसल्याने खूप खराब वाटायचे.

एकाचवेळी शिकवले जाते ३ हजार मुलांना

नीतू सिंग यांनी पुढे म्हटले की, शिकवणी व्यवस्थित चालू होती, पण एके दिवशी त्या त्यांच्या सिनियर्सबरोबर मुखर्जी नगरला गेल्या होत्या, यावेळी तिथे त्यांना अनेक इन्स्टिट्यूट दिसल्या. याचवेळी त्यांच्या मनातही इन्स्टिट्यूट उघडण्याचा विचार आला. पण, इन्स्टिट्यूट उघडणे इतके सोपे नव्हते, सुरुवातीला नीतू सिंग यांच्या बॅचमध्ये फक्त चार मुले होती. मग ही संख्या अशीच वाढत गेली आणि काही वर्षांत एक वेळ अशी आली की, त्यांना एक सिनेमागृहही घ्यावा लागला. कारण त्यावेळी त्या जवळपास तीन हजार मुलांना शिकवायच्या. २०१४ मध्ये काही कारणांमुळे त्यांना पॅरामाउंट कोचिंग सेंटर सोडावे लागले.

यानंतर त्यांनी केडी कॅम्पस सुरू केला. अवघ्या तीन-चार वर्षांत केडी कॅम्पस अशा टप्प्यावर येऊन पोहोचला आहे की, मुखर्जी नगरला येणाऱ्या विद्यार्थ्यांची ती पहिली पसंती बनली आहे. लॉकडाऊनदरम्यान कोचिंग सेंटर बंद असताना त्यांनी केडी लाईव्ह सुरू केले. आज त्यांच्या यूट्यूब चॅनेलवर १.७१ दशलक्ष सबस्क्राइबर्स आहेत. त्या एकट्या यूट्यूबवरून महिन्याला लाखो रुपये कमावतात. शिक्षिकानीतू सिंग सांगतात की, शेवटी जे कष्ट करत राहतात तेच जिंकतात.

Story img Loader