घरातल्या स्त्रीची तब्येत चांगली असेल तरच घरचं आरोग्य चांगलं राहतं. नोकरी करणाऱ्या स्त्रियांना घर आणि नोकरी अशी तारेवरची कसरत करावी लागते. ऑफिसची वेळ गाठणं, घरातल्या, मुलाबाळांच्या, ज्येष्ठांच्या जबाबदाऱ्या, ऑफिसची डेडलाईन, सण समारंभ अशी सगळी कसरत करताना तिला स्वत:कडे लक्ष द्यायला वेळच मिळत नाही. तर घरातली कामं, प्रत्येकाच्या वेळा सांभाळणं या सगळ्यांमध्ये गृहिणींचं स्वत:च्या खाण्याकडे दुर्लक्ष होतं. स्त्रीच्या चांगल्या आरोग्यासाठी तिनं आपल्या आहाराकडे लक्ष देणं सगळ्यांत आवश्यक आहे. महिलांमध्ये सहसा कॅल्शियम आणि डी व्हिटॅमिनची कमतरता आढळतेच रोज अगदी पूर्ण सगळी पोषणमूल्य आपल्या आहारत घेणं शक्य नसलं तरी काही हेल्दी फूड्सचा मात्र आपल्या आहारात अवश्य समावेश करावा. आजच्या सुपरवुमनसाठी ही आहेत सुपरफूड्स.

दूध

घरातल्या लहान- मोठ्या मुलांना तर तुम्ही आग्रहाने दूध प्यायला देतच असाल. पणदूध तुमच्यासाठीही सुपरफूड आहे. रोजच्या घाईमध्ये किमान एक ग्लास दूध रोज प्रत्येक स्त्रीनं प्यायला हवं, असं तज्ज्ञ सांगतात. दुधात कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी भरपूर असतं. बहुतेक स्त्रियांमध्ये याचीच कमतरता असते. त्यामुळे रोज दूध पिण्यानं ही कमतरता दूर होऊ शकते. विशेषत: ऑफिसला जाणाऱ्या स्त्रियांना तर घाईच्या वेळेस दूध हा उत्तम पर्याय आहे. तुम्हाला आवडत असेल त्या फ्लेवर्सची पावडर किंवा प्रोटीन पावडर घालून तुम्ही दूध घेऊ शकता.

tasty and nutritious palak pare recipe
झटपट बनवा चविष्ट अन् पौष्टिक पालक पाऱ्या; वाचा परफेक्ट रेसिपी
IND vs NZ AB de Villiers on Rishabh Pant Controversial Dismissal
IND vs NZ : ऋषभ पंतच्या वादग्रस्त विकेटवर…
Diwali diya jugaad diya in cooker video
Kitchen Jugaad Video: महिलांनो दिवाळीत फक्त एकदा कुकरमध्ये पणत्या ठेवा; परिणाम पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही
Diwali special karle kanda chivda recipe in marathi chivda recipe in marathi snaks recipe in marathi
यंदा दिवाळीला करा स्पेशल कारले कांदा कुरकुरे चिवडा; कुरकुरीत, खमंग चिवडा करण्याची घ्या परफेक्ट रेसिपी
do patti
अळणी रंजकता
Methi Sprouts Benefits
वजन नियंत्रणात ठेवण्यापासून ते रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यापर्यंत मोड आलेली मेथी आहे फायदेशीर; किती प्रमाणात खावी? तज्ज्ञांचे मत घ्या जाणून
 ‘मायक्रोफायनान्स’ संस्थांना अवाजवी कर्ज देण्यापासून परावृत्त करणे आवश्यक
chia seeds health benefits soaked chia seeds benefits and direction to use
रोज चिया सीड्स खाण्याचे हे आहेत आरोग्य फायदे, वाचा कशाप्रकारे करावे सेवन

टोमॅटो

आपल्या स्वयंपाकघरात टोमॅटो असतोच. टोमॅटो महिलांसाठी सुपरफूड आहे असं मानलं जातं. यामध्ये लायकोपिन नावाचं पोषणतत्व असतं. कॅन्सर आणि विशेषत: ब्रेस्ट कॅन्सर होण्यापासून रोखण्यामध्ये लायकोपिन उपयुक्त असतं. त्याशिवाय टोमॅटोमध्ये अँटीऑक्सिडंट्सही भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे ह्रदयविकारांशी लढण्यात मदत होते. टोमॅटोमुळे त्वचा चांगली राहते आणि वाढत्या वयाचे परिणामही त्वचेवर दिसत नाहीत.

३) शेंगभाज्या (बीन्स)

विविध प्रकारच्या शेंगभाज्या आपल्याला माहिती आहेत. तुमच्या आहारात बीन्सचा समावेश असेल तर ह्रदयरोग आणि ब्रेस्ट कॅन्सरचा धोका कमी होऊ शकतो. स्त्रियांसाठी तर बीन्स अत्यंत उपयुक्त आहेत. डाएटमध्ये बीन्सचा नियमित समावेश असेल तर हार्मोन्सचं संतुलन राखण्यात मदत होते.

सोयाबीन

नॉनव्हेज न खाणाऱ्यांसाठी प्रोटीनचा उत्तम पर्याय म्हणजे सोयाबीन आहे. सोयाबीनमध्ये भरपूर प्रोटीन, आयर्न आणि व्हिटॅमिन बी असतं. स्त्रियांनी आपल्या आहारात ही सगळी पोषणमूल्य मिळण्यासाठी सोयाबीनचा समावेश अवश्य करावा. त्याशिवाय सोयाबिनपासून तयार झालेलं सोया दूध, टोफू यांचाही समावेश तुम्ही डाएटमध्ये करु शकता.

दही

स्त्रियांनी आपल्या जेवणात दह्याचा समावेश अवश्य करावा. अनेकजणी आपल्या घरी दही लावतात किंवा बाहेरही दही अगदी सहजपणे उपलब्ध असतं. दही खाल्ल्यामुळे ब्रेस्ट कॅन्सरचा धोका कमी होतो असं काही संशोधनातून समोर आलं आहे. तसंच पोटाशी संबंधित तक्रारी दूर करण्यातही दह्याचा उपयोग होतो. हाडं मजबूत करण्यासाठी दही अत्यंत उपयुक्त आहे. त्यामुळे नोकरी करणारी स्त्री असो किंवा घरी राहणारी, तुमच्या रोजच्या जेवणात न विसरता दही किंवा लो फॅट दही खा.

आवळा

व्हिटॅमिन ए, बी, सी, पोटॅशियम, मॅग्नेशियम, फायबर, प्रोटीन आणि आयर्न अशी सगळी पोषणमूल्य भरपूर असलेला आवळा हा खरंतर स्त्रियांसाठी वरदानच आहे असं म्हणावं लागेल. आवळ्याला चिरतरुण फळ असं म्हटलं जातं. आवळ्याच्या सेवनाने प्ररतिकारशक्तीही चांगली होते. त्वचा, डोळे आणि केसांसाठीही आवळा खूप उपयोगी आहे.

बेरीफळे

विविध प्रकारच्या बेरीज स्त्रियांच्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असतात. स्ट्रॉबेरी, रासबेरी,ब्लूबेरी आणि क्रॅनबेरी, जे तुम्हाला सहज उपलब्ध आहे ते शक्य तेव्हा नक्की खा. बेरीजमध्ये व्हिटॅमिन सी आणि फॉलिक ॲसिड भरपूर असतं. बेरीजमुळेही ब्रेस्ट कॅन्सरचा धोका बराच कमी होतो. गरोदरपणातही बेरीज भरपूर खाल्ल्याचा सल्ला दिला जातो.

बीट

सुंदर रंग असलेले बीट हे चवीला गोड आणि पोषणममूल्यांनी भरपूर असते. ज्या स्त्रियांना ब्लडप्रेशरचा त्रास आहे त्यांनी तर त्यांच्या रोजच्या जेवणात बीटाचा समावेश अवश्य करावा. रोज एक ग्लास बिटाचा ज्यूस प्यायल्याने ब्लडप्रेशर नियंत्रणात राहते. त्याशिवाय रक्तवाढीसाठी आणि रक्तातील हिमोग्लोबीन वाढण्यासाठी बीट अत्यंत उपयुक्त आहे.

ब्रोकोली

हल्ली ब्रोकोली सगळीकडे सहज मिळते. ब्रोकोलीमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर असतं. तुम्ही तुमच्या आहारात सॅलड किंवा सूप करून ब्रोकोलीचा समावेश करून पाहा.

डाळींब

डाळिंबामध्ये आयर्नचं प्रमाण जास्त असतं. त्यामुळे ज्या महिलांमध्ये लोहाची कमतरता असते त्यांच्यासाठी तर डाळींब अत्यंत उपयुक्त आहे. रोज एक डाळींब खाल्ल्याने लोहाची ही कमतरता भरून निघते. रक्तप्रवाह सुरळीत राहण्यासाठी तसंच वजन नियंत्रणात राहण्यासाठीही डाळींब उपयुक्त आहे.
(शब्दांकन : केतकी जोशी)