कोणत्याही नोकरीसाठी अर्ज करताना उमेदवाराची शैक्षणिक पात्रता पाहणे अत्यंत महत्त्वाचे आहे मग ती स्त्री असो की पुरुष. पण अनेकदा नोकरीसाठी स्त्री पुरुष असा भेदभाव केला जातो. हा भेदभाव काही आजच्या काळापुरता मर्यादीत नाही. हा भेदभाव फार पूर्वीपासून चालत आला आहे. जिथे आजच्या काळात महिला पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून विविध क्षेत्रामध्ये काम करत आहे पण एक काळ असा होता जिथे महिलांना नोकरी मिळवण्यासाठी देखील फार संघर्ष करावा लागत असे. सध्या सोशल मीडियावर एका महिलेला पाठवण्यात आलेले नोकरी नाकरण्याचे पत्र चर्चेत आले आहे. दरम्यान या पत्रावरून सोशल मीडियावर उलट-सुलट चर्चा सुरु आहे.
१९३८ मध्ये वॉल्ट डिस्नेने एका महिलेला पाठवलेले नोकरीसाठी नाकारण्याचे पत्र सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या पत्रामुळे सोशल मीडियावर चर्चांना उधान आले आहे कारण त्या वेळी महिलांना कोणत्याही सर्जनशील कामासाठी कसे विचारात घेतले जात नव्हते आणि त्यांच्या क्षमता मर्यादित करणाऱ्या नोकऱ्यांपुरते कसे मर्यादित होते यावर हे पत्र प्रकाश टाकत आहे.
पत्राची सुरुवात मिस फोर्ड यांच्या पत्त्याने होते, जिने यूएस चित्रपट निर्मात्याच्या इंकिंग आणि पेंटिंग( inking and painting) विभागात नोकरीसाठी अर्ज केला होता. “स्त्रिया पडद्यासाठी व्यंगचित्रे तयार करण्यासंदर्भात कोणतेहे काम सर्जनशीलतेने करत नाहीत, कारण ते काम पूर्णपणे तरुण पुरुष करतात. या कारणास्तव, मुलींचा प्रशिक्षण शाळेसाठी विचार केला जात नाही,” असे त्यात लिहिल आहे. तसेच या पत्रातून अर्जदाराला डिस्नेमध्ये महिलांसाठी उपलब्ध असलेल्या एकमेव कामाबद्दल कळवण्यात आले. या पत्रात म्हटले आहे की, “महिलांसाठी उपलब्ध असलेले काम म्हणजे स्पष्ट सेल्युलॉइड शीटवर भारतीय शाईने वर्ण ट्रेस करणे आणि दिशेनुसार उलट बाजूस पेंटसह ट्रेसिंग भरणे..”
हेही वाचा – कोण आहे भक्ती मोदी? इशा अंबानीच्या रिलायन्स रिटेलमध्ये काय आहे तिची जबाबदारी?
कंपनीच्या इंकिंग आणि पेंटिंग विभागात अर्ज करण्याची प्रक्रिया पुढे या पत्रात नमूद करण्यात आली आहे. “इंकर” किंवा “पेंटर” या पदासाठी अर्ज करण्यासाठी स्टुडिओमध्ये उपस्थित राहणे आवश्यक आहे, विशेषत: वरील बाबी लक्षात घेऊन हॉलिवूडमध्ये येण्यासाठी नमुने घेऊन या. , अर्ज करणाऱ्या मुलींची संख्येच्या तुलनेत खरोखर फारच कमी जागा आहेत.,” असेही पत्रात लिहिले होते.
हेही वाचा – पुण्यात मसाल्यांची गिरणी चालवणाऱ्या ‘बेबी बोकले’ देतायत मायक्रोसॉफ्टला मराठीचे धडे; तासाची कमाई किती?
नोकरी नाकारण्याच्या पत्रावर अनेक Reddit वापरकर्त्यांकडून प्रतिक्रिया आल्या आहेत. “मला तर्क हे शुद्ध टोटोलॉजी (tautolog) कसे आहे हे आवडते. दुसरा परिच्छेद मुळात म्हणतो, “स्त्रिया हे काम करत नाहीत कारण स्त्रिया हे काम करत नाहीत,” असे एकाने लिहिले आहे.
हे पत्र पाहिल्यानंतर महिलांना एका नोकरीसाठी देखील किती संघर्ष करावा लागला हे दिसते आहे आणि स्त्रियांच्या नोकरीबाबत समाजाची मानसिकता आणि दृष्टिकोन कसा होता हे स्पष्ट होत आहे. आजच्या काळात या सर्व गोष्टी काळानुसार मागे पडल्या आहेत. महिला प्रत्येक क्षेत्रात आघाडीवर आहे.