– साधना तिप्पनाकजे

“पूर्वी दारूचे गुत्ते बायकाच चालवायच्या. कित्येक ठिकाणी दारू सर्व्ह करायला बायका असतात, तर बाईसाठी वेगळं वाईन शॉप उघडलं तर काय बिघडलं? बाईला हवा तो कम्फर्ट द्यायला लोकांना का प्रॉब्लेम असतो?” माझी एक मैत्रीण, स्मिता तिचं म्हणणं अगदी जोरदारपणे मांडत होती. जालंधरमध्ये नव्यानं सुरू झालेल्या एका दारुच्या दुकानावरून पंजाबमधलं राजकीय आणि सामाजिक वातावरण सध्या चांगलंच तापलं आहे.

Kavadi for lord importance of kavadi price of a kavadi
लोक-लौकिक : ‘कवडी’मोल!
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Hindu Bahujan mahasangh
नागपूर : अनुसूचित जातीच्या आरक्षणाच्या वर्गीकरणाचा विषय तापला, हिंदू बहुजन महासंघाचा इशारा
special inspection drive launched to check that ST driver carrier on duty is not under influence of alcohol
एसटीच्या चालक, वाहकाने मद्यपान केल्याचे आढळल्यास कारवाई, विशेष तपासणी मोहीम सुरू
Paaru
Video: “देवीआईंनासुद्धा कळायला पाहिजे…”, पारू अनुष्काचे सत्य अहिल्यादेवीसमोर आणणार? मालिकेत ट्विस्ट, पाहा प्रोमो
zomato swiggy now sell their food products directly to consumer
झोमॅटो, स्विगीकडून आता त्यांच्या खाद्य उत्पादनांची थेट विक्री; हॉटेल व्यावसायिकांचा विरोध, कारवाईची सरकारकडे मागणी 
Loksatta Lokrang Comfort Food Hapus Mango Market
बारमाही : असले जरी तेच ते…
Loksatta chaturang padsad loksatta readers response letter
पडसाद : स्वार्थ आणि परमार्थ साधायचा असेल तर…

जालंधरमध्ये एका दारुच्या दुकानाला ‘लिकर स्टुडियो’ असं नाव देण्यात आलं आहे. या स्टुडियोच्या नावाशेजारी ‘विमेन फ्रेण्डली शॉप’ अशी टॅगलाईन लिहिण्यात आली आणि या फलकाचा फोटो लगेचच व्हायरल झाला. पंजाबमध्ये लोकांची माथी भडकली. ‘विमेन फ्रेण्डली लिकर स्टुडियो’ या संकल्पनेवर अनेकांनी आक्षेप घेतला. राजकीय पक्षांना तर मुद्दे हवेच असतात! सोशल मीडियावरसुद्धा या टॅगलाईनवरून धुमारे फुटू लागले. सध्या या दुकानाच्या पाटीवरचे ‘विमेन फ्रेण्डली’ हे शब्द पुसण्यात आले आहे. ‘दारू पिणं चांगलं की वाईट’ याच्या तपशीलात इथे मला शिरायचं नाहीये. दारू पिण्याचं समर्थनही मी करत नाहीये. पण गेल्या काही वर्षांपासून ड्रिंक्स घेणाऱ्या मुली आणि स्त्रियांचं प्रमाण वाढतं आहे. कुटुंबाबरोबर, मित्रमैत्रिणींबरोबर आठवडा सुट्टीतलं ‘गेट टुगेदर’, पार्टी किंवा पिकनिकमध्ये अनेकजणी ड्रिंक्स घेतात. बऱ्याचदा घरातले पुरुष किंवा मित्र वाईनशॉपमधून बाटल्या आणतात. तशाच काही स्त्रियाही वाईनशॉपमध्ये जाऊन मद्य आणतात. पण यातल्या बऱ्याचजणींना अजूनही तिथल्या पुरुषांच्या गर्दीत आपली ऑर्डर देणं जमत नाही. पुरुषांच्या गर्दीत उभं राहून काउंटरवर आपल्याला हवा तो ब्रॅण्ड मागणं जमत नाही, दडपण येतं.

हेही वाचा – पालकांच्या मंजुरीशिवाय प्रेमविवाहाला मान्यता मिळणार नाही?

अहो, आपल्याकडे अजूनही कित्येक ठिकाणी मेडिकल दुकानामधून सॅनिटरी पॅड घेतानाही काही नजरा त्या बाईकडे रोखून बघत असतातच. मग अशा समाजात वाईन शॉपमधून आपल्या आवडीचं मद्य घेताना तर लोकांच्या नजरेतून काय काय बोललं जात असेल! महानगरांमध्ये हल्ली सुपरमार्केटसारखी लिकर शॉप सुरू झाली आहेत. शेल्फसवर विविध मद्य बाटल्या आकर्षकपणे मांडून ठेवलेल्या असतात. ट्रॉली घेऊन या शेल्फसमधून फेरी मारत आपल्याला हव्या त्या ब्रॅण्डची बाटली निवडून ट्रॉलीत ठेवायची. या पद्धतीनं लिकर शॉपिंग करायला पुष्कळ स्त्रियांना आवडतं. कारण या खरेदीत स्त्रीला तिची स्पेस जपता येते, तिला हवी ती गोष्ट स्वतः निवडून खरेदी करता येते. खरेदीचा आनंद घेता येतो. आणि या खरेदीत आनंदासोबत सहजताही येते. त्यामुळे ‘विमेन फ्रेण्डली लिकर स्टुडियो’ या टॅगलाईनमुळे कदाचित स्त्रियांना मद्यखरेदी करताना ‘कम्फर्ट’ वाटेल.

मध्य प्रदेश आणि गुरुग्राममध्ये काही ठिकाणी ‘विमेन फ्रेण्डली लिकर स्टुडियो’ आहेतही. कोविड काळात सरकारी तिजोरीत महसूल जमा होण्याकरता सरकारने ‘मद्य बाटल्यांच्या घरपोच सेवे’ला मान्यता दिली. ही सेवा चांगलीच लोकप्रिय झाली. यात पुरुषांसोबत स्त्रियांचाही वाटा होता आणि आहे. मुंबई लगतच्या निमशहरी भागात वर्षानुवर्षे दारूचे गुत्ते स्त्रियाच चालवतात. आपल्याकडे ‘अमुक गोष्ट स्त्रियांनीच करावी किंवा पुरुषांनीच करावी’ या बाबतीत खूप ‘स्टिग्मा’ आहेत. विशेषतः उच्च मध्यमवर्गीय आणि मध्यमवर्गीय व्यक्तींमध्ये हे ‘स्टिग्मा’ जास्त दिसून येतात. ‘लोक काय म्हणतील’ याची चिंता सतत सतावत असते आणि त्याच दडपणाखाली अनेक गोष्टी केल्या जातात किंवा करू दिल्या जात नाहीत. कनिष्ठ वर्गात अनेकदा या ‘स्टिग्मा’ प्रकरणाचा विचार करायलाच वेळ नसतो. कारण पैसा कमवून घरातल्यांना खायला घालणं, हेच प्रत्येक दिवसाचं ध्येय असतं. उच्च वर्गाचेही ठोकताळे वेगळे असतात.

हेही वाचा – गच्चीवरची बाग : गृहसंकुलातील वृक्षराजी

‘विमेन फ्रेण्डली लिकर स्टुडियो’ या टॅगलाईनवर ‘संस्कृतीरक्षण आणि व्यसनाधीनता पसरवणं’ हे मुद्दे पुढे करून आक्षेप घेतले जात आहेत. गंमत म्हणजे हा निर्णय घेणाऱ्या आणि त्याला विरोध करणाऱ्यांमध्ये नेहमीप्रमाणे पुरुषांचाच पुढाकार आहे! पण जर का एखाद्या स्त्रीला मद्यसेवन करण्यात अडचण वाटत नसेल, तर त्यावरून इतरांनी गोंधळ का माजवावा? पुरुषांनी वाईनशॉपमध्ये जाऊन त्यांना हवं ते मद्यखरेदी करणं यात समाजाला काहीच गैर वाटत नाही. पण स्त्रियांच्या याच आवडीला विरोध करताना साधनशुचितता, संस्कृती आणि व्यसनाधीनता हे मुद्दे पुढे केले जातात. म्हणजे जणू काही ‘विमेन फ्रेण्डली लिकर स्टुडियो’ आल्यामुळेच व्यसनाधीनता वाढणार आहे! आणि जणू असे विमेन फ्रेण्डली स्टुडियो नसतील तर आपल्याकडे मद्यसेवन धाडकन कमी होणार!

असो, सध्यातरी ‘विमेन फ्रेण्डली लिकर स्टुडिओ’ अशी पाटी अधिकृतरित्या दुकानावर लावणं ही गोष्ट शक्य नाही.

sadhanarrao@gmail.com

Story img Loader