– डॉ. किशोर अतनूरकर

निरामय कामजीवनाचा आनंद घ्यायचा आहे आणि गर्भधारणा देखील टाळायची आहे तर काय करावं, असा प्रश्न अनेक नवविवाहित जोडप्यांसमोर असतो. ‘आत्ताच तर लग्न झालंय. एक दोन वर्ष काळजीमुक्त आनंदाने जगू आणि नंतर गर्भधारणेची जबाबदारी घेऊ,’ असा या मागचा दृष्टिकोन. मात्र यासाठी कोणतं ‘साधन’ वापरावं याबाबतीत त्यांना योग्य वैद्यकीय मार्गदर्शन घेणं गरजेचं आहे. परंतु असं योग्य मार्गदर्शन मिळण्यासाठी थेट डॉक्टरकडे येऊन विचारणा करून निर्णय घेणारी जोडप्यांची संख्या तुलनेत खूप कमी आहे. दुसऱ्या बाजूला ‘त्यांना सांगायची काही गरज नाही. आजकालची मुलं आहेत ती. सोशल मीडिया, इंटरनेटमुळे ऑलरेडी त्यांना सगळं काही माहिती असतं.’ असं ज्येष्ठ पिढीचं म्हणणं असतं. इंटरनेटवर ही माहिती उपलब्ध असते, संबंधित लोक ती माहिती वाचतात हे देखील खरं आहे, पण जी माहिती अनुभवी, तज्ञ डॉक्टरांशी चर्चा करून मिळते ती अधिक उपयुक्त असते यात शंका नाही.

kama Hospital study shows increased diabetes prevalence in pregnant women due to changing lifestyles
गर्भधारणेच्या वेळी महिलांना मधुमेहाचा धोका
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
chatura cesarean delivery
स्त्री आरोग्य: गर्भजल कमी असल्यास ‘सिझेरियन’ अनिवार्य आहे?
menstrual leave mva provision
मासिक पाळीच्या रजेचा विषय पुन्हा चर्चेत; भारतात काय आहेत नियम? कोणकोणत्या राज्यांत रजेची तरतूद?
japan ban wedding after 25 for women
‘या’ देशात महिलांना पंचविशीनंतर विवाहास मनाई, प्रस्तावावरून नागरिक संतप्त; कारण काय?
MVA demand menstrual leave
Menstrual Leave: मासिक पाळीदरम्यान दोन दिवसांची सुट्टी देण्याचे मविआचे आश्वासन; संसद ते स्मृती इराणींपर्यंत या विषयाशी निगडित कोणते वाद झाले?
Garlic Rate, Vegetable Rate, Pune, Garlic,
लसूण महागला, परराज्यातील लसणाची आवक कमी
Child Marriage, Supreme Court, Child Marriage Prevention Act,
बालविवाहाचा फेरा : भारत मुक्त कधी होईल?

मासिकपाळीच्या ठराविक दिवसांवर आधारित सुरक्षित काळ अथवा ‘सेफ पिरियड’ पद्धती ही नवविवाहित जोडप्यांसाठी पाळणा लांबविण्याची सुरक्षित, आनंददायी आणि उपयुक्त पद्धती आहे, असं म्हणायला हरकत नाही. सर्वसाधारणपणे ज्या स्त्रियांची मासिकपाळी नियमित (हे जास्त महत्वाचं) असते, त्यांच्या पाळीच्या ९ ते १९ व्या दिवसाच्या कालावधीत स्त्री-बीज परिपक्व होऊन स्त्री-बीजांडकोशाच्या बाहेर पडण्याची (Ovulation) शक्यता असते. या कालावधीत शरीरसंबंध आल्यास स्त्री-बीज आणि पुरुषाच्या वीर्यातील शुक्राणूंचा (sperms) संयोग होऊन गर्भधारणा होत असते म्हणून हा कालावधी गर्भनिरोधाच्या दृष्टीने असुरक्षित समजला जातो. हा कालावधी नीट समजावून घेणं आवश्यक आहे. ज्या तारखेला मासिकपाळी सुरु झाली तो दिवस पहिला समजावा. समजा महिन्याच्या १२ तारखेला मासिकपाळी सुरु झाली, तर १२ तारीख पहिला दिवस, १३ तारीख दुसरा दिवस असं मोजून ९ वा दिवस कोणत्या तारखेला येतो हे पाहावं. त्याप्रमाणे ९ ते १९ व्या दिवसाची कॅलेंडरवर ‘फुली’ मारून नोंद करावी.

हेही वाचा – “हिंदू महिला मृत पतीच्या मालमत्तेचा उपभोग घेऊ शकते, पण…”, उच्च न्यायालयाने नोंदवलं महत्त्वाचं मत!

ज्या जोडप्यांना सलग दहा दिवस संभोग टाळणं कठीण जातं त्यांनी त्या कालावधीत निरोध किंवा ‘कंडोम’ या साधनांचा वापर करायला हरकत नाही. या सुरक्षित काळ पद्धती (सेफ पिरियड) आणि आवश्यक त्या कालावधीत निरोधचा वापर या दोन पर्यायाच्या एकत्रीकरणाने जोडप्यांना महिन्यातून सुमारे १५ दिवस तरी गर्भधारणा देखील टाळता येईल. मात्र या पद्धतीचा अवलंब करण्यासाठी त्या स्त्रीची मासिकपाळी नियमित असणं आवश्यक आहे, हे लक्षात ठेवावे. मासिकपाळी नियमित असणं म्हणजे दर महिन्याच्या अगदी त्याच तारखेला पाळी सुरु होणं असा त्याचा अर्थ होत नाही. अपेक्षित तारखेच्या साधारणतः पाच दिवस कमी किंवा पाच दिवस जास्त अंतराने पाळी सुरु झाल्यास ती नियमितच समजावी. उदा. अपेक्षित तारीख १२ आहे आणि पुढच्या महिन्यात ती ७ ते १७ तारखेपर्यंत कधीही सुरु झाल्यास, नियमित, नॉर्मल किंवा रेग्युलर समजावी.

ज्या नवविवाहित स्त्रीची मासिकपाळी नियमित नाही त्यांनी या सुरक्षित काळ पद्धतीचा अवलंब करू नये. या स्त्रियांना गर्भधारणा टाळण्यासाठी अन्य पद्धतीचा अवलंब करावा लागतो. त्यांच्या बाबतीत, ‘Ovulation’ कधी होईल याचा नेम नसतो म्हणून, त्यांनी मासिकपाळी नियमित होईपर्यंत प्रत्येक शरीरसंबंधाच्या वेळेस गर्भनिरोधकाचा वापर करणं योग्य राहील. प्रत्येक जोडप्याचं लैंगिक जीवन वेगळं असू शकतं. त्यातील बारकावे लक्षात घेऊन, डॉक्टर त्या नवदांपत्याशी चर्चा करून सल्ला देत असतात. त्यामुळे वैद्यकीय सल्ला घेणे जास्त सयुक्तिक आहे. ‘सेफ पिरियड’ या पद्धतीचा अवलंब करण्यासाठी पती-पत्नीचं सहकार्य मात्र आवश्यक असतं.

हेही वाचा – महिला रुग्णांवर महिला डॉक्टरांनीच उपचार केल्यास मृत्यूची शक्यता असते कमी? संशोधनातून माहिती उघड; पण कसं काय?

नवविवाहित जोडप्यांनी गर्भनिरोधक गोळ्या घेणं योग्य का अयोग्य ? हा प्रश्न देखील विचारला जातो. त्यांनी गर्भनिरोधक गोळ्या घेऊच नये असं नाही, पण शक्यतो टाळाव्यात. गर्भनिरोधक गोळ्यांनी ‘ovulation’ ची प्रक्रिया तात्पुरती बंद होत असते. गोळ्या बंद केल्यानंतर ती प्रक्रिया पूर्ववत होण्यासाठी अंदाजे तीन महिन्याचा कालावधी लागतो. शिवाय अनेक वर्ष गोळ्या घेण्याचे काही दुष्परिणाम देखील असतात. तेव्हा, एकही अपत्य झालेलं नसताना अशी रिस्क कशाला घ्यायची या दृष्टिकोनातून डॉक्टर नवविवाहित दांपत्यांना गर्भनिरोधक गोळ्यांना प्राथमिकता देत नाहीत. काही नवविवाहित जोडप्यांना निरोधचा वापर हा ‘व्यत्यय’ वाटू शकतो, त्यांनी मात्र डॉक्टरच्या सल्ल्याने लग्नाच्या एक महिना अगोदर गोळ्या सुरु कराव्यात जेणेकरून ‘बिनधास्त’ राहता येईल.

प्रत्येक जोडप्याला अधिकार आहे आपल्याला मूल कधी व्हावं याचा विचार करायची. तेव्हा योग्य एकमेकांच्या सल्लामसलतीने निर्णय घेणं कधीही योग्यच.

(लेखक एम. डी. (स्त्रीरोग आणि प्रसूतिशास्त्र) तसेच पीएच.डी. (समाजशास्त्र) आणि एम एस (काउन्सेलिंग आणि सायकोथेरपी) आहेत

atnurkarkishore@gmail.com