सर्वसाधारणपणे बऱ्याच स्त्रियांना मासिकपाळी येण्यापूर्वी काही दिवस अगोदर शरीरात आणि भावनिकदृष्ट्या कळत न कळत काही बदल जाणवत असतात. मासिकपाळी सुरु होण्यापूर्वी शरीरावर आणि मनावर आलेला किंचितसा ताण पाळी आल्यानंतर मुक्त किंवा मोकळा होतो आणि ज्याला आपण आजकाल ‘मला आता फ्रेश वाटतंय असं म्हणतो’ तसं वाटायला लागतं.

मासिकपाळी म्हटलं की साधारणतः ८० टक्के मुलीच्या किंवा स्त्रीच्या शरीरात आणि मनात किरकोळ प्रमाणात अस्वस्थता ही असतेच. या नैसर्गिक पण अटळ प्रक्रियेकडे बघण्याचा त्या मुलीचा किंवा स्त्रीचा वैयक्तिक दृष्टिकोन कसा आहे, मासिकपाळीला आपल्या रोजच्या कामात किती निर्धाराने ती बाजूला ठेऊ शकते यावर या अस्वस्थतेचं प्रमाण अवलंबून असतं, हे समजून घेतलं पाहिजे. मुली किंवा स्त्रिया मनाने खूप संवेदनशील आहेत की खंबीर? यावर त्या मासिकपाळीत होणाऱ्या तात्पुरत्या आणि किरकोळ बदलांना कसं सामोरं जातात हे अवलंबून असतं.

curd in any food be dangerous
कोणत्याही पदार्थांमध्ये दह्याचा सतत वापर करणं ठरू शकतं घातक? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत…
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले…
4 Essential Tests Every Woman Over 20 Should Do
हृदयविकाराचा झटका टाळण्यासाठी विसाव्या वर्षापासून प्रत्येक महिलेने कराव्यात ‘या’ चार चाचण्या; जाणून घ्या, तज्ज्ञ काय सांगतात… –
Two Suspended in Hospital After video Shows Pregnant Woman Cleans Husband Bed After his Death
Woman Cleaning Husband Bed : धक्कादायक! पतीचा मृत्यू झाल्यानंतर रुग्णालयाने गरोदर पत्नीला स्वच्छ करायला लावले रक्ताचे डाग, कुठे घडली घटना?
over12 lakh citizens in maharashtra vaccinated against tuberculosis
राज्यामध्ये १२ लाखांपेक्षा अधिक नागरिकांचे झाले क्षयरोग लसीकरण; मुंबईमध्ये अद्याप लसीकरण मोहीमेला सुरुवात नाही
jewellery worth two lakh stolen from woman at swargate st bus depot
दिवाळीत एसटी स्थानकात चोरट्यांचा सुळसुळाट; स्वारगेट एसटी स्थानकात महिलेकडील दोन लाखांचे दागिने लंपास
wife cuts husbands private parts
दारूच्या नशेत पतीचं पत्नीशी भांडण, संतापलेल्या पत्नीनं पतीच्या गुप्तांगावर…
Can drinking water with food cause gas or indigestion
जेवताना पाणी प्यावे का? जेवताना पाणी प्यायल्याने अपचनाचा त्रास होतो का? डॉक्टरांकडून घ्या जाणून…

हेही वाचा – शारदा सिन्हा… छठ पूजा गीतांना अजरामर करणारी ‘बिहार कोकिळा’

हे कळत न कळत होणारे बदल काही मुली किंवा स्त्रियांमध्ये त्रास जाणवण्याइतपत मोठं स्वरूप धारण करतात तेंव्हा स्त्रीरोगतज्ञांच्या भाषेत त्याला प्रिमेन्स्ट्रल टेन्शन (premenstrual tension) असं म्हणतात. मासिकपाळी सुरु होण्यापूर्वी साधारणतः एक आठवडा हा त्रास सुरु होऊ शकतो. कुणाचं डोकं दुखू शकतं तर कुणाची चीड-चीड वाढते. एखाद्या मुलीला किंवा स्त्रीला खूप थकल्यासारखं वाटतं तर एखादीला झोप येत नाही. काहीजणी त्या आठवड्यात खूपच संवेदनशील किंवा भावनिक होतात. काहीजणींना पोट सतत जड वाटणं (bloated feeling), पोटाचा घेर वाढणं, अपचन होणं असं पचनसंस्थेशी संबंधित त्रास होतात. वास्तविक पाहाता, कित्येकदा पायावर सूज आल्यामुळे त्या स्त्रियांचं थोडंसं वजन देखील वाढत असतं.

दर महिन्याला पाळी येण्यापूर्वीच्या या सर्व तक्रारी एकाच स्त्रीमध्ये असतील असं नाही. यापैकी एखादा त्रास प्रामुख्याने असू शकतो. उदा. दर मासिकपाळी येण्यापूर्वी डोकं दुखण्याचा त्रास होणं. अशा प्रकारच्या डोकेदुखीला menstrual migraine असं म्हणतात. एखाद्या मुलीला किंवा स्त्रीला पाळी येण्यापूर्वी आठवडाभर आधी स्तनामध्ये जडपणा जाणवतो. या काळात ‘स्तनाना थोडाही स्पर्श झाला की खूप दुखतं’ अशी काहीजणींची तक्रार असते. एखाद्या स्त्रीच्या पायावर सूज येते. त्या आठवड्यात या त्रासाने प्रभावित स्त्री अस्वस्थ असू शकते. त्या आठवड्यात तिची अनावश्यक चीडचीड होणं, क्षुल्लक कारणांवरून घरातल्यांवर चिडणं असे प्रकार घडतात. आपल्या बायकोच्या स्वभावात होणाऱ्या या ठराविक काळातल्या बदलामुळे तिचा नवराही अनेकदा गोंधळून जातो. त्या आठवड्यात त्यांचं आपसात भांडण होऊ शकतं. मासिकपाळी येऊन गेल्यानंतर स्वभाव ‘पूर्ववत’ होतो.
मासिकपाळीपूर्वीचे हे नैसर्गिक बदल किंवा हा होणारा त्रास ठराविक मुली किंवा स्त्रीमधेच का होतो, इतरांना का होत नाही याचं नेमकं कारण सांगता येत नाही. काही संशोधकांच्या मते स्त्रियांच्या ‘स्त्री’पणाशी संबंधित इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन या दोन हॉर्मोन्सच्या असंतुलनामुळे काही स्त्रियांमध्ये मासिकपाळीपूर्व त्रास होतो. कारण काहीही असो, मासिकपूर्व काळात काही दिवसांसाठी शरीरात पाणी साचून राहाण्याचा प्रकार घडून येतो. त्यामुळे काही स्त्रियांचं त्या कालवधीत साधारणतः दिड ते दोन किलो वजन वाढतं. शरीरात सोडियम हे क्षार साचून राहिलं की त्यासोबत पाणी साचून राहतं म्हणून पायावर किंवा चेहऱ्यावर सूज दिसायला लागते. शारीरिक कारणांसोबत, विनाकारण सारखी काळजी करण्याचा स्वभाव, मनाची अस्थिरता अशी मनाशी संबंधित कारणं देखील जबाबदार आहेत असं आढळून आलं आहे. ही एक मनोकायिक समस्या आहे, असं म्हणायला हरकत नाही. क्वचित प्रसंगी हा त्रास स्त्रियांच्या दैनंदिन कामात व्यत्यय निर्माण होण्याइतपत मोठा होऊ शकतो.

हेही वाचा – आयएएस, आयपीएसचा पर्याय सोडून आजीआजोबांच्या स्वप्नपूर्तीसाठी आयएफएसची निवड

ज्या मुलींना किंवा स्त्रियांना premenstrual tension चा त्रास आहे, त्यांच्यावर उपचार करताना त्यांची मानसिक आणि कौटुंबिक परिस्थिती कशी आहे हे देखील लक्षात घ्यावं लागतं, त्यानुसार, उपचाराची योजना करावी लागते. सर्वसामान्य उपचाराचा भाग म्हणून, शरीरात जास्त प्रमाणात पाणी साचून राहू नये म्हणून मासिकपाळी येण्यापूर्वीच्या आठवड्यात पाणी किंवा द्रव पदार्थ ‘कमी प्या’ असा सल्ला दिला जातो. सर्वांनी साधारणतः दररोज किमान दोन ते तीन लिटर पाणी प्यावं असं सांगितलं जातं, पण हा त्रास असणाऱ्यांनी त्या आठवड्यापुरतं दररोज अर्धा ते एक लिटरच पाणी प्यावं आणि जेवणात मीठाचं प्रमाण कमीतकमी ठेवावं अशी सूचना दिली जाते. काही Premenstrual Tension हा काही गंभीर आजार नाही. या समस्येपासून काही जीवाला धोका नाही. मासिकपाळीशी संबंधित त्रास आहे पण हा त्रास असल्यामुळे स्त्रियांच्या प्रजनन क्षमतेवर परिणाम होत नाही. दर महिन्याला एक आठवडाभर दैनंदिन व्यवहारात व्यत्यय येत असल्यामुळे उपचार करणं गरजेचं आहे. या समस्येचा मनाच्या अस्थिरतेशी जवळचा संबंध असल्यामुळे औषोधोपचारासोबत, योगासने, ध्यान, ओंकार जप, छंद जोपासणे असे ‘मनाचे’ व्यायाम नियमित करण्याने खूप उपयोग होतो.

(लेखक एम. डी. (स्त्रीरोग आणि प्रसूतिशास्त्र) तसेच पीएच.डी. (समाजशास्त्र) आणि एमएस (काउन्सेलिंग आणि सायकोथेरपी) आहेत.)

atnurkarkishore@gmail.com