Tips For Women Health: “जिच्या हाती पाळण्याची दोरी, ती जगाला उद्धारी”, अशी एक म्हण आहे. प्रत्येक कुटुंबातील स्त्री स्वतःच्या कुटुंबाची काळजी घेते; पण स्वतःच्या आरोग्याकडे अनेकदा दुर्लक्ष करते. स्वत:चं आरोग्य हा महिलांसाठी कायम दुय्यम मुद्दा असतो. कुटुंब, कुटुंबाप्रति आपल्या जबाबदार्या एवढंच स्त्रियांना महत्त्वाचं वाटतं. घरातल्या कामांच्या बरोबरीने नोकरी आणि व्यवसायांमध्येही महिला आघाडीवर आहेत. या सर्व पातळ्यांवर धावपळ करीत असताना अनेकदा महिलांचे स्वत:च्या आरोग्याकडे दुर्लक्ष होते. प्रत्येक स्त्रीला स्वतःचं आणि कुटुंबाचं आरोग्य यांमध्ये समतोल राखता आला पाहिजे.
आजकालची जीवनशैली अतिशय धावपळीची झालेली आहे. आजारांशी लढायचं असेल, तर चांगली व निरोगी जीवनशैली आवश्यक आहे. प्रत्येक महिलेने वेळोवेळी आरोग्याची तपासणी करून घेणेही तितकेच महत्त्वाचं आहे. स्वत:च्या आरोग्याकडे दुर्लक्ष करणं महिलांना महागात पडू शकतं. आजारानं गंभीर स्वरूप धारण केलं की, महिला डॉक्टरांकडे येतात, असा अनेक स्त्रीरोग तज्ज्ञांचा अनुभव आहे. सुदृढ आरोग्य हे प्रत्येकालाच हवं असतं. वाढत्या वयानुसार महिलांना हाय कोलेस्ट्रॉल, स्तन व गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग यांसारख्या आरोग्य समस्यांचा धोका वाढतो. त्यांना टाळण्याचा सर्वांत प्रभावी मार्ग म्हणजे नियमित आरोग्य तपासणी. महिलांनी वयाच्या तिशी-चाळिशीत निरोगी राहण्यासाठी कोणत्या चाचण्या करायला हव्यात, याविषयी हेल्थ अॅण्ड वेलनेस नागपूर सेंटरच्या वैद्यकीय अधिकारी डाॅ. नुपूर नेवासकर यांनी माहिती दिली आहे. जाणून घेऊ त्यासंबंधी सविस्तर…
महिलांनी कोणत्या वैद्यकीय चाचण्या कराव्यात…
महिलेनं स्वत:च्या आरोग्याबाबत दक्ष राहणं गरजेचं आहे. जसजसं आपलं वय वाढतं, तसतशी आपली रोगप्रतिकारक शक्ती, आपल्या शरीराच्या अवयवांची कार्यक्षमता कमी होऊ लागते. त्यामुळे अनेक प्रकारच्या आजारांचा धोकाही वाढतो. निरोगी राहण्यासाठी वैद्यकीय सल्ला घेणे आणि काही चाचण्या करून घेणे आवश्यक आहे. वयाच्या तिशी-चाळिशीदरम्यान हृदयरोग, मधुमेह, उच्च रक्तदाब, लठ्ठपणा व कॅन्सरसारखे जीवनशैलीशी निगडित आजार डोके वर काढण्याची भीती असते. ३० वर्षांनंतर प्रत्येक महिलेनं काही चाचण्या करणं आवश्यक असतं. त्यामुळे आजाराची योग्य वेळेत ओळख पटते आणि त्यावर उपाय करणंही सोपे होते. दरवर्षी एकदा तरी या खालील चाचण्या करून घेतल्या पाहिजेत.
१. थायरॉईड चाचणी
बहुतांश महिलांना थायरॉईडचा धोका असतो. ३० वर्षांनंतरच्या महिलांनी थायरॉईड चाचणी करून घेणं आवश्यक आहे. मासिक पाळी अचानक येणं, अचानक वजन वाढणं, केस गळणं किंवा वंध्यत्व ही सामान्य लक्षणं आहेत. त्यासाठी रक्त चाचणीद्वारे टी ३, टी ४ व टीएसएच यांचं प्रमाण बघितलं जातं. थायरॉईडचे वेळीच निदान आणि उपचार वेळेवर होणं आवश्यक आहे. महिलांनी थायरॉईडबाबत खूप काळजी घ्यावी.
२. पॅप स्मिअर
पॅप स्मिअर टेस्ट ही एक स्क्रीनिंग टेस्ट आहे. त्याचा उपयोग साधारणत: सर्व्हायकल कॅन्सरसाठी केला जात असतो. पॅप स्मिअरमुळे गर्भाशयाच्या मुखाजवळील पेशींमध्ये झालेले कोणतेही अनपेक्षित बदल लवकर ओळखता येऊ शकतात; ज्यामुळे वेळेत उपचार केला जाऊ शकतो. ३० व्या वर्षापासून महिलांनी दर पाच ते दहा वर्षांनी गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगासाठी तपासणी केली पाहिजे.
३. STD टेस्ट
जर तुम्ही एकापेक्षा जास्त साथीदारांबरोबर शारीरिक संबंध प्रस्थापित करीत असाल किंवा ज्या स्त्रिया गर्भधारणेची योजना आखत असतील, त्यांनी ही चाचणी नक्कीच करावी. त्याद्वारे तुम्हाला लैंगिक आजाराचं निदान होतं.
४. रक्तदाब चाचणी
तिशीनंतर महिलांमध्ये रक्तदाबासंबंधीच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत. जास्त रक्तदाब हृदयविकाराचा धोका असल्याचा एक संकेत असतो. त्यामुळे महिलांनी वेळोवेळी रक्तदाब तपासणी केली पाहिजे.
५. स्तन तपासणी
प्रत्येक स्त्रीनं स्तनाच्या कर्करोगाची तपासणी केली पाहिजे. स्त्रियांमध्ये स्तनाच्या कर्करोगाच्या तपासणीसाठी स्त्रियांची स्वतःची स्तन तपासणी आणि मॅमोग्राम (स्तनांचा एक्स-रे) यांचा वापर केला जातो. स्तनामध्ये गाठ असल्यास, स्तनाच्या कर्करोगाची कोणतीही प्रारंभिक लक्षणं दिसल्यास याद्वारे ते ओळखलं जाऊ शकतं. लक्षणं वेळीच लक्षात आली तर उपचारही सुकर होतात
६. लिपिड प्रोफाइल
लिपिड प्रोफाइल चाचणी रक्तातील विशिष्ट चरबीच्या रेणूंचं प्रमाण मोजतं. या चाचणीत अनेक प्रकारचं कोलेस्टेरॉल शोधले जाऊ शकतात. ही चाचणी हृदयरोग आणि रक्तवाहिन्यांचं आरोग्य तपासण्यासाठी मदत करते. लिपिड प्रोफाइलचा मागोवा घेतल्यास खाण्याच्या सवयी, आहार, तणाव, व्यायाम व जीवनशैली सुधारता येते.
७. मधुमेह
आजकाल मधुमेह हा आजार खूप सामान्य झाला आहे. जगातील बरेचसे लोक या आजाराने ग्रस्त असतात. ३५ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या महिलांनी प्री-डायबिटीज किंवा मधुमेह तपासण्यासाठी दर तीन वर्षांनी रक्तातील ग्लुकोजची तपासणी केली पाहिजे. जर एखादी स्त्री लठ्ठ असेल किंवा आनुवंशिक मधुमेहाची पार्श्वभूमी असेल तर लवकर तपासणी करणे आवश्यक आहे. हृदयरोग, कमी दिसू लागणे व किडनी रोग यांसारख्या गंभीर दीर्घकालीन आरोग्य समस्या टाळण्यासाठी तुमच्या रक्तातील साखरेची पातळी किती आहे, याकडे लक्ष ठेवणे गरजेचे आहे.
८. जीवनसत्त्व ड चाचणी
महिलांचं वय वाढलं की, त्यांच्या शरीरात ड जीवनसत्वाची कमतरता भासते. त्यामुळे अनेक आजारांचा धोका वाढतो. हे पोषक घटक महिलांसाठी खूप महत्त्वाचे आहेत. ही चाचणी रक्तातली ‘ड’ जीवनसत्वाची पातळी मोजतं. निरोगी हाडे आणि दात, तसेच रोगप्रतिकारक शक्ती राखण्यासाठी जीवनसत्त्व ड महत्त्वाचं आहे.
९. हाडांची तपासणी
ऑस्टिओपोरोसिस हा एक आजार आहे; जो जगभरातील महिलांमध्ये मोठ्या प्रमाणात आढळतो. ऑस्टिओपोरोसिस आजारात हाडांना ठिसूळपणा येतो. हा एक प्रकारचा हाडांचा आजार असून, या आजारात हाडं ठिसूळ होतात. ऑस्टिओपोरोसिस ही एक अशी स्थिती आहे; ज्यामध्ये हाडे त्यांची ताकद गमावतात आणि सामान्यत: किरकोळ झटका किंवा पडल्यानंतर फ्रॅक्चर होण्याची शक्यता असते. त्यामुळे चाळिशीनंतर हाडांची नियमित तपासणी करावी.
१०. थॅलेसेमिया चाचणी
थॅलेसेमिया आजाराबाबत आजही बहुतांश महिलांना माहिती नाही. थॅलेसेमिया हा एक आनुवंशिक आजार आहे; जो पालकांद्वारे मुलांमध्ये जातो. जर आई-वडील दोघांनाही थॅलेसेमिया असेल, तर मुलाला थॅलेसेमिया आजार होण्याची शक्यता असते; ज्यामुळे थॅलेसेमिया आणि इतर हिमोग्लोबिनोपॅथी आणि लैंगिक संक्रमित रोगांसारख्या रक्ताशी संबंधित विकारांसाठी रक्त तपासणी आवश्यक आहे. थॅलेसेमियाची चाचणी गरोदरपणात किंवा बाळ जन्मल्यावर करतात. तसेच यासाठी रक्ताची चाचणी कधीही करता येते.
११. ईसीजी
गेल्या काही वर्षांत बदलत्या जीवनशैलीसह विविध कारणांमुळे हृदयविकाराचं प्रमाण वाढलं आहे. हृदयाशी संबंधित आजार जीवघेणे ठरू शकतात. हार्ट अॅटॅक अर्थात हृदयविकाराचा झटका हे मृत्यूचं एक प्रमुख कारण आहे. हृदयाचे कार्य व्यवस्थित सुरू आहे की नाही हे पाहण्यासाठी ईसीजी चाचणी केली जाते.
महिलांच्या वयानुसार त्यांच्या शरीरात काही बदल होऊ लागतात. महिलांनी शरीराकडे लक्ष दिलं, तर वाढतं वय व चुकीची जीवनशैली यामुळं होणाऱ्या आजारांना त्यांना दूर ठेवता येऊ शकतं. निरोगी जीवनशैली राखण्याबरोबरच नियमित आरोग्य तपासणी करणंदेखील महत्त्वाचे आहे. प्रत्येक स्त्रीने तिच्या आहाराकडे विशेष लक्ष दिलं पाहिजे. वयाच्या ३० व्या वर्षी प्रत्येकाच्या आयुष्यात जबाबदाऱ्या येतात आणि जबाबदाऱ्यांच्याबरोबरीने तणावही येतो; परंतु यामुळे तुमच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे ताण व्यवस्थापनावर भर द्या. नियमित व्यायाम करा, चांगली झोप घ्या आणि आरोग्याची काळजी घ्या.