स्त्रिया आणि दागिने यांचं खूप घनिष्ट नातं आहे. स्त्रियांना श्रृंगार करण्यासाठी आणि सौंदर्य वाढवण्यासाठी दागिने परिधान करायला आवडतात, पण सर्वच स्त्रियांसाठी दागिने म्हणजे फक्त हौस नसते तर यामागे खूप मोठे अर्थकारण दडलेलं आहे. आज आपण समाजातील ती बाजू जाणून घेऊयात ज्याचा आपण कधीही विचारही करत नाही.
सराफाच्या दुकानात महिलांची तुफान गर्दी असते. सण-वार असो वा साडेतीन मुहूर्तापैकी एखादा मुहूर्त असो, महिलांना दागिने खरेदी करायला फक्त कारण हवं असतं. कारण, स्त्रियांना दागिन्यांचा प्रचंड मोह असतो. दागिने घालून मिरवणं त्यांच्यासाठी प्रतिष्ठेचा विषय असतो. हल्ली बाजारात अनेक ट्रेंडी दागिने येतात, मालिका-चित्रपटांतून प्रेरणा घेऊन अनेकजणी असे ट्रेंडी दागिनेही बनवतात. त्यामुळे स्त्रिया आणि दागिने यांच्यातील संबंध दिवसेंदिवस अतुट बनत चाललंय.
हो, हे खरंय. महिलांना दागिने परिधान करायला आवडतात. पण साज शृगारांसाठी महिलांना दागिने आवडतात का? तर, नाही. तुम्ही कधी नाण्याच्या दुसऱ्या बाजूविषयी विचार केलाय?
दागिने म्हणजे फक्त हौस नाही तर आर्थिक गुंतवणूक असते
घरात एखादं आर्थिक संकट आलं. पैशांची चणचण भासत असली तर तुम्ही सर्वात आधी काय करता? जास्तीत जास्त लोकं दागिने गहाण ठेवतात. घर, शेतीच्या पलीकडे सर्वात आधी दागिन्यांवर आपली नजर जाते. जेवढ्या हौशीने स्त्रिया दागिने घेतात तेवढ्याच तत्परतेने त्या दागिने गहाण ठेवण्यासही तयार होतात आणि आर्थिक अडचण दूर झाली की तेच दागिने सोडवून आणतात. त्यामुळे ही नकळत खूप चांगली आणि मोठी आर्थिक गुंतवणूक असते. ही गुंतवणूक अडीअडचणीच्या वेळी किंवा आर्थिक संकटाच्या वेळी खूप फायदेशीर ठरते.
हेही वाचा : महिला लढताहेत महिलांच्या सुरक्षेसाठी; जाणून घ्या महिला पीसीआर पथकाविषयी..
अनेक महिला दागिने खरेदी करतात पण परिधान करत नाही
अनेक महिला दागिने हौशीने खरेदी करतात पण त्यांना परिधान करायला आवडत नाही. त्या अनेकदा बेंटेक्स ज्वेलरी घालतात. त्या सोन्याचे दागिने सहसा बँक लॉकरमध्ये ठेवतात आणि गुंतवणूकीचा एक चांगला पर्याय म्हणून या दागिन्यांकडे बघतात.
डिजिटल गोल्डची मागणी
सध्या डिजिटल गोल्डची मागणी वाढताना दिसत आहे. डिजिटल गोल्ड हे ऑनलाइन सोने खरेदी करण्याची पद्धत आहे. कमी खर्चात सोने खरेदी करण्याचा हा एक प्रभावी पर्याय मानला जातो. डिजिटल गोल्डद्वारे तुम्ही सोन्याची खरेदी किंवा विक्री करू शकता.
दागिन्यांना केवळ आकर्षण न समजता आर्थिक गुंतवणूक किंवा संपत्ती समजणे खूप जास्त आवश्यक आहे. हौस किंवा प्रतिष्ठा म्हणून दागिने खरेदी करणे हा एक आवडीचा भाग असू शकतो पण दागिन्यांमध्ये केलेली गुंतवणूक ही काळाची गरज आहे. काही महिलांना दागिने खरेदी करायला आवडत नसेल तरी एक आर्थिक गुंतवणूक म्हणून दागिने खरेदी करा. ही गुंतवणूक कधीही वाया जाणार नाही.