“ या आठवड्यातच जास्त तास वेळ देऊन ही कामं निपटून टाक. पुढच्या आठवड्यात तुझे प्रॉब्लेम्स पुन्हा सुरू होतील. तेव्हा तू प्रोजेक्टमध्ये पूर्ण वेळ देऊ शकणार नाहीस ना?” मानसीच्या बॉसनं असं म्हटल्यावर तिनं चमकून त्यांच्याकडे बघितलं. ते शांत होते. आपल्याला दर महिन्यात येणाऱ्या पीरिएडचा खूप त्रास होतो हे जरी खरं असलं तरी त्याचा उल्लेख बॉसकडून ऐकल्यावर तिला जरा लाजिरवाणं झालं. यांना आपल्या पीरिएडच्या तारखा लक्षात आहेत या विचाराने ती जरा ओशाळली, लाजण्यासारखं, लपवण्यासारख्या त्यात काहीही नाही तरीही.

ही पूर्णपणे नैसर्गिक प्रक्रिया हे माहीत असतानाही तिला असा सरळ उल्लेख जरा खटकलाच. ओटीपोटात दुखणं हा त्रास सगळ्याच स्त्रियांना होतो असं नाही, पण काहींना असह्य त्रास होतो हेही तितकंच खरं. त्याकाळात आपले किमान दोन दिवस तरी खूप थकवा आणणारे असतात. कामावर परिणाम होतो मी मान्य करते. त्यावर उपाय करणं सुरू आहे, पण या विषयावरून ऑफिसमधील पुरुषांनी जरा सामंजस्य दाखवण्याची गरज आहे. निसर्गानेच ही जबाबदारी स्त्रियांवर टाकलेली आहे तर त्याचा विचार व्हायला हवा.

'Gir Mat Jaana': Viral MP Woman's Dance Fails To Impress Netizens funny video goes viral
गावच्या महिलेचा ट्रेंडिंग गाण्यावर तुफान डान्स; मारल्या अशा स्टेप की VIDEO पाहून पोट दुखेपर्यंत हसाल
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
ATM money theft pune, thief caught pune,
पुणे : एटीएममधून रोकड चोरणाऱ्या चोरट्याला पकडले; सुरक्षारक्षक, वाहतूक पोलिसांची तत्परता
Market Technique Stock Market
बाजाराचा तंत्र-कल : शेअर बाजाराला बाळसं की सूज?
Ramesh Chennithala Nana Patole
Congress : बंडखोरांविरोधात काँग्रेस अ‍ॅक्शन मोडवर, मतदानाच्या १० दिवस आधी १६ जण निलंबित
Two girls fighting at collage over a guy shocking video viral on social media
प्रेमासाठी काय पण! एका बॉयफ्रेंडसाठी दोन तरुणींचा झिंज्या उपटत तुफान राडा; VIDEO पाहून व्हाल हैराण
Will Ramdas Athawale take care of BJP or Republican workers
रामदास आठवले भाजपला सांभाळणार की रिपब्लिकन कार्यकर्त्यांना?
maha vikas aghadi releases manifesto for maharashtra assembly poll 2024
महिला, शेतकऱ्यांवर आश्वासनांची खैरात; मविआचा ‘महाराष्ट्रनामा’ जाहीर

हेही वाचा… उचकीने हैराण

दोन महिन्यांपूर्वी ऑफिसमधील तिची मैत्रीण शेफाली सांगत होती, की लंच टाईममध्ये ऑफिसमधील तरुणांमध्ये स्त्रियांचे पीरियड यावर चेष्टा मस्करी चालू होती. एकजण म्हणाला, “ या बायकांचं बरं असतं पोट दुखतंय, बरं वाटत नाही या सबबी खाली दोन-तीन दिवस कामातून मस्त सुटका करून घेतात. खरंतर इतका त्रास नसतो होत बरं का! मलाही बहीण आहे ती नाही असली काही कारणं पुढे करत. ” दुसरा म्हणाला, ‘बाईपणाची जबाबदारी’ या सबबीखाली स्त्रिया खूप सहानुभूती गोळा करत असतात. आपण त्यांच्यापेक्षा कितीतरी जास्त काम करतो खरंतर.”

हेही वाचा… शासकीय योजना: विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान

अनेक ऑफिसमध्ये स्त्रियांना पीरियड्सच्या काळात गरज पडल्यास विनातक्रार सुट्टी देण्यात येते. पूर्वीपेक्षा आजचा पुरुषवर्ग या बाबत बराच ‘साक्षर’ आहे. घरात आई किंवा बहीण मोकळेपणानं बोलत असतील तर या विषयावर त्यांच्या वागण्या बोलण्यात सहजता असते. ती सहजता येणं गरजेचं आहे. त्याबद्दल बाऊ न करता थोडी संवेदनशीलता असणं आवश्यक आहे. या बाबतीत जान्हवी नशीबवान म्हणायची. एकदा ती ऑफिसमध्ये असताना तिच्या शेजारच्या डेस्क वरील अमोघने तिच्याजवळ येऊन तिला अगदी सौम्य शब्दात सांगितलं. “जान्हवी, तुझ्या लक्षात आलेलं दिसत नाही, पण तुला ताबडतोब ‘वॉशरूम’मध्ये जाण्याची गरज आहे. ओढणी गुंडाळून घे, आणि काही मदत लागली तर विनासंकोच मला सांग.” तिच्या डिपार्टेंटमध्ये ती एकटीच स्त्री असल्याने तिनं त्याचीच मदत घेतली आणि तारखेला न जुमानता अचानक उद्भवलेल्या या प्रसंगाचा सामना केला. तिला आठवलं, की कॉलेजमध्ये कुण्या नालायक मुलाने वर्गातील मुलींची नावं आणि त्यांच्या संभाव्य पिरियड्सच्या तारखा बोर्डवर लिहिल्या होत्या. त्यावेळी प्रिन्सिपलांनी संपूर्ण कॉलेजला हॉलमध्ये एकत्र बोलावून एक माहितीपूर्ण लेक्चर दिलं होतं. तेव्हा पासून मुलांच्या वागण्यात खूपच फरक पडला.

हेही वाचा… ‘लिव्ह इन’ आणि बलात्काराच्या गुन्ह्याची गुंतागुंत!

मोठ्या शहरात ऑफिस आणि खासगी कंपन्यांमध्ये स्त्रियांसाठी स्वच्छतागृहात उत्तम सोय असते, पण इतर लहान शहरं आणि गावात अत्यंत वाईट अवस्था असते. या स्त्रियांना वाटतं, की आम्हाला जास्तीची सवलत नका देऊ, आम्ही वेदना सहन करत काम करू, सुट्टी नाही घेणार, पण किमान गरजा तरी पुरवल्या गेल्याच पाहिजेत. सहकर्मी पुरुषांची सहानुभूती आम्हाला नको, पण निदान टिंगल तरी करू नका.

सध्या एक आशेचा किरण म्हणजे पुरुषांच्या मानसिकतेत या हळूहळू बदल होत आहेत. आजची आई जागरूक होत असल्याने एक काळ असा येईल, की या विषयावर संपूर्ण समाजात सहजता येईल. त्यावर मोकळेपणाने बोललं जाईल. अगदी ऑफिसेसमध्येही तो दिवस नक्की येईलच.

adaparnadeshpande@gmail.com