सई, ए सई… काय गं, काल तू शॉपिंगला गेली होतीस ना? दिवाळीसाठी काही घेतलंस का? की नुसताच टाईमपास करुन आलीस. माझ्या एका जवळच्या मैत्रिणीला फार सहजच विचारलेला हा प्रश्न आणि त्या प्रश्नानंतर तिने वाचलेला शॉपिंगचा पाढा…

रविवारचा दिवस होता. तशी सुट्टी असल्याने मी घरीच टाईमपास करत होती. तेवढ्यात एका ऑनलाईन शॉपिंग अॅपवरची ५० टक्के ऑफरची जाहिरात पाहिली. ते अॅप डाऊनलोड केलं आणि माझं स्क्रोलिंग सुरु केले. त्यातील दोन तीन ड्रेस, एक जिन्स मी विशलिस्ट करुन ठेवली. काही वेळाने मला पटकन लक्षात आलं, काल आमच्या सईबाई शॉपिंग करुन आल्यात. मग म्हटलं चला जरा जाऊन बघून तरी येऊ काय नवं खरेदी केलंय? आणि मी तिच्या घरी गेली. घरी गेल्यावर तिला काय घेतलं… वगैरे? टिपिकल प्रश्न विचारले. त्यावर ती म्हणाली “काय घेणार गं… त्या मॉलमध्ये…. सर्व वस्तू इतक्या महाग झाल्यात की काहीही घ्यावं वाटलं नाही. त्यातल्या त्यात दोन कुर्ती आणि एक जिन्स घेतली. त्यापण जरा डिस्काऊंट वाटला म्हणून…. नाहीतर मी काही ते घेतलं नसतं बाबा..”. तिचे हे संभाषण ऐकल्यानंतर मला शॉपिंगला जाणाऱ्या विविध महिला आठवल्या आणि घडणारे गमतीशीर किस्सेही…
आणखी वाचा : महिलांच्या नटण्या-मुरडण्यात ‘पुरुषांचा’ अडथळा

Garlic Rate, Vegetable Rate, Pune, Garlic,
लसूण महागला, परराज्यातील लसणाची आवक कमी
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Advice from Uttar Pradesh State Commission for Women to male tailors
‘पुरुष शिंप्यांनी महिलांचे माप घेऊ नये’ ; उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाचा सल्ला
women are saying no to sex after Trumps win
डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयानंतर अमेरिकेतील महिलांचा लैंगिक संबंधास नकार; कारण काय? काय आहे 4B चळवळ?
Commodification of beauty
स्त्री ‘वि’श्व : सौंदर्याचं वस्तूकरण
Women Fall From A Plastic Bucket While Standing On It To Check The Quality Funny Video Viral
“देवा काय करावं या बायकांचं?” क्वालिटी चेक करायला १५० रुपयांच्या बादलीवर उभी राहिली अन् तोल गेला; VIDEO पाहून पोट धरुन हसाल
peticoat cancer
साडी नेसणार्‍या महिलांना ‘पेटिकोट कॅन्सर’चा धोका? हा प्रकार काय आहे? अभ्यास काय सांगतो?
Mumbai woman lost rupees 6 lakhs
मुंबई : ऑनलाईन वस्तू विकणे महागात, महिलेला लाखोंचा गंडा

खरेदी किंवा शॉपिंग हा विषय सगळ्यांच्याच जिव्हाळ्याचा असतो. पण या विषयातील एक्सपर्ट म्हणून कायमच महिलांकडे बोटं दाखवलं जातं. प्रत्येक महिलेची खरेदी करण्याची पद्धत ही वेगळी असते. महिला एक दिवा घेण्यासाठी संपूर्ण मार्केट पालथं घालतात. चार दुकानात जाऊन त्याची चौकशी करतात, डिझाईन बघतात, त्याचे वजन बघतात आणि यानंतर भावही करतात. एवढं सर्व करुनही क्वॉलिटी वस्तू खरेदी करण्यात त्या कुठेही कमी पडत नाही. त्यांनी आणलेली प्रत्येक गोष्ट ही योग्य किंमतीत आणि क्वॉलिटीची तर असतेच, पण त्याबरोबरच जवळपास तास-दीड तास घालवून ती खरेदी केलेली असते. त्यामुळे त्याची किंमत फारच वाढते.

पण रस्त्यावरील दुकानात छोटी -मोठी खरेदी करणारी महिला आणि मॉलमध्ये खरेदी करण्यासाठी गेलेली महिला यात जमीन आसमानाचा फरक असतो. जर एखादी महिला ही कपडे खरेदी करण्यासाठी मॉलमध्ये गेली असेल तर ती हमखास चार ते पाच तास संपूर्ण मॉल फिरल्याशिवाय बाहेरच येत नाही. एखाद्या मॉलमध्ये गेल्यानंतर ती हेअरबॆण्डपासून पर्सपर्यंत सर्व गोष्टी ट्राय करुन पाहते. जर एका डिझाईनचे दोन हेअरबॆण्ड असतील तर ती कोणता चांगला दिसतो हे बघते आणि त्यानंतर तिच्याकडे त्या रंगाचा ड्रेस आहे का याचाही अंदाज मनातल्या मनात बांधते. यानंतर तिचा मोर्चा वळतो तो कुर्ती, टॉपकडे….
आणखी वाचा : मासिक पाळीच्या ‘त्या’ गोळ्या घेणं योग्य की अयोग्य?

मॉलमध्ये गेल्यानंतर इतके पर्याय असतात की ते बघूनच डोळे फिरतात. हा घेऊ की तो घेऊ असं करत करत शॉपिंगच्या बॅगेत किमान सात-आठ टॉप तरी जातात. त्यानंतर मग वनपीस, प्लाझो, जिन्स, शॉर्ट यांचा तर विचार न केलेलाच बरा…. इतकं पाहिल्यानंतर थांबतील त्या महिला कसल्या… मग त्या थेट फुटवेअर सेक्शनकडे वळतात. तिकडे जाऊन त्या मन भरेपर्यंत विविध चपला बघतात. त्यानंतर मग आवडलेली चप्पल साईजमध्ये आहे की नाही हे ट्राय करुन बघतात. ती घालून मॉलमध्ये रॅम्पवॉकही करतात आणि जर ती व्यवस्थित वाटली तरच मग खरेदीपर्यंत विषय पोहोचतो.

यानंतर मग सहजच ती शॉपिंग बॅगमधल्या वस्तू घेऊन ट्रायल रुमकडे जाते. तिकडे जाऊन घेतलेल्या वस्तू नीट डोळ्यात तेल घालूून अगदी स्कॅन केल्याप्रमाणे पाहिल्या जातात. एखादा कुर्ता जास्त घट्ट वाटतोय का? त्याचा रंग आपल्याला शोभून दिसतोय का? त्याची डिझाईन चांगली वाटतेय का? त्यावर कोणता पायजमा योग्य वाटेल? याचा विचार तो घातल्यानंतर साधारणत: केला जातो आणि त्यावर तो घ्यायचा की नाही ते ठरतं. फक्त कपडेच नव्हे तर इतर सर्व गोष्टींच्या खरेदीतही या गोष्टी लागू होतात.
आणखी वाचा : ….अन् तेव्हा ती बाहुलीसारखी नटलेली दिसेल

अनेकदा एखाद्या गोष्टींची किमत ही फार जास्त असते. मग मात्र महिलांना जड अंतःकरणाने ती वस्तू तिथेच सोडून यावी लागते. कित्येकदा त्या पद्धतीची, त्याला मॅच होणारी दुसरी वस्तू खरेदी केली जाते. पण शेवटी सोनं आणि पितळ यातला फरक महिलांना जरा लवकर कळतोच ना… पण काय करणार बिचाऱ्या? शेवटी महिलाच त्या… एक एक पैशाचा हिशेब बरोबर ठेवणाऱ्या…!!

साड्यांच्या खरेदीबद्दल जितकं बोलू तितकं कमीच आहे. सर्व महिलांचा आवडीचा आणि जिव्हाळ्याचा विषय म्हणजे साडी…! प्रत्येक महिलेच्या घरी कपाटात ढिगाने भरलेल्या साड्या असतात. पण तरीही दुकानात गेल्यावर तिला दोन तरी नवीन साड्या हव्याच असतात. पुढच्या महिन्यात याचं लग्न आहे अहो… असं म्हणत एखादी साडी खरेदी केली जाते. तर काही महिन्यांनी ही डिझाईन नवीन आहे, आपल्याकडे असा रंगही नाही म्हणत नवऱ्यांच्या खिशाला फोडणी दिली जाते. कधी कधी तर तुम्ही मला कधीच काहीही घेऊन देत नाही, असं इमोशनल करतही नवीन साड्या खरेदी केल्या जातात. पण महिलांची शॉपिंगची हौस काही कमी होत नाही.

रस्त्याच्या शेजारी दिवा खरेदी करण्यापासून ते अगदी डिझायनर साड्या खरेदी करेपर्यंत महिलांना शॉपिंगमध्ये बराच वाव असतो. यात त्यांना वेळ, काळ अगदी कशाचंही बंधन नसतं. ट्रेनमध्ये सामान विकायला येणारी महिला जर एखादी नेलपेंट २० रुपयाला विकत असेल तर तिलाही ५० ला तीन देणार का? असे सहज विचारले जाते आणि ती देखील ‘ले लो दीदी’ असं म्हणतं घेण्याचा इशारा करते. यातून महिलांचे शॉपिंग स्कील दिसून येते आणि पुरुषवर्ग मात्र कायमच इथे मागे पडतो. म्हणूनच शॉपिंग म्हटलं की महिलांचा चेहरा अगदी खुलतो आणि पुरुषांचा मात्र मावळतो हे एक अधोरेखित सत्य आहे.