Women Six Pack Abs : गेल्या काही वर्षांपासून अनेक फिटनेस फ्रीक महिलाही सिक्स पॅक ॲब्स ठेवू लागल्या आहेत. आकर्षक आणि फिट शरीरयष्टीसाठी अनेक महिला सिक्स पॅक्स ॲब्स मिळवतात. पण महिलांच्या आरोग्यासाठी ते कितपत आरोग्यदायी आहे? याबाबत अनेक वाद विवाद आहेत. यामुळे त्यांच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो, असं काही वैद्यकीय तज्ज्ञांचं मत आहे, तर काही तज्ज्ञांच्या मते सिक्स पॅक्स ॲब्स महिलांच्या एकूणच सामाजिक वृद्धीसाठी आवश्यक आहे.

महिलांमध्ये १२ टक्के चरबीची आवश्यकता

इन्फ्लुअन्सर डॉ इद्रीस मुघल यांनी इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या मुलाखतीत म्हटलंय की, एक निरोगी महिला देखील शरीरात कमी चरबी ठेवून सिक्स पॅक (Women Six Pack Abs) दाखवू शकते. परंतु, त्यामुळे आदर्शवादी असलेला आकर्षक शरीरबांधा तयार होत नाही. असा प्रयत्न करणाऱ्यांना संभाव्य धोके जाणून घेणे महत्त्वाचे आहे. पुरुषांच्या शरीरात आवश्यक चरबी सुमारे तीन टक्के असते तर महिलांमध्ये सुमारे १२ टक्के आवश्यक चरबी असते जी चांगल्या पुनरुत्पादक आरोग्यासाठी आवश्यक असते. अनेक महिला खेळाडूंमध्ये आवश्यकेतपेक्षा कमी चरबी असते. त्यामुळे त्यांना अनियमित मासिक पाळी, दीर्घकालीन ताण अशासारख्य समस्यांना समोरं जावं लागतं”, याकडेही त्यांनी लक्ष वेधलं.

Counseling center for victimized women in Thane district
ठाणे जिल्ह्यात पीडित महिलांसाठी समुपदेशन केंद्र
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
premature birth misunderstanding about babies born at 8 months not to survive
स्त्री आरोग्य : आठव्या महिन्यातलं मूल वाचत नाही?
Nylon manja seller arrested in Nashik Road area
नाशिकरोड परिसरात नायलॉन मांजा विक्रेता ताब्यात
Black Plastic Kitchenware May Look Nice But Could Be Harming Your Health: Latest Study Finds
महिलांनो तुम्हीही स्वयंपाकघरात काळी भांडी वापरता? परिणाम वाचून पायाखालची जमीन सरकेल
fake Goods Market Pune, fake Goods, Market Pune,
शहरबात… बनावट मालाच्या बाजारपेठांना रोखणार कोण?
Chhoti Tara Tadoba , Tadoba Chhoti Tara Tiger Calf Video, Chhoti Tara Tiger,
VIDEO : ‘तिने’ सहावेळा मातृत्त्वाचा अनुभव घेतला, पण आता…
sex ratio of birth in nashik municipal corporation
जिल्ह्यात लिंगोत्तर प्रमाणात घट; लिंग चाचणीची दक्षता समिती बैठकीत साशंकता

हेही वाचा >> Women Need More Sleep: पुरुषांपेक्षा महिलांनी ‘इतके’ मिनिटं जास्त झोपावे? यामागचं नेमकं कारण काय? पाहा संशोधन नेमकं काय सांगते…

भविष्यातील परिणामांचा विचार करणं आवश्यक

बंगलोरच्या अपोलो स्पेक्ट्रा हॉस्पिटल्सया क्लिनिकल डायटीशियन डॉ. ट्विन्सी ॲन सुनील म्हणतात, “जरी सिक्स-पॅक ॲब्स (Women Six Pack Abs) काहींसाठी फिटनेसचं प्रतीक असलं तरीही महिलांनी हे ध्येय पूर्ण करण्याच्या व्यापक परिणामांचा विचार करणं महत्त्वाचं आहे.

निरोगी जीवनशैली बनते

मल्टीफिटच्या संचालिका आणि फिटनेस तज्ज्ञ दीप्ती शर्मा म्हणाल्या, “सिक्स-पॅक ॲब्स (Women Six Pack Abs) प्राप्त केल्याने अनेक आरोग्याचे फायदे मिळू शकतात. यामुळे कोर स्ट्रेंथ वाढते. मणक्याला आधार मिळतो, पाठदुखीचा धोका कमी होतो, संतुलन आणि स्थिरता सुधारते. याव्यतिरिक्त, सिक्स पॅक ॲब्ससाठी निरोगी जीवनशैलीची शिस्त लागते. यामुळे नियमित व्यायाम होतो आणि सकस आहार केला जातो. परिणामी आरोग्य सुधारते.”

उच्च प्रतीच्या व्यायामामुळे तणाव, चिंता आणि खाण्याचा विकार वाढू शकतो

कल्टमधील फिटनेस तज्ज्ञ स्पुर्थी एस. म्हणतात की, उच्च प्रतीचा व्यायाम आणि अत्यंत कठोर आहार हार्मोन्सला हानी पोहोचवू शकतात. यामुळे पौष्टिकतेची कमतरता देखील होऊ शकते आणि तणाव, चिंता आणि खाण्याच्या विकारांचा धोका वाढू शकतो. तीव्र वर्कआउट्समुळे दुखापत देखील होऊ शकते.

पुरुषांपेक्षा महिलांना सिक्स पॅक्स ॲब्स मिळवणं अधिक आव्हानात्मक

“शरीरशास्त्रीय फरकांमुळे पुरुष आणि स्त्रिया व्यायाम आणि आहारास भिन्न प्रतिसाद देतात”, असं डॉ ट्विन्सी म्हणतात. महिलांच्या शरीरातील चरबीची टक्केवारी सामान्यत: जास्त असते आणि ते पुरुषांपेक्षा वेगळ्या पद्धतीने चरबीचे वितरण करतात, ज्यामुळे सिक्स-पॅक ॲब्स मिळवणे अधिक आव्हानात्मक होते. (Women Six Pack Abs)

त्यामुळे, महिलांनी सिक्स पॅक्स ॲब्स (Women Six Pack Abs) मिळवताना त्यांच्या फिटनेस ट्रेनर आणि वैद्यकीय तज्ज्ञांशी सल्लामसलत करूनच वर्कआऊट करावा, असं तज्ज्ञांचं मत आहे.

Story img Loader