Success Story: संतोष वसुनिया या मध्य प्रदेशातील झाबुआ या छोट्या शहरातील रहिवासी आहेत. कोरोनासारख्या काळात अनेकांनी शहरी भागातून ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात स्थलांतर केल्याचे त्यांनी पाहिले होते. रोजगाराच्या कमी झालेल्या संधी आणि वाढती आर्थिक असमानता यांमुळे संतोषने उदरनिर्वाहासाठी कमी पगाराची नोकरी न करता, सरळ स्वतःचा व्यवसाय सुरू केला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
४४ वर्षीय संतोष यांची स्वतःचा व्यवसाय करण्याची इच्छा होती. एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी सांगितले, “मी फक्त चार वर्षांची असताना माझ्या वडिलांचे निधन झाले. माझी आई रोजंदारीवर काम करायची. घरात ती एकटीच कमावणारी होती. घरच्या अशा परिस्थितीमुळे मी फक्त दहावीपर्यंतच शिकू शकले आणि नंतर लग्न करून माझ्या पती व दोन मुलांसह पेटलावाडला स्थायिक झाले.”
मात्र, त्यांच्या मनात स्वावलंबी होण्याची नेहमीच इच्छा होती. त्यामुळे त्यांनी सौंदर्य उत्पादनांचे स्वतःचे दुकान उघडण्याच्या स्वप्नपूर्तीच्या दिशेने त्यांनी वाटचाल करण्यास सुरुवात केली.
संतोष ट्रान्सफॉर्म रूरल इंडियाच्या (TRI) एंटरप्रेन्योरशिप फॅसिलिटेशन हब टीमच्या संपर्कात आल्या आणि त्यांच्या मदतीने त्यांनी स्वतःचा उद्योग सुरू करण्याची तयारी केली. त्यासाठी त्यांनी स्वतःची एक लाख रुपयांची बचत गुंतवली आणि पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम (PMEGP) अंतर्गत आर्थिक मदत म्हणून ३.७५ लाख रुपयेदेखील मिळवले. त्यांच्याकडे आता रिफ्रेशमेंट्स, सौंदर्य उत्पादने, सौंदर्यप्रसाधने इत्यादींचे यशस्वी स्टोअर आहे. आज त्या केवळ स्वतःसाठीच नाही, तर त्यांच्या कुटुंबालाही आर्थिक आधार देत आहेत.
लक्ष्मी वाणी यांची प्रेरणादायी कहाणी
संतोष यांच्याप्रमाणेच लक्ष्मी वाणी यांची कथा ग्रामीण भागातील महिलांसाठी खूप प्रेरणादायी आहे. कुटुंबाच्या आर्थिक परिस्थितीमुळे लक्ष्मी यांनी केवळ ११ वीपर्यंतच शिक्षण घेतले आणि लवकर लग्न केले. त्यांचे पती रोजंदारी कामगार असल्याने आणि त्यांच्या तीन मुलांचा शैक्षणिक खर्च भागवण्यासाठी लक्ष्मी यांनाही काहीतरी करण्याची इच्छा होती.
नवाली बुगुर्ग गावात TRI इंडियाच्या युथ हब टीमने आयोजित केलेल्या एंगेजमेंट ड्राइव्हमध्ये त्या सामील झाल्या. मग त्यांच्या मनात उद्योजकतेची आवड निर्माण झाली. त्यांना संगणकाची मूलभूत माहिती होती. त्यामुळे त्यांना कॉमन सर्व्हिस सेंटर (CSC) चालवावे, असं वाटू लागले.
युथ हब टीमने नंतर बरवानी येथील ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेशी (आरएसईटीआय) समन्वय साधून, त्यांची सहा दिवसांच्या निवासी सीएससी आयडी प्रशिक्षण आणि प्रमाणन अभ्यासक्रमासाठी नोंदणी केली.
आता त्या स्वत:चा सीएससी व्यवसाय चालवीत आहेत. त्यांच्या गावातील महिलांसाठी त्यांचा हा प्रवास प्रेरणादायी बनला आहे.
हेही वाचा: The Sky Queen: कॅन्सरवर मात करून सुरू केला स्वतःचा व्यवसाय अन् झाली करोडो रुपयांची मालकीण
या यशोगाथांबद्दल बोलताना, युथ इनिशिएटिव्ह ऑफ ट्रान्स्फॉर्म रूरल इंडियाचे अभ्यासक रणू कुमार सिंग म्हणतात, “यशाच्या या कथा तळागाळातील स्वयंसेवी संस्थांचे महत्त्व आणि आर्थिक साक्षरता व उद्योजकता, बाजार संशोधन, उत्पादन यांसाठी प्रशिक्षण देणाऱ्या हबची गरज स्पष्ट करतात. ग्रामीण युवक आणि महिलांना त्यांचा स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यास मदत करण्यासाठी विकास आणि इतर संबंधित कौशल्ये गरजेची आहेत.”