डॉ. उल्का नातू – गडम
हा सगळा आसनांचा सराव, खटाटोप आपण का करत आहोत? तर आपल्याला छान वाटले पाहिजे म्हणूनच! आपल्याला शारीरिक क्षमतेबरोबर मनाची प्रसन्नता देखील तितकीच महत्त्वाची आहे. आसने किती केली हा केवळ टीक मार्क करण्याचा विषय नाही, तर या साधनेला एक दर्जा प्राप्त झाला पाहिजे. आसनसाधना केल्यावर दोन्ही नाकपुड्या उघड्या आहेत हे जाणवले पाहिजे. थकवा न येता, मनाची टवटवीत अवस्था जाणवली पाहिजे. ‘Hasten Slowly’ हे स्वामी चिन्मयानंदाचे विधान खूप सूचक आणि खोलवर अर्थ असलेले आहे.
आपण पद्मासन, अर्ध पद्मासन अथवा सुखासनात केलेला पर्वतासनाचा सराव आपल्याला आठवत असेल. आता या पर्वतासनात स्थिर व्हा. तीन ते चार श्वासाची आवर्तने डोळे मिटून, लक्ष एकाग्र करून करा. आता सावकाश पाठकणा उजवीकडे वळवा. डोळे उघडे ठेवा. हे करीत असताना पुढे अथवा मागे झुकू नका. आता उजव्या बाजूवर दाब आहे. तर डाव्या बाजूला खेच जाणवतो आहे. या स्थितीत दीर्घ श्वसनाची चार आवर्तने करा. अंतिम स्थितीत डोळे मिटून लक्ष श्वासावर एकाग्र करा.
आता पुन्हा एकदा मध्यभागी स्थिर व्हा. आता पाठकणा डावीकडे वळवा हे करीत असताना डोळे उघडे ठेवा, श्वास रोखू नका.
अंतिम स्थितीत पुन्हा एकदा दीर्घश्वसनाची आवर्तने करा. तीन ते चार श्वास या स्थितीत थांबल्यावर पुन्हा एकदा पाठकणा मध्यभागी स्थिर करा.
याचप्रमाणे पाठकणा पाठच्या दिशेने व पुढे (Forward bending) वळवा. पाठकण्याला डाव्या व उजव्या बाजूला ट्विस्ट (अथवा पीळ) देऊन या आसनाचा सराव करता येईल.
थोडक्यात, पाठकण्याचे – हाता पायाच्या सांध्यांचे आरोग्य व श्वसनक्षमता सुधारण्यासाठी हे आसन खूप उपयुक्त आहे.
ulka.natu@gmail.com