-डॉ. किशोर अतनूरकर

आपला केशसंभार भरपूर आणि मनमोहक असावा असं अनेक तरुणींना वाटतं, पण यातील एक जरी केस चेहऱ्यावर असेल तर तो चिंतेचा विषय बनतो. एखाद्या स्त्रीच्या चेहऱ्यावर पुरुषांप्रमाणे केस असले तर ती फारच निराश होते. तिच्यात न्यूनगंड येऊ शकतो. शाळा, कॉलेज, अभ्यास, जेवण सगळं काही रुटीन व्यवस्थित चालू असतं, पण आरसा पहिला, की तिच्या मनातील अस्वस्थता वाढते, कुठेही जाण्या-येण्यातला उत्साह कमी होतो, अगदी मैत्रिणींना भेटणंही नकोस वाटतं. आरसा शत्रू होतो. आई-वडिलांना अर्थातच वेगळी चिंता. हा काय प्रकार आहे? कमी होईल की असाच राहील? तिचं लग्न जमवताना अडचणी येतील का? लग्न झालं तरी मूलबाळ होईल की नाही याची ही काळजी त्यांना लागून राहाते.

Miscarriages Frequently
स्त्री आरोग्य : वारंवार गर्भपात होतोय का?
how does suiceide pod work
इच्छामरणासाठी तयार करण्यात आलेले ‘सुसाईड पॉड’ काय आहेत? हे मशीन कसे कार्य करते? याची चर्चा का होत आहे?
Numerology: Why People Born on 9, 18, and 27 Tend to Be Angry and Cause Self-Loss
‘या’ तारखेला जन्मलेल्या लोकांच्या नेहमी नाकावर असतो राग, रागाच्या भरात करतात स्वत:चे नुकसान
rahul gandhi statement in america, prime minister narendra modi
राहुल गांधीनी मोदींच्या पावलावर पाऊल टाकलं तर एवढं काय बिघडलं?
pukar seva pratishthan ngo for destitute elderly homeless
रस्त्यावरील निराधार वृद्ध रुग्णांवर उपचार करणारा ‘सेवाव्रती’!
What does your eye discolouration say about your health? Dark Circles Solution
तुमच्या डोळ्यांचा रंग तुमच्या आरोग्याबद्दल काय सांगतो? जाणून घ्या डॉक्टर काय सांगतात…
Take care of your scooter
‘या’ सोप्या टिप्सच्या मदतीने घ्या तुमच्या स्कुटीची काळजी; मिळेल जास्त अ‍ॅव्हरेज
Ladki Bahin Yojana, brothers, Ladki Bahin,
‘बहिणीं’नो, दीड हजार रुपयांसाठी ‘भावां’ना प्रश्न विचारण्याची ताकद गमावू नका…

मुलांना किशोरवयीन वयात दाढी-मिशा येतात, त्याच पद्धतीने काही तरुणींच्या चेहऱ्यावर केस येणं हे शरीरातील लैंगिक जीवनाशी संबंधित असलेल्या होर्मोन्स (sex hormones) च्या अस्वाभाविक स्त्रवणामुळे घडून येतं. असं होण्यामागे तिचा स्वतःचा काही दोष नसतो, निसर्गाचा निर्णय तिच्या बाबतीत जरा वेगळा असतो इतकंच. पुरुषाचं पुरुषपण जपण्याची जबाबदारी निसर्गानं टेस्टेस्टेरॉन या संप्रेरकाकडे (Hormone) दिलेली असते. टेस्टेस्टेरॉन मुलींमध्येदेखील तयार होत असतं, त्यामुळेच तर मुलींच्या शरीराच्या ठराविक भागांवर (काखेत आणि गुप्त भागावर) जास्त केस असतात, पण या संप्रेरकाचं प्रमाण अत्यंत अल्प असतं. जेव्हा या संप्रेरकाची निर्मिती काही कारणांमुळे वाढते किंवा त्याचा होणारा परिणाम बिघडतो तेंव्हा मुलींच्या चेहऱ्यावर जास्त केस येतात. याला इंग्रजीत ‘हिरसुटीझम’ असं म्हणतात.

आणखी वाचा-एकेकाळी मिस इंडिया होण्याचे स्वप्न पाहत होती, आज आहे IAS अधिकारी! तस्कीन खानची यथोगाथा

फक्त टेस्टेस्टेरॉनचं प्रमाण वाढल्यामुळेच असं होतं असं नसून त्या मुलीच्या केसांच्या मुळाशी असणाऱ्या त्वचेच्या पेशींवर असणाऱ्या receptorsच्या कार्यावर देखील ते अवलंबून असतं. या संप्रेरकच्या वाढण्याचा, त्याचं कार्य बिघडण्याचा प्रकार एखाद्या तरुणीतच का होतो अन्य तरुणींमध्ये का नाही? या मागील शास्त्रीय कारण नेमकेपणानं सांगता येत नाही पण ज्या मुलींना पीसीओडी (Polycystic Ovarian Disease/Syndrome) ची समस्या असते त्या मुलींच्या चेहऱ्यावर केस वाढण्याचा प्रकार आढळतो. त्या मुलीचं वजन वाढलेलं असतं आणि मासिकपाळीचं चक्र बिघडलेलं असतं, मासिकपाळी दोन-दोन, तीन-तीन महिने येत नाही. स्त्री-बीजांडाकोषातून स्त्री-बीज परिपक्व होऊन बाहेर पडण्याची प्रक्रिया (Ovulation) सामान्यतः बंद असते. तरुणींच्या चेहऱ्यावर केस येण्यामागे आणखी एक कारण असू शकतं. मूत्रपिंडाच्या (Kidney) वर ‘अड्रीनल ग्रंथी ’ (Adrenal Gland) असं एक छोटं अवयव सगळ्यांनाच असतं. टेस्टेस्टेरॉनच्या निर्मितीसाठी ही अड्रीनल ग्रंथी जबाबदार असते. या ग्रंथीचं कार्य बिघडल्यानंतरदेखील तरुणींच्या चेहऱ्यावर केस येऊ शकतात.

सर्वसाधारणपणे ‘हिरसुटीझम’ या समस्येचा इलाज कोणत्याही स्त्रीरोगतज्ञाकडून केला जाऊ शकतो. ही समस्या अधिक असणाऱ्या तरुणींना ‘एंडोक्रायनोलॉजिस्ट’ सुपरस्पेशालिस्ट डॉक्टरचं मत घेणं आवश्यक असतं. त्या तरुणीच्या फक्त चेहऱ्यावरच केस आहेत की शरीराच्या अन्य कुठल्या म्हणजे, छातीवर, पाठीवर, पोटावर, हाता-पायावर देखील आहेत हे तपासलं जातं. रक्तातील विविध हार्मोन्सची पातळी तपासली जाते. ही समस्या थायरॉइडचं कार्य बिघडल्यामुळे येते, असं लक्षात आल्यास आवश्यक त्या गोळ्या दिल्या जातात. रक्तामध्ये टेस्टेस्टेरॉन या होर्मोनचं प्रमाण वाढलं आहे असं आढळल्यास ते कमी होण्यासाठी औषधोपचार करावा लागतो. टेस्टेस्टेरॉन कमी करण्याच्या गोळ्या कमीत कमी सहा महिने तरी घ्याव्या लागतात.

आणखी वाचा-यूपीएससीसाठी इंजिनिअरिंगला केला रामराम; कोचिंगशिवाय बनली आयपीएस अधिकारी, कोण आहे यूपीची दबंग अंशिका वर्मा?

औषधोपचाराशिवाय, ब्युटी पार्लरमध्ये जाणं, ब्लिचिंग, फेशियल, शेविंग. वॅक्सिन, इलेक्ट्रोलिसिस, लेसर उपचार पद्धतीचा देखील अवलंब केला जातो. या समस्येसाठी बिनाखर्चाचा जालीम उपाय म्हणजे वजन कमी करणं. बदलत्या जीवनशैलीमुळे आजकाल तरुण मुलींमध्ये लठ्ठपणाचं प्रमाण वाढलेलं दिसतंय, त्यामुळेच चेहऱ्यावर केस येणाऱ्या मुलींच्या संख्येत वाढ होताना दिसते. शरीरात असलेल्या फॅट किंवा चरबीमधे देखील हॉर्मोन्स तयार होण्याच्या घडामोडी चालू असतात, त्यात अँड्रोजन हे ‘पुरुषी’ संप्रेरक असतं. वजन कमी केल्यानंतर टेस्टेस्टेरॉन नावाच्या हॉर्मोनचं प्रमाण कमी झाल्याने या समस्येसाठी दिल्या जाणाऱ्या औषधाचा सकारात्मक परिणाम घडून येण्यास मदत होते.

वरील गोष्टी समजून, डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे तपासणी व उपचार केल्यास तरुणींच्या चेहऱ्यावर येणाऱ्या केसांची समस्या निश्चित दूर होऊ शकते. मात्र त्यासाठी निराश होण्याची गरज नाही. आपला आत्मविश्वास कमी होऊ देऊ नका. वेळोवेळी तज्ञ डॉक्टरांच्या भेटी, आवश्यक त्या तपासण्या, औषधोपचार आणि वजन कमी करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केल्यास ही समस्या निश्चितपणे दूर होईल आणि तुम्हाला आनंदानं आरसा पाहावासा वाटेल.

(लेखक एम. डी. (स्त्रीरोग आणि प्रसूतिशास्त्र) तसेच पीएच.डी. (समाजशास्त्र) आणि एम एस (काउन्सेलिंग आणि सायकोथेरपी) आहेत.)

atnurkarkishore@gmail.com