स्त्रिया वापरतात ते ‘शेपवेअर’ अजून आपल्याकडे तितकंसं रूढ झालेलं नाही. आपल्याकडे दररोजच्या वापराला बहुसंख्य स्त्रिया सलवार-कमीज, कुडता-लेगिंग, जीन्स/ट्राऊझर- टॉप किंवा साडी असेच कपडे वापरतात. या कपड्यांच्या आत नुसता ‘कॅमिसोल’ (हाफ स्लिप) घातली किंवा चांगल्या फिटिंगची ‘ब्रा’ जरी घातली तरी कम्फर्टेबल वाटू शकतं. पण पाश्चिमात्य पद्धतीचे कपडे घालताना त्याच्या आत आपण काय घालतो यावर वरून दिसणारं फिटिंग अवलंबून असतं. इथे योग्य प्रकारच्या शेपवेअरची मदत होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आणखी वाचा : आई न होणाऱ्या स्त्रीला स्वार्थी ठरवले जाणे दु:खद: – जेनिफर अ‍ॅनिस्टन

पाश्चिमात्य कपड्यांच्या आत घातल्या जाणाऱ्या शेपवेअरमध्ये तीन प्रमुख प्रकार असतात.

१) ‘हाय वेस्ट अंडरवेअर’ प्रकारचं शेपवेअर
हे शेपवेअर पोटाच्या वरपर्यंत येतं आणि कपड्यांच्या वरून लूक स्लीक आणि ‘सीमलेस’ दिसेल अशा प्रकारे फिनिश देतं. विशिष्ट प्रकारच्या पातळ आणि ‘ब्रीदेबल’ कापडापासून हे बनवलं जातं. ते प्रसंगी अंतर्वस्त्रासारखंही वापरलं जाऊ शकत असल्यानं त्याला ‘कॉटन गसेट’सारख्या कापडाचं अस्तर लावलेलं असणं अपेक्षित असतं. बाजारात वा ऑनलाईन ॲप्सवर दिसणाऱ्या काही हाय वेस्ट अंडरवेअर शेपवेअर्समध्ये खालच्या बाजूस बटणांची सोय केलेली असते. त्यामुळे टॉयलेटला जाताना शेपवेअर वरून घाली घेण्यापेक्षा खालच्या खाली बटणं काढून टॉयलेटला जाता येतं. मात्र ही सोय सर्वच शेपवेअर्सना नसते. हे शेपवेअर पोटावरून खाली सरकू नये म्हणू त्या जागी सिलिकॉन मटेरियलची अंडरवेअरच्या इलॅस्टिकसारखी, पण स्मूथ अशी टेप शेपवेअरमध्येच शिवलेली असते. कंबर (वेस्ट) आणि नितंबांवरचं (हिप्स) माप घेऊन या शेपवेअरचा आपला साईज कोणता ते ठरवलं जातं. मात्र शेपवेअरमध्ये कम्फर्टेबल वाटणं फार गरजेचं असल्यानं साईजसाठी शक्यतो ते घालून पाहावं.

आणखी वाचा : एकटेपणा, साचलेपण छंदच दूर करतात- अभिनेत्री सारिका

२) ‘बायकर शॉर्ट’सारखं शेपवेअर
व्यायाम करताना, विशेषत: सायकल चालवताना अनेक जण बायकर शॉर्ट वापरतात. ही स्ट्रेचेबल कापडाची फिटिंगमध्ये बसणारी आणि मांड्या झाकल्या जातील अशी शॉर्टस् असते. या प्रकारचं शेपवेअरही शॉर्टसारखंच असतं, मात्र त्याला ‘हाय वेस्ट’ असते. गुडघ्यापर्यंतच्या पाश्चात्य ड्रेसमध्ये हे शेपवेअर घालून अधिक कम्फर्टेबल वाटू शकतं आणि मोकळेपणानं वावरता येतं.

आणखी वाचा : अभियंता ते लेफ्टनंट गव्हर्नर…असा आहे अरुणा मिलर यांचा प्रवास

३) बॉडीसूट शेपवेअर
बॉडीसूट शेपवेअरचा आकारही हाय वेस्ट अंडवेअरसारखाच असतो, मात्र त्याला खांद्यावर बसणारे स्ट्रॅप्स असतात. काही शेपवेअरमध्ये हे स्ट्रॅप्स ‘ॲडजस्टेबल’ही असतात. त्यामुळे शेपवेअर जागेवरून हलत नाही. काहीसं स्विमिंग कॉश्च्यूमसारखंच म्हणा ना! मात्र या शेपवेअरला ‘बस्ट’चा भाग नसतो. अर्थातच आपल्याला हवी ती ब्रा त्याच्या आत घालायची असते. बॉडीसूट शेपवेअरमध्येही हाय वेस्ट अंडरवेअर आणि बायकर शॉर्टस् अशा दोन्ही प्रकारची शेपवेअर्स बाजारात दिसतात.

आणखी वाचा : स्त्रियांनो, मधुमेह टाळण्यासाठी काळजी घ्या!

शेपवेअर घालताना-

  • शेपवेअर चांगल्या दर्जाचं- म्हणजे अति घट्ट न बसणारं, ब्रीदेबल कापडाचंच हवं.
  • फार घट्ट शेपवेअर आणि फार वेळ घातलं तर ते त्रासदायक ठरू शकतं.
  • तुम्हाला शेपवेअर वापरण्याची सवय नसेल, तर आधी ते घरात घालून काही काळ वावरून पाहा. तुम्हाला त्यात चांगलं वाटतंय का याचा त्यानं अंदाज येईल.
  • आपलं आरोग्य आणि कम्फर्ट यापेक्षा काहीही महत्त्वाचं नाही, हे लक्षात असू द्या!

आणखी वाचा : नातेसंबंध : हरवलेल्या बाबाची कहाणी

शेपवेअरची काळजी कशी घ्यावी-

  • शेपवेअर अंगाबरोबर बसत असल्यानं त्यात घाम शोषला गेलेला असतो. त्यामुळे प्रत्येक वापरानंतर ते हातानंच आणि सौम्य डिटर्जंट वापरून गार पाण्यात धुवावं असं सांगितलं जातं.
  • शेपवेअर मशीनमध्ये धुतलं, पाणी निथळण्यासाठी खूप घट्ट पिळलं किंवा ड्रायक्लीन केलं तर ते सैल पडू शकतं.
  • शेपवेअर साधं वाळवायचं असतं. त्यावर इस्त्री करत नाहीत.

‘शेपवेअर’ हे फक्त बारीक दिसण्यासाठी असतं हा समज बरोबर नव्हे, हे आता तुमच्या लक्षात आलं असेलच. चांगल्या दर्जाचं आणि कम्फर्टेबल शेपवेअर निवडलंत, तर इतर कपड्यांप्रमाणेच पाश्चिमात्य ड्रेसेसमध्येही आत्मविश्वासानं वावरायला त्याची मदत होईल.

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Womens shapeware bodysuit fashion trend vp