सोहा अली खान
अभिनेता कुणाल खेमू आणि मी एकमेकांच्या प्रेमात पडलो, पण आम्ही लग्न तसं उशिराच केलं आणि बाळाचा विचारदेखील उशिराच केला. आई झाले तेव्हा मी चक्क चाळिशीच्या उंबरठ्यावर होते. आज माझं वय ४३ तर माझी लेक इनाया नवमी खेमू चार वर्षांची आहे. अम्मीने (शर्मिला टागोर ) मला वेळोवेळी कल्पना दिली होती, की मी आई व्हायचा विचार वयाच्या ३० आणि ३५ दरम्यान करायला हवा, पण मी ते तेव्हा फार सीरियसली घेतलं नाही. पण उशिरा लाभलेल्या मातृत्वामुळे मी इनायाबाबत अधिकच दक्ष, अधिकच सेंटी झाले!

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आणखी वाचा : ४७०० कोटींची मालमत्ता असणाऱ्या नेहा नारखेडे आहेत तरी कोण?

त्यामुळेच असेल, मी तिच्या जन्माआधीपासूनच माझे करियर दूरच ठेवले. ती आणि मी एवढंच माझं विश्व होतं. अर्थात कुणालची मदत होतीच, पण लहानग्या इनायाला उचकी लागली तरी मला टेन्शन येई. दूधपित्या वयात लहान बाळांना उचकी येणे फार चुकीचे- गैर नाही, पण म्हणतात ना…! असो, पण इनाया जसजशी मोठी होत गेली तसा तिचा स्वभाव, तिच्या सवयी कळत गेल्या आणि मी हळूहळू रिलॅक्स होत गेले. तिला वाढवण्यातील माझा आनंद वाढतच गेला आणि नंतरच मी थोड्याबहुत प्रमाणात आलेल्या करियर ऑफर्सचा विचार करू लागले.

आणखी वाचा : नवरात्रीचे नऊ रंग नेमके कसे ठरवले जातात? जाणून घ्या यामागे दडलेले गुपित

अर्थात मी खूप ऑफर्स स्वीकारल्या नाहीत, पण घराबाहेर पडले, कामात असले की एक प्रकारची अपराधित्वाची भावना मनात घर करायला लागायची. इनायाला माझ्याशिवाय कुणीही काळजीपूर्वक सांभाळू शकत नाही, असं उगाचच वाटत राहायचं. फार तर दिल्लीहून अम्मी जेव्हा मुंबईत आमच्या घरी राहायला यायची तेव्हाच फक्त मी पूर्णपणे रिलॅक्स असायची; पण इनाया लहान असताना तिचा खऱ्या अर्थाने मानसिक-भावनिक आधार वाटायचा मला. ती नसली आणि मी शूटिंगमध्ये असले की कधी एकदा घरी जाईन आणि इनायाला भेटेन, असं होतं. पूर्वी तर पॅनिक होणं हे नेहमीचं झालं होतं.

आणखी वाचा : कोण आहेत जॉर्जिया मेलोनी?

आता इनाया शाळेत जाते, ती ज्युनियर केजीमधून सीनियर केजीला जाईल, पण अवस्थ होणे थांबलेल नाही. त्याच दरम्यान, माझ्यासारख्या अनेक आई माझ्या पाहण्यात आल्या, त्यांच्याशी माझं सहज बोलणं होई तेव्हा जाणवलं, आपल्या नॉर्मल बाळाला जर योग्य ‘डे केयर सेंटर’ किंवा ‘गव्हर्नेस’ किंवा जवळच्या नातेवाईक स्त्रीकडे सोपवले तर कामासाठी बाहेर जाणाऱ्या आईला अपराधाची भावना निर्माण होत नाही. तिचेही करियर अत्यंत महत्त्वाचे असते. तिचे कामच तिला आर्थिकदृष्टया स्वावलंबी करत असते. त्यामुळे त्यात खंत वा अपराधी वाटू नये. मी माझ्या मनाला ते समजावल्याने माझ्यातला अपराधीभाव कमी होतो आहे!

आणखी वाचा : घर आणि करिअर : वेळेचं उत्तम व्यवस्थापन

आणि हो, याबाबतीत माझ्या अम्मीचे सगळ्यात मोठे उदाहरण आहेच. अम्मीच्या कारकीर्दीतला आरंभीचा मोठा चित्रपट म्हणजे ‘आराधना’. या चित्रपटामधले ‘ओ मेरे सपनों की रानी कब आएगी तू’ या गाण्याच्या चित्रीकरणाच्या वेळी भाईच्या (सैफ अली खान) वेळेस ती गर्भवती होती. अम्मीला मी, भाई आणि सबाह अशी आम्ही तीन मुलं आणि त्या त्या वेळेस काही महिन्यांची मॅटर्निटी लीव्ह घेऊन ती पुढच्या चित्रपटांच्या शूटिंगला लागायची. घरातील स्टाफखेरीज आमचे अब्बाजान (मन्सूर अली खान पतोडी) देखील त्यांना शक्य होई तेव्हा आमची काळजी घ्यायचे. लग्नानंतरही अम्मीने आपलं करियर चालू ठेवलं त्यामागे अब्बाजान यांची खूप मोठी प्रेरणा होती. अम्मीला अभिनय आवडतो हे त्यांना ठाऊक होतं म्हणूनच त्यांनी तिला तिच्या आवडत्या कामापासून कधीच रोखलं नाही, उलट नेहमीच प्रोत्साहन दिलं. म्हणूनच ती तिचं आवडतं करियर अद्यापही करते आहे.

आणखी वाचा : “रवी सरांमुळे अरुंधती सापडली”

मला अम्मी आणि अब्बाजानचा कायम अभिमान वाटत आला आहे. अशा प्रोग्रेसिव्ह विचारांची अम्मी असूनही मी वाजवीपेक्षा जास्त इनायात गुंतले आणि करियरचा विचारही करू शकले नाही. पण असो, देर आये, दुरुस्त आये. मी आता करिअरही गंभीरपणे घेते आहे. योग्य वाटतील अशा ऑफर्स स्वीकारते आहे, त्यामुळेच सध्या ‘हश हश’ ही माझी मालिका ‘ॲमेझॉन’वर प्रसारित झालीय आणि पुन्हा एकदा शूटिंगला सुरुवात केल्याचा आनंद मला, कुणालला आणि अम्मीला झालाय. ‘वर्क और लाइफ, दोनो के साथ जिन्दगी बॅलन्स हो सकती है, इस बात का अनुभव मैं खुद महसूस कर रही हूं , माँ बनने का अनुभव बेहद खुशगवार होता है, लेकिन खुद को भूल जाना गलत होगा. क्यों नहीं एक माँ अपने साथ बच्चे पर भी उतना ही ध्यान दे सकती?

आणखी वाचा : दर्द होता है, वही मर्द होता है!

इनायाला आता दोन वर्षं पूर्ण झालीत आणि मी पुन्हा एकदा माझ्या करिअरचा विचार गांभीर्याने करायला लागले आहे. लिखाण, कामानिमित्त प्रवास, मित्रमैत्रिणींना भेटणं, वर्कआऊटसाठी पुरेसा वेळ देणं सुरू केलं आहे; पण तरीही मी पहिल्यापेक्षा आता खूप रिलॅक्स झालेय. इनायादेखील तिच्या लहानग्या फ्रेण्ड सर्कलमध्ये रमतेय हा खचितच माझा मोठा आनंद आहे.
एका आईने स्वतःसाठीही पुरेसा वेळ द्यायला हवा, हे आता मला पुरेपूर पटलं आहे.
samant.pooja@gmail.com