‘वर्ल्ड ट्रान्सप्लांट गेम’ ही जागतिक स्तरावर नावाजली क्रीडा स्पर्धा- ती आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक संघटनेतर्फे भरवली जाते. या स्पर्धेत फक्त तेच खेळाडू भाग घेऊ शकतात- ज्यांनी आपल्या शरीरातील एखादा अवयव दान केला आहे किंवा ज्यांच्या शरीरात एखाद्या अवयवाचे प्रत्यारोपण झाले आहे. या स्पर्धेमध्ये जगभरातून अवयवदान केलेले आणि प्रत्यारोपण केलेले खेळाडू मोठ्या संख्येने भाग घेतात. याच स्पर्धेत आपल्या देशातील एका महिला खेळाडूने एक जागतिक विक्रम प्रस्थापित करून देशाचे नाव उंचावले आहे.

क्रीडा जगतात अनेक प्रकारच्या स्पर्धा असतात, त्यापैकी आपल्याला फार फार तर विश्वचषक, ऑलिम्पिक, कॉमनवेल्थ, एशियन गेम्स, वर्ल्ड चॅम्पियनशिप एवढ्याच स्पर्धांची नावे माहीत असतात. ‘वर्ल्ड ट्रान्सप्लांट गेम’ ही जागतिक स्तरावर नावाजली क्रीडा स्पर्ध- ती आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक संघटनेतर्फे भरवली जाते. या स्पर्धेत फक्त तेच खेळाडू भाग घेऊ शकतात- ज्यांनी आपल्या शरीरातील एखादा अवयव दान केला आहे किंवा ज्यांच्या शरीरात एखाद्या अवयवाचे प्रत्यारोपण झाले आहे. या स्पर्धेमध्ये जगभरातून अवयवदान केलेले आणि प्रत्यारोपण केलेले खेळाडू मोठ्या संख्येने भाग घेतात. याच स्पर्धेत आपल्या देशातील एका महिला खेळाडूने एक जागतिक विक्रम प्रस्थापित करून देशाचे नाव उंचावले आहेया महिला खेळाडूचे नाव आहे ‘अंकिता श्रीवास्तव’. आपल्या देशात क्रीडा जगतात तर एकाहून एक सरस असे खेळाडू आहेत. कित्येक खेळाडू असे आहेत की प्रतिकूल परिस्थितीवर मात करून एक नवा इतिहास घडवतात. त्यांच्या जीवनाची संघर्षगाथा करोडो लोकांसाठी प्रेरणादायी कहाणी बनते. अंकिता श्रीवास्तवदेखील त्या खेळाडूंपैकीच एक आहे.

Gukesh becomes youngest-ever world champion
D Gukesh: डी गुकेश विश्वविजेता! भारताच्या बुद्धिबळपटूने घडवला इतिहास
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
hundred liver transplants at New Era Hospital in nagpur
अवयव दानाला बळ… मध्य भारतातील एकाच रुग्णालयात यकृत प्रत्यारोपणाचे शतक
Neelam Bhardwaj becomes youngest Indian woman Batter to hit List A double hundred
१३७ चेंडूत २०० धावा! भारताच्या लेकीने घडवला इतिहास; सर्वात कमी वयात द्विशतक झळकावणारी पहिली महिला फलंदाज
world chess championship loksatta
गुकेशच्या नवचैतन्याची कसोटी!
Religion shouldnt justify reservation
इथे मुद्दा मुस्लिमांच्या लांगूलचालनाचा नसून, आरक्षणाच्या निकषांचा आहे…
Vinayak Raut, BJP , former MP Vinayak Raut,
भाजपचे मताधिक्य गुणवत्तेवर नसून चोरी करून, माजी खासदार विनायक राऊत यांची टीका
hitendra thakur slams bjp for marathon
मॅरेथॉन घेण्याची ताकद आहे का? राजकारण करणार्‍या भाजपला हितेंद्र ठाकूरांचा सवाल

हेही वाचा : Women Ministers in Modi 3.0 : मोदींच्या मंत्रिमंडळात रक्षा खडसेंसह किती महिलांचा समावेश? केंद्रीय मंत्रिपदासाठी ‘या’ दोघींचीच निवड

अंकिता भोपाळची असून तिने आईला ७४ टक्के यकृत दान केले आहे. अंकिता १३ वर्षांची असताना तिच्या आईला लिव्हर सोरायसिसच्या आजाराचे निदान झाले. आईसाठी तिने आपले यकृत द्यायचे ठरवले, पण १८ वर्षे पूर्ण नसल्याने ते शक्य झाले नाही. दरम्यान आईवर औषधोपचार सुरू होते. १८ वर्ष पूर्ण झाल्यावर आपण आईला यकृत दान करू शकतो असे तिला वाटले, परंतु तिचे वजन कमी असल्याने तिच्या इच्छेस डॉक्टरांनी असमर्थता दर्शवली.

आईला यकृत दान करता यावे यासाठी आपले वजन वाढविण्यावर लक्ष केंद्रित केले व वजन वाढवून स्वत:ला पूर्णपणे सक्षम बनविले. शेवटी अंकिताने आपले ७४ टक्के यकृत दान केले, पण नशिबात काही वेगळंच लिहिलं होतं.

यकृत दान केल्यानंतर अंकिता जवळपास १८ दिवस आयसीयूमध्ये होती. बरी होण्यास तिला दीड-दोन महिन्यांचा कालावधी लागला. ती पूर्णपणे बरी होते न होते तोच तिसऱ्या महिन्यात तिच्या आईचं निधन झालं. या धक्क्यातून सावरत असतानाच तिचे वडीलही घर सोडून निघून गेेले. आता घरी असलेल्या आजी-आजोबांची जबाबदारीदेखील अंकितावर आली. घरखर्च चालवण्यासाठी, कॉलेजची फी भरण्यासाठी तिने भोपाळमधील एका पब्लिकेशन हाऊसमध्ये नोकरी केली. अंकिता शाळेत असताना स्विमिंग आणि फुलबॉलची राज्यस्तरीय खेळाडू होती. यकृतदानानंतर तिला तिच्याच नात्यातील व्यक्तीने वर्ल्ड ट्रान्स्प्लांट गेमबद्दल माहिती दिली व तिला २०१९ मध्ये होणाऱ्या स्पर्धेत भाग घ्यायला प्रवृत्त केले. ही स्पर्धा सुरू व्हायला सात – आठ महिने अवकाश होता. त्यास्पर्धेत सहभागी होण्यासाठी, स्वत:ला फिट ठेवण्यासाठी तिने सहा महिने अथक परिश्रम घेतले, सराव केला. अंकिताने भाग घेतलेल्या पहिल्याच स्पर्धेत लांब उडी आणि थ्रो बॉल स्पर्धेत ३ सुवर्णपदक आणि एक रौप्य पदक मिळवून पदार्पणातच जागतिक विक्रम बनवला आणि ती पहिली भारतीय आहे.

हेही वाचा : फायटर पूजा तोमरने रचला इतिहास, UFCमध्ये फाईट जिंकणारी पहिली भारतीय MMA फायटर

सध्या अंकिता व्हार्टन स्कूल ऑफ बिझनेस मधून एमबीएचं शिक्षण घेत आहे. हे शिक्षण घेत असतानाच पुढील स्पर्धेची तयारीदेखील सुरू आहे. अंकिता म्हणते, यकृत दानानंतर मला जाणवलं की आयुष्य खूपच बदललं आहे. यातून पूर्णपणे बरं होण्यासाठी जवळपास एक ते दीड वर्ष लागलं. सराव करताना समजलं की एका सामान्य माणसांच्या तुलनेत हे माझ्यासाठी खूप कठीण आहे. कठोर मेहनत करण्याशिवाय कोणताही पर्याय नाही. मी मेहनत करत राहिले आणि अखेर माझ्या मेहनतीला यश मिळालं.

हेही वाचा : तुम्ही ऑफिस आणि घर वेगळं ठेवता का?

अंकिता फक्त खेळाडू नसून ती एक उद्योजिका म्हणूनही नावरुपाला येत आहे. अनेक छोट्या छोट्या स्टार्ट अपची ती संस्थापिका आहे. तसेच आदर्श टेक्नोसॉफ्ट कंपनीची संचालकही आहे. भविष्यात देशासाठी अजून पदकं जिंकण्याची इच्छा आहे, त्यासाठी शिक्षण, व्यवसाय सांभाळत सरावसुद्धा कसोशीने करत आहे.

Story img Loader