Alice Walton Is The world’s Richest Woman : जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण असे विचारले तर तुमच्यापैकी अनेक जण टेस्ला कंपनीचे मालक एलॉन मस्क यांचे नाव पटकन सांगतील. पण, जगातील सर्वात श्रीमंत महिला कोण, असे विचारले तर अनेकांना याचे उत्तर सांगता येणार नाही. पण, आज आपण जगातील सर्वात श्रीमंत महिलेविषयी आणि तिच्या संपत्तीविषयी जाणून घेणार आहोत. ॲलिस वॉल्टन या जगातील सर्वात श्रीमंत महिला आहेत, ज्या वॉलमार्टचे संस्थापक सॅम वॉल्टन यांची मुलगी आहेत. ब्लूमबर्ग अब्जाधीशांच्या निर्देशांकानुसार, ॲलिस वॉल्टन यांची संपत्ती नऊ अब्ज डॉलरपेक्षा जास्त आहे. यावर्षी वॉलमार्टच्या शेअर्सच्या किमतीतही ४४ टक्क्यांनी वाढ झाली आहे, यामुळे जगातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीत त्यांनी जवळपास १८ वा क्रमांक मिळवला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ॲलिस वॉल्टन यांची एकूण संपत्ती किती आहे?

ब्लूमबर्ग अब्जाधीशांच्या निर्देशांकानुसार, अॅलिस वॉल्टन यांची संपत्ती ९५.१ अब्ज डॉलर्स (८ लाख कोटी रुपये) आहे. अॅलिस वॉल्टन यांच्यासह त्यांचे भावंडं जिम आणि रॉब वॉल्टन हे देखील संपत्तीच्या बाबतीत पुढे आहेत. वॉल्टन भावंडांना वॉलमार्टचे ११ टक्क्यांपेक्षा जास्त शेअर्स वॉलमार्टचे संस्थापक सॅम वॉल्टन यांच्याकडून मिळाले आहेत.

यामुळे जिम वॉल्टनची निव्वळ संपत्ती ९८ अब्ज डॉलर्स झाली आहे, तर रॉब वॉल्टन ९५.८ बिलियनवर पोहोचली आहे. वॉलमार्टच्या शेअर्सच्या किमतीत झालेल्या ४४ टक्के वाढीमुळे वॉल्टनचा टनओव्हर वाढला आहे.

हेही वाचा – बाबो! गाय, उंटासह घराबाहेर चक्क बिबट्याला ठेवले साखळदंडाने बांधून, Video पाहून युजर्स शॉक; म्हणाले, “क्रूरता..”

१९४९ मध्ये आर्कान्सामधील न्यूपोर्टमध्ये जन्मलेल्या अॅलिस वॉल्टन या वॉलमार्टचे दैनंदिन कामकाज पाहण्याशिवाय अनेक समाजोपयोगी कार्यदेखील करतात. त्यांनी २०११ मध्ये आर्कान्साच्या बेंटोनविले येथे क्रिस्टल ब्रिजेस म्युझियम ऑफ अमेरिकन आर्टची स्थापना केली आहे. दरम्यान, अशाप्रकारे त्यांची संपत्ती वाढतच राहिली तर त्या १०० अब्ज डॉलरचा टप्पा पार करतील; ज्यामुळे त्या एलॉन मस्क, बिल गेट्स, आणि वॉरेन या बफेट सेंटी-अब्जपतींच्या एका विशेष गटात सामील होतील.

अॅलिस वॉल्टन या संपत्तीच्या बाबतीत भारतीय अब्जाधीश मुकेश अंबानी आणि गौतम अदानी यांच्या अगदी काहीशा मागे आहेत. मुकेश अंबानी ११३ अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह १२ व्या स्थानी आहेत, तर गौतमी अदानी १०४ अब्ज डॉलर्ससह १५ व्या स्थानी आहेत.

वॉलमार्टच्या उत्तराधिकारी म्हणून अॅलिस वॉल्टन यांचे नाव पुढे येत आहे. वॉलमार्ट ही अमेरिकेतील सर्वात मोठ्या ई कॉमर्स कंपन्यांपैकी एक कंपनी आहे. या कंपनीने भारतातील फ्लिपकार्टमधील भागभांडवल विकत घेतले आहे. ब्लूमबर्ग अब्जाधीश निर्देशांकानुसार, अॅलिस या लॉरियलच्या उत्तराधिकारी फ्रँकोइस बेंटेकोर्ट मेयर्स यांनाही मागे टाकून जगातील सर्वात श्रीमंत महिला बनल्या आहेत.

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Worlds richest woman and walmart heiress alice walton may soon be worth 100 billion report sjr