अदिती केळकर- हाटे
‘लोकसत्ता व्हिवा’च्या विदेशिनी या सदरात २०१६ मध्ये आपली भेट झाली होती. तेव्हा मी नुकतीच बाळंतीण झाले होते आणि काही स्वप्नं उराशी बाळगली होती. आता मी तुम्हांला सांगणार आहे ती त्यातल्या काही स्वप्नांची पूर्ती आणि काही नवीन वळणांची गती. २०१६ मध्ये मुलगी झाली आणि पुढची साडेतीन वर्षं करिअरपाठी न धावता मी अनन्याचं संगोपन करत होते. तेही तितकंच महत्त्वाचं आहे. कारण वन्स अ मदर ऑलवेज अ मदर. नंतर थोडं करिअरकडंही लक्ष द्यावं असा वाटायला लागल्यानं त्या तयारीला लागले. मी एमएस्सी केलं होतं. पण दुबईमध्ये डीएचएची परीक्षा द्यावी लागते. यासाठी परीक्षार्थीचा मायदेशातील २ वर्षाचा अनुभव लागतो. तो माझ्याकडे नव्हता. कारण मी लग्नानंतर दुबईला आले आणि मग मास्टर्सचा अभ्यासक्रम पूर्ण केला होता. मग प्रश्न पडला की, काय करावं? थांबून चालणार नाही आणि इच्छा तिथं मार्ग असतोच…
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा