डॉ. उल्का नातू-गडम
आसनांचा सराव करीत असताना यम-नियमांचे पालन महाव्रतांप्रमाणे करावयाचे असते.
‘सर्व वस्तु उदासीन भाव आसनं उत्तमम्’ असे म्हटले जाते. म्हणजेच थोडेसे अलिप्त रहाता आले पाहिजे. कुठल्याही व्यक्ती, घटना वस्तू प्रसंग यांबरोबर अधिक ‘अटॅचमेंट’ केव्हाही वाईटच! ‘मुद्रया स्थिरता चैवं आसनेन् भवेत् दृढम्’ असे ग्रंथकार सांगतात. म्हणजेच स्थिरता, दृढता या गुणांची जोपासना करण्यासाठी योगासने, मुद्रांचा सराव आवश्यक आहे. ‘मुद’ या संस्कृत धातूपासून ‘मुद्रा’ हा शब्द बनला आहे. मुद्रा म्हणजे ‘सिम्बॉल’. मुद म्हणजे आनंद, जी कृती आनंद देते, ती मुद्रा. मुद्रांचेही विविध प्रकार आहेत. त्याबद्दल आपण कधीतरी जाणून घेऊयात. पण त्यातील एक महत्त्वाचे ‘आसन’ मुद्रा. ज्या मुद्रांचा सराव योगासनांप्रमाणे केला जातो, ती आहे आसन मुद्रा. त्यातीलच एक प्रमुख म्हणजे विपरित करणी मुद्रा/आसन! विपरित म्हणजे नेहमीपेक्षा वेगळे.
आणखी वाचा : उत्थित एकपादासन
या आसनाचा/मुद्रेचा सराव करण्यासाठी प्रथम शवासनात या दोन्ही पाय जोडून घ्या. दोन्ही हात शरीराच्या बाजूला ठेवा. आता दोन्ही हातांचे तळवे जमिनीला घट्ट रोवून द्या. आता दोन्ही हातांचा जमिनीवर आधार घेऊन दोन्ही पाय जमिनीपासून वर उचला. आता दोन्ही पाय डोक्याच्या दिशेने मागे वळवा. दोन्ही हातांचा जमिनीवरील आधार काढून हात पाठीवर ठेवा. पृष्ठभाग अजून वर उचला. आता पाय/पावले वर उचला सरळ करा. या स्थितीत शरीराचा संपूर्ण भार खांदे, मान व कोपरांवर येईल. बाकी शरीराचा जमिनीशी ४५ अंशांचा कोन होईल. तर पाय सरळ असतील. पाय गुडघ्यात दुमडू नका. हनुवटी छातीला चिकटवू नका.
आणखी वाचा : योगमार्ग : उत्थित द्विपादासन
अंतिम स्थितीत डोळे मिटून प्राणधारणा, लक्ष श्वासावर नियंत्रित करा. जर पृष्ठभाग जमिनीपासून वर उचलणे कठीण होत असेल, तर ‘Rolling’ करून अथवा भिंतीचा आधार घेऊन प्रयत्न करा. साधारण पाच ते सहा श्वास या स्थितीत थांबल्यावर सावकाश पूर्वस्थितीत या. पृष्ठभाग हलकेच जमिनीवर आणा. हातांचा आधार काढून घ्या. व शेवटी दोन्ही पाय जमिनीवर आणा. शेवटी शवासनात विश्रांती घ्या.
आणखी वाचा : योगमार्ग : तीर्यक पर्वतासन
लक्षात घ्या, आसन सोडताना सावकाश एक एक मणका खाली येऊ दे. पाठ, पृष्ठभाग, पाय जमिनीवर एकदम आदळल्याप्रमाणे खाली आणू नका.
सुरुवातीस सराव करताना कदचित पाय गुडघ्यात दुमडावे लागले तरी चालेल या आसनाचा सराव सर्वांगासनाच्या सरावासाठी अत्यंत उपयुक्त आहे.