Period Problems: महिलांनी शरीराच्या काही महत्त्वाच्या भागांची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. मासिक पाळी दरम्यान प्रत्येक मुलीने स्वच्छतेची काळजी घेतली पाहिजे, कारण यावेळी तुम्ही तुमचे संपूर्ण शरीर स्वच्छ आणि निरोगी ठेवले नाही तर अनेक समस्या उद्भवू शकतात. तर जाणून घेऊया मासिक पाळी दरम्यान कोणती काळजी घ्यावी आणि कोणत्या गोष्टी करणे टाळावे.
योग्य वेळी सॅनिटरी पॅड बदला
मासिक पाळी दरम्यान पॅडचा वापर केला जातो हे सर्वांना माहीत आहे. मात्र हे पॅड योग्य वेळी बदलणे महत्वाचे आहे. काही स्त्रिया एकच पॅड दिवसभर वापरतात. पण हे पूर्णपणे चुकीचं आहे. यामुळे अनेक गंभीर समस्या उद्भवू शकतात. हेल्थ लाईनवर प्रकाशित लेखानुसार, पॅड ४ ते ६ तासांपेक्षा जास्त वेळ लावू नये, कारण पॅड जास्त वेळ लावल्यास ते रक्त शोषू शकत नाही. त्यामुळे दिवसातून ३ वेळा पॅड बदला. यामुळे तुम्हाला संसर्ग होण्याची शक्यता देखील कमी होते.
व्यायाम करणे थांबवू नका
वेब एमडीच्या मते, मासिक पाळीच्या वेदनामुळे तुम्हाला थकवा जाणवू शकतो आणि बरेच लोक व्यायाम करणे सोडून देतात, परंतु असे अजिबात करू नये. कारण व्यायामाने तुम्हाला ताजेतवाने वाटेल आणि मासिक पाळीचा त्रासही कमी होईल. मात्र यावेळी हलका व्यायामच करावा.
( हे ही वाचा: महिलांना व्हाईट डिस्चार्ज का होतो? जाणून घ्या किती दिवसापर्यंत डिस्चार्ज होणे सामान्य आहे)
मीठ जास्त खाऊ नका
इंटिमिना वर प्रकाशित लेखानुसार, मासिक पाळी दरम्यान सूज येण्याची समस्या वाढते. अशा स्थितीत मासिक पाळी दरम्यान जास्त प्रमाणात मीठ खाल्ल्याने शरीरात अनेक आजार होतात. त्यामुळे तुमच्या आहारात खारट पदार्थ खाणे टाळा.
नाश्ता वगळू नका
हेल्थ लाईननुसार मासिक पाळी दरम्यान आपल्या शरीरातून रक्तस्त्राव होतो. त्यामुळे यावेळी शरीराला अधिक पोषणाची गरज असते. त्यामुळे तुम्ही नाश्ता केलाच पाहिजे.
(हे ही वाचा: Caesarean Delivery: सिझेरियन डिलिव्हरीनंतर किती दिवसांनी शारीरिक संबंध ठेवता येतील? तज्ज्ञांनी दिलेली ही माहिती नक्की वाचा)
कॉफीचे सेवन टाळा
जर तुम्ही कॉफी प्रेमी असाल, तर मासिक पाळीच्या काळात तुम्ही कॉफीचे सेवन टाळावे. इंटिमिनाच्या मते, कॅफिन प्रीमेन्स्ट्रुअल सिंड्रोम (पीएमएस) चे परिणाम वाढवू शकते. कॅफिन युरिनचे प्रमाण वाढवते त्यामुळे शरीर डिहाइड्रेटे होते आणि यामुळे तुम्हाला वेदनादायक कॅम्प्स येऊ शकतात.