‘काम डाउन’, ‘पिपल यू नो’, ‘व्हू सेस’, ‘लव्ह ओन’, ‘सिंगल सून’, ‘बॅक टू यू’, ‘स्लो डाउन’, ‘गॉड फॉर यू’, ‘सेम ओल्ड लव्ह’, ‘लूक अ‍ॅट हर नाउ’ असे अनेक सुपरहिट गाणी देणारी जगप्रसिद्ध गायिका सेलेना गोमेज ( Selena Gomez ) वयाच्या ३२व्या वर्षीय अमेरिकेतील सर्वात तरुण अब्जाधीशांमध्ये सामील झाली आहे. तिच्याकडे एकूण १० हजार कोटींची संपत्ती आहे. एक्स बॉयफ्रेंड आणि जगप्रसिद्ध गायक जस्टिन बीबरपेक्षा १०० पट अधिक सेलेना आता कमावतं आहे. अशी ही अमेरिकेची तरुण अब्जाधीश सेलेना नेमकी कशी पैसे कमवते? जाणून घेऊयात…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

सेलेना गोमेज ( Selena Gomez ) फक्त गायिक नसून ती उत्कृष्ट अभिनेत्री, निर्माती आणि व्यावसायिका देखील आहे. या चारही क्षेत्रात सेलेनाने स्वःबळावर वेगळं स्थान निर्माण केलं आहे. सेलेनाचं प्रत्येक गाणं सुपरहिट ठरतं आहे. ब्लूमबर्ग बिलिनेअर इंडेक्सने दिलेल्या माहितानुसार, सेलेनाकडे एकूण १.३ बिलियन डॉलरची म्हणजे १० हजार कोटींची संपत्ती आहे. सेलेना ही संगीत, अभिनय आणि व्यवसाय या तिन्ही क्षेत्रातून बक्कळ पैसा कमवते. पण त्यात सर्वात मोठा हिस्सा ५ वर्षांपासून म्हणजेच २०१९ला सुरू केलेली मेकअप कंपनी ‘रेअर ब्यूटी’ ब्रँडचा आहे. याच ब्रँडला मिळालेल्या यशामुळे ब्लूमबर्ग बिलियनेयर इंडेक्सवर टेलर स्विफ्ट आणि रिहानासारख्या कमी वयाच्या प्रसिद्ध श्रीमंत लोकांपैकी सेलेना एक ठरली आहे.

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Youngest billionaires selena gomez net worth and how she earns pps
Show comments