AI model zara shatavari : PCOS आणि नैराश्य यांवर मात करणारी झारा शतावरी ही AI निर्मित मॉडेल्सच्या सौंदर्य स्पर्धेतील टॉप फायनलिस्ट बनणारी पहिली भारतीय व्यक्ती ठरली आहे. मिस AI स्पर्धा ही आभासी [व्हर्च्युअल] मानवांसाठी ठेवलेली जगातील पहिली सौंदर्य स्पर्धा आहे. या AI जनरेटेड स्पर्धेसाठी १,५०० पेक्षा अधिक आंतरराष्ट्रीय अर्जांमधून स्पर्धकांची निवड करण्यात आली होती आणि आता या स्पर्धकांमध्ये सोशल मीडिया इन्फ्ल्युएन्ससाठी चुरशीची स्पर्धा होईल. या महिन्यात काही दिवसांनी या स्पर्धेचे विजेते घोषित केले जातील. या स्पर्धांचे विजेते हे सौंदर्य, तंत्रज्ञान व सोशल मीडिया प्रभावांवरून ठरविण्यात येणार असल्याची माहिती इंडिया डॉट कॉमच्या एका लेखावरून मिळाली.
झाराला खाद्यपदार्थ, प्रवास व फॅशन यांची आवड असून, आरोग्य, करिअर, विकास व नवनवीन फॅशन ट्रेंड याविषयीच्या तिच्या संकल्पनांच्या मदतीने, “व्यक्तीला त्यांचे आयुष्य उत्तम प्रकारे जगण्यासाठी प्रेरणा देणे” हे तिचे ध्येय आहे. झाराच्या व्हर्च्युअल प्रवासाबद्दल सांगायचे झाले तर, जून २०२३ पासून ती PMH बायोकेअरची ब्रॅण्ड ॲम्बेसेडर आहे. तसेच, ऑगस्टमध्ये तिने डिजिमोझो ईसर्व्हिसेस LLP मध्ये [Digimozo eServices LLP] ती इन्फ्ल्युएनसार मार्केटिंग टॅलेंट मॅनेजर म्हणून सामील झाली. नोएडा, उत्तर प्रदेशमधून झाराचे ७,५०० पेक्षा अधिक इन्स्टाग्राम फॉलोअर्स आहेत.
स्ट्रॅटिजिक, प्लानिंग, कॉन्टेन्ट डेव्हलपमेंट, डेटा ॲनॅलिसिस, ब्रॅण्ड अवेअरनेस, ब्रॅण्ड ॲडव्होकेसी, इफ्ल्युएन्सर मार्केटिंग, फॅशन स्टायलिंग अशा १३ विविध क्षेत्रांमध्ये झारा कुशल आहे. स्वतःला ‘डिजिटल मीडिया मेव्हन’ म्हणवणाऱ्या राहुल चौधरीने झारा शतावरीला निर्माण केले आहे. झाराला AI सौंदर्य स्पर्धेत टॉप १० मध्ये स्थान मिळाल्यानंतर राहुल चौधरीने लिंक्डइनवर एक पोस्ट शेअर केली आहे. “मला सांगताना अतिशय आनंद होत आहे की, आमची AI इन्फ्ल्युएन्सर झारा शतावरीची मिस AI स्पर्धेत टॉप १० स्पर्धकांमध्ये निवड करण्यात आली आहे. या स्पर्धेसाठी जगभरातून १,५०० कुशल स्पर्धकांनी भाग घेतला होता.” असे त्या पोस्टमध्ये लिहिण्यात आले होते.
“फॅनव्ह्यू वर्ल्ड एआय क्रिएटर अवॉर्ड्सद्वारे मिळालेल्या या ओळखीमुळे झाराच्या AI आणि इन्फ्ल्युएन्सर जगतात असणाऱ्या उत्कृष्ट योगदानाचे प्रदर्शन होत आहे. अशा जागतिक स्तरावर झारा भारत आणि आशियाचे प्रतिनिधित्व करीत आहे हे पाहणे, खासकरून भारतातील एकमेव आणि आशियामधील दोन मॉडेल्सपैकी एक आहे हे पाहणे अतिशय सन्मानास्पद आहे.” असेही पुढे पोस्टमध्ये म्हटले आहे.
या मिस AI स्पर्धेच्या तीन विजेत्यांसाठी २० हजार डॉलर्स [अंदाजे १६ लाख ७१ हजार रुपये] इतक्या रोख रकमेची पारितोषिके ठेवण्यात आली आहेत. या AI निर्मात्यांनी निर्माण केलेल्या मिस AI ला ५,००० डॉलर म्हणजेच अंदाजे ४ लाख १७ हजार रुपयांचे रोख बक्षीस, AI मार्गदर्शक प्रोग्राम, PR सर्व्हिस आणि अशा अजून अनेक गोष्टींचा लाभ त्यांना मिळणार असल्याची माहिती इंडिया डॉट कॉमच्या लेखावरून मिळते.