– सुचित्रा प्रभुणे

ऑलिम्पिक क्रीडास्पर्धा ही जगभरात विशेष मानाची समजली जाते. या स्पर्धेत जगाला नुसतेच पदक विजेते मिळत नाहीत, तर खऱ्या आयुष्यातले नायक -नायिका इथे पाहायला मिळतता. अनेक ऐतिहासिक क्षण येथे अनुभवायला मिळतात. अडी-अडचणींवर मात करून, जीवापाड मेहनत घेऊन जेव्हा खेळाडू या स्पर्धेच्या रिंगणात उतरतात; तेव्हा प्रत्येक खेळाडूचे अर्धे स्वप्न तिथेच पूर्ण झालेले असते. यंदाच्या वर्षीही असे काही खेळाडू आहेत ज्यांनी आपल्या गरोदरपणाचा, वयाचा फारसा बाऊ न करता स्वत:च्या ध्येयपूर्तीसाठी या स्पर्धेत झोकून दिले आहे.

delhi high court slammed aap government over cag bjp criticizes after court comment
‘कॅग’वरून ‘आप’ सरकारवर ताशेरे ; उच्च न्यायालयाच्या टिप्पणीनंतर भाजपची टीका
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
jayam ravi changed his name
दाक्षिणात्य सुपरस्टारचा मोठा निर्णय! सिनेविश्वात २० वर्षे ज्या नावाने ओळख मिळाली, तेच बदलणार…; स्वतः घोषणा करत म्हणाला…
Pramod kumar Success Story
Success Story : ‘स्वप्न एका रात्रीत पूर्ण होत नाही!’ केवळ २,५०० केली व्यवसायाची सुरुवात; मेहनतीच्या जोरावर उभारली ५० कोटींची कंपनी
Loksatta chaturang padsad loksatta readers response letter
पडसाद : स्वार्थ आणि परमार्थ साधायचा असेल तर…
Image of a person holding a kite string or a bike with a caution sign
Chinese Manjha : चिनी मांजाने घेतला निष्पाप तरुणाचा जीव, कामावरून परतत असताना झाला घात
MNS Officer Veena Sahumude
वीणा साहुमुडे… शेतकरी आईबापाचं पांग फेडले, गावाचं नावही मोठं केलं…
mind reading machine china
मनकवडं मशीन अवतरलं, फायदा होणार की गडबड?

झियांग झेंग ही एक अशीच तडफदार टेबलटेनिसपटू आहे, जी वयाच्या ५८ व्या वर्षी आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी मोठ्या उत्साहाने आणि तितक्याच पूर्ण तयारीने या स्पर्धेत उतरली आहे. अर्थात या स्वप्नपूर्तीमागे तिच्या ९२ वर्षांच्या वडिलांची प्रेरणा असली तरीही तिच्या आयुष्याची कहाणीदेखील तितकीच रोमहर्षक आहे.

हेही वाचा – कौतुकास्पद! वयाच्या १६व्या वर्षी जिया राय ठरली इंग्लिश खाडी ओलांडणारी जगातील सर्वात तरुण अन् सर्वात वेगवान पॅरा जलतरणपटू

झियांगचा जन्म चीनमधील शांघाय येथील एका गावाजवळ झाला. तिची आई टेबलटेनिस खेळत असे. वयाच्या ९व्या वर्षापासून तिने झियांगला टेबलटेनिसचे धडे द्यायला सुरुवात केली. आईच्या तालमीत झियांग चांगलीच तयार झाली. इतकी की, स्थानिक आणि प्रादेशिक स्पर्धांमध्ये भाग घेत अवघ्या वयाच्या १६ व्या वर्षी ती नॅशनल चॅम्पियन बनली. तिने या क्षेत्रात स्वत:च्या नावाचा असा काही दबदबा निर्माण केला की, स्पर्धा कोणतीही असो, झियांग ती जिंकणारच, असे काहीसे समीकरणच बनून गेले. परंतु १९८९ च्या सुमारास या खेळात आलेल्या एका नव्या नियमांमुळे अवघ्या २० व्या वर्षीच तिने या खेळातून निवृत्त होण्याचे निश्चित केले. आता पुढे काय? या प्रश्नाचे उत्तर शोधण्याआगोदरच तिला चिली या देशाकडून मुलांचे प्रशिक्षकपद स्वीकारण्याचे आमंत्रण मिळाले. अर्थात खेळाशी नाळ पुन्हा एकदा जोडली जाणार हे पाहून तिने मोठ्या आनंदाने ही ऑफर स्वीकारली आणि चिलीची रहिवासी बनली. दरम्यानच्या काळात तिचे लग्न होऊन तिला दोन मुलेदेखील झाली. संसाराला हातभार लावण्यासाठी तिने फर्निचरचा व्यवसाय सुरू केला. आपल्या मोठ्या मुलाची टेबल टेनिसची आवड लक्षात घेऊन तिने त्याला प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली.

मुलांना शिकविता शिकविता तिनेदेखील पुन्हा एकदा खेळायला सुरुवात केली आणि पाहता पाहता पुन्हा एकदा स्पर्धा जिंकण्यास सुरुवात झाली. गाडी रुळावर येत आहे असे वाटत असतानाच कोविड-१९ ला सुरुवात झाली आणि लॉकडाऊनमुळे पुन्हा एकदा खेळाला पूर्णविराम मिळाला. घरी बसून रहाणे, खाणे-पिणे अशी सर्व सामान्य जीवनशैली या काळात जगभरात सर्वांचीच होती. परंतु आपला फिटनेस जागृत ठेवत तिने घराच्या अंगणात स्वत:चा सराव चालू ठेवला.

पुढे लॉकडाऊन उठल्यानंतर स्वत:चा फिटनेस आजमाविण्यासाठी तिने फेडरेशनच्या स्पर्धांमधून भाग घेण्यास सुरुवात केली. तिचा फिटनेस पाहून घरच्यांनी आणि मित्र-मैत्रिणीनी २०२३ च्या पॅन अमेरिकन स्पर्धेत भाग घेण्याचा सल्ला दिला. गंमत म्हणजे ही चॅम्पियनशिपदेखील तिने सहजपणे आपल्या पदरात पाडली. अन् यावेळी तिचे वय होते, अवघे ५७ वर्षे.

साहजिकच पुढचा टप्पा होता तो ऑलिम्पिक २०२४ चा. झियांगने जेव्हापासून खेळला सुरुवात केली, तेव्हापासून तिने ऑलिम्पिक स्पर्धेत सहभागी व्हावे असे तिच्या वडिलांचे स्वप्न होते. साहजिकच आपल्या वयाचा विचार न करता निव्वळ प्रबळ इच्छाशक्ती आणि फिटनेसच्या जोरावर तिने ऑलिम्पिक २०२४ मध्ये चिलीकडून सहभागी होण्याचा निर्णय घेतला.

हेही वाचा – स्त्री आरोग्य : गर्भनिरोधक इंजेक्शन एक उपयुक्त साधन, पण…

खरे तर वयाच्या पन्नाशीचा टप्पा पार केला की प्रत्येकाला काळजी असते ती स्वत:च्या तब्येतीची. त्यामुळे साहजिकच शारीरिक हालचालींवर बंधने येतात. पण या गोष्टींचा फारसा विचार न करता तिने सातत्याने सराव करण्यास सुरुवात केली. तरुण खेळाडूसमोर आपला फिटनेस कसा टिकून राहील यावर तिने अधिक भर दिला. पॅरिस ऑलिम्पिकच्या टेबल टेनिस खेळाच्या पहिल्या फेरीत तिची गाठ लेबेनॉनच्या मारियाना शाकीयान बरोबर पडली. तिने आपल्या उत्तम खेळाचे प्रदर्शन घडविले, परंतु ही स्पर्धा मात्र ती जिंकू शकली नाही.

या स्पर्धेनंतर दिलेल्या एका मुलाखतीत ती म्हणाली, ‘‘मी हरले याचे मला दु:ख नाही. शेवटी हा एक खेळ आहे. हार-जीत हा खेळाचाच एक भाग असतो. पण या स्पर्धेत सहभागी होऊन मी माझ्या ९२ वर्षीय वडिलांचे स्वप्न पूर्ण करू शकले आणि माझा नवरा, माझी मुले माझे नाव घेऊन स्पर्धेच्या वेळी मला चिअर अप करीत होते. हे सारे क्षण माझ्यासाठी जिंकण्यापेक्षा खूप मौल्यवान आहेत.

Story img Loader