Zhiying Zeng debut in Paris Olympics at the age of 58: पॅरिस ऑलिम्पिक २०२४ च्या स्पर्धेत स्पर्धकांची चढाओढ सुरू असताना सध्या एका नावाची चर्चा जगभरात रंगली आहे, ते नाव म्हणजे झियिंग झेंग (zhiying zeng). वयाच्या अवघ्या ५८ व्या वर्षी चिलेचे प्रतिनिधित्व करत झियिंग झेंग यांची ऑलिम्पिकमध्ये टेबल टेनिसच्या स्पर्धेत निवड झाली. लहानपणापासून टेबल टेनिसची आवड असणाऱ्या या उत्तम खेळा़डू आहेत तरी कोण जाणून घेऊयात.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
झियिंग झेंग कोण आहेत? (Who is Zhiying Zeng)
दक्षिण अमेरिकेतील चिले (Chile) या देशात ‘ऑलिम्पिक आजी’ (Olympic grandmother) म्हणून लोकप्रिय असलेल्या झियिंग झेंग यांचा जन्म चीनमध्ये झाला. अगदी लहान वयातच टेबल टेनिसची आवड निर्माण झाल्याने झियिंग झेंग यांनी त्यांच्या आईकडून प्रशिक्षण घेऊन टेबिल टेनिस खेळण्यास सुरुवात केली. झियिंग झेंग यांची आई टेबल टेनिस शिकवत असे.
वयाच्या अवघ्या १६ व्या वर्षी झियिंग झेंग यांची चीनच्या राष्ट्रीय संघासाठी निवड झाली होती, परंतु ऑलिम्पिकमध्ये पदार्पण करण्यापूर्वी १९८८ साली या खेळात आलेल्या एका नव्या नियमामुळे त्यांची कारकीर्द अडचणीत आली आणि त्यांना हा खेळ सोडावा लागला. अवघ्या २० व्या वर्षी, सगळ्या गोष्टींना कंटाळून त्या निवृत्त झाल्या आणि चिलेमध्ये स्थलांतरित झाल्या.
चिलेमध्ये गेल्यानंतर त्यांनी त्यांचं करिअर एक खेळाडू म्हणून थांबवलं आणि त्यांनी (Zhiying Zeng) टेबल टेनिसचं प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली. नंतर टेबल टेनिसचं प्रशिक्षण सोडून त्यांनी इतर व्यवसायाकडे लक्ष केंद्रित केलं. तसेच चिलेमध्ये त्यांनी शाळेतील मुलांनादेखील शिकवले.
झेंग झियिंग यांचं ऑलिम्पिकमध्ये पदार्पण (Zhiying Zeng‘s Olympics Debut)
कोविड सुरू हो्ईपर्यंत तब्बल २० वर्षे त्यांनी टेबल टेनिसकडे खेळाडू म्हणून संपूर्णपणे पाठ फिरवली होती. परंतु, कोविडनंतर त्यांनी ऑलिम्पिकमध्ये उतरण्याचा निर्णय घेतला. दक्षिण अमेरिकेतील अव्वल खेळाडूंपैकी एक होण्यासाठी त्यांनी एकामागून एक स्पर्धा खेळण्याचा निर्णय घेतला आणि त्या अखेर ऑलिम्पिकपर्यंत येऊन पोहोचल्या.
२०२४ च्या ऑलिम्पिकमध्ये चिलेचे प्रतिनिधित्व करत वयाच्या अवघ्या ५८ व्या वर्षी झेंग झियिंग (Zhiying Zeng) यांनी ऑलिम्पिकमध्ये पदार्पण केलं. ऑलिम्पिकमध्ये जरी त्यांना अपयश आलं असलं तरी त्याचं दु:ख झियिंग झेंग यांना वाटलं नाही. “टेबल टेनिसपासून ३० वर्षे दूर राहिल्यानंतर, ऑलिम्पिकमध्ये भाग घेणे हे एक स्वप्न पूर्ण झालं, हे थोडं अवघड असेल पण जोपर्यंत माझं शरीर माझी साथ देईल तोपर्यंत मी खेळत राहीन”, असं झियिंग झेंग म्हणाल्या.
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये जरी त्यांना अपयश आलं असलं तरी झियिंग झेंग यांच्यासाठी आणि त्यांच्या वडिलांसाठी हा क्षण अविस्मरणीय होता. अर्थात, या सगळ्यात त्यांच्या ९२ वर्षीय वडिलांचा त्यांना भक्कम पाठिंबा होता.
देशाच्या ऑलिम्पिक प्रशिक्षण केंद्रात असोसिएटेड प्रेसला दिलेल्या मुलाखतीत झियिंग झेंग म्हणाल्या, “मी ऑलिम्पिक खेळापर्यंत पोहोचण्याची कधीही कल्पना केली नव्हती. या खेळासाठी मी अनेक स्पर्धा खेळून माझा आत्मविश्वास वाढवला. मी नेहमी जिंकत असल्याने, मला अधिकाधिक खेळणे आवडते.”
“ऑलिम्पिकसाठी पात्रता मिळवणे हे एक मोठे स्वप्न आहे आणि या वयात ते पूर्ण करू शकणे हा एक मोठा आनंद आहे,” असंही झियिंग झेंग म्हणाल्या.