ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या उपांत्यफेरीच्या सामन्यात तमाम भारतीय क्रिकेटरसिकांना विराट कोहलीकडून चांगल्या खेळीची अपेक्षा होती. मात्र, जॉन्सनच्या गोलंदाजीवर विराट अवघी एक धाव करून माघारी परतला. यावेळी त्याची प्रेयसी आणि बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्माही सिडनी मैदानावरील प्रेक्षकांमध्ये उपस्थित होती. त्यामुळे विराट बाद झाल्यानंतर ट्विटरकरांनी अनुष्का शर्माचा जाहीर पाणउतारा केला.

 

Story img Loader