विराट कोहलीची प्रेयसी आणि बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा गुरूवारी टीम इंडियाला प्रोत्साहन देण्यासाठी सिडनीच्या मैदानात दाखल झाली. भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात आज विश्वचषकातील उपांत्य फेरीचा सामना खेळला जात आहे. मात्र, या सामन्यात विराट कोहलीला मोठी खेळी करण्यात अपयश आले. जॉन्सनच्या गोलंदाजीवर विराट बाद झाल्यानंतर तमाम भारतीय प्रेक्षकांसह अनुष्काच्या काळजाचाही ठोका चुकला. यावेळी अनुष्का आपल्या चेहऱ्यावरचे दु:खी भाव लपवू शकली नाही. अनुष्का शर्मा हा सामना बघायला येणार हे आधीपासूनच निश्चित होते. त्यामुळे सिडनी क्रिकेट ग्राऊंडवरील प्रेक्षकांचे डोळे अनुष्काच्या आगमनाकडे लागले होते. क्रिकेट विश्लेषक राजेश खिल्लारे यांनी टीम इंडियाला प्रोत्साहन देतानाचे अनुष्काचे छायाचित्र काढून ट्विट केले.
Anushka Sharma there to cheer team India at the @scg #IND #CWC15 #AUSvIND pic.twitter.com/kJBzsHSGrS
— Rajesh Khilare (@Cricrajeshpk) March 26, 2015
उपांत्य फेरीच्या या सामन्याच्या काही दिवस अगोदरच विराटला प्रोत्साहन देण्यासाठी अनुष्का सिडनीत दाखल झाली होती. सूत्रांच्या माहितीनूसार काही दिवसांपूर्वी विराट आणि अनुष्का सिडनीतील रेस्टॉँरंटमध्ये एकत्रही दिसले होते.