यजमान ऑस्ट्रेलियाने सलामीच्या सामन्यात आज इंग्लंडवर १११ धावांनी दणदणीत विजय मिळविला. विश्वचषक २०१५तील सामन्यात ऑस्ट्रेलियाने दिलेल्या ३४२ धावांचा पाठलाग करताना इंग्लंड संघाच्या फलंदाजांनी कांगारुंच्या भेदक मार्यापुढे नांग्या टाकल्या. ऍरॉन फिंचच्या शतकानंतर मिशेल मार्शच्या भेदक गोलंदाजीमुळे ऑस्ट्रेलियाने इंग्लंडवर पूर्ण वर्चस्व गाजवले. ऑस्ट्रेलियाच्या ३४३ धावांच्या आव्हानासमोर इंग्लंडचा डाव २३१ धावांतच संपुष्टात आला.
इंग्लंडचे सलामीवीर मोईन अली आणि गॅरी बॅलेंस प्रत्येकी १० धावा काढून तंबूत परतले. अलीला स्टार्कने तर बॅलेंसला मार्श आऊट केले. नंतर मार्शने इयान बेलला ३६ तर रूटला अवघ्या पाच धावांवर तंबूत पाठवले. इंग्लंडकडून जेम्स टेलरने एकाकी लढत दिली. त्याचे शतक फक्त दोन धावांनी हुकले. टेलर ९८ धावांवर नाबाद राहिला. तत्पूर्वी, ऑस्ट्रेलियाने धडकेबाज फलंदाजी करत इंग्लंडसमोर विजयासाठी ३४३ धावांचे लक्ष्य ठेवले. ऑस्ट्रेलियाने आरोन फिंचचे शानदार शतक (१३५), जॉर्ज बेली (५५) आणि ग्लेन मॅक्सवेलचे (६६) अर्धशतकाच्या जोरावर ३४२ धावा केल्या. इंग्लंडचा स्टीव्हन फिनने भेदक गोलंदाजी करत ७१ धावा देऊन पाच विकेट घेतल्या.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा