विश्वचषक स्पर्धेच्या यजमान ऑस्ट्रेलिया संघाने पर्थवर बुधवारी अफगाणिस्तान विरुद्धच्या सामन्यात नवा विक्रम प्रस्थापित केला. विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक धावसंख्येचे लक्ष्य देण्याचा विक्रम ऑस्ट्रेलियाने पर्थच्या स्टेडियमवर रचला. ऑस्ट्रेलियन संघाने अफगाणिस्तान विरुद्धच्या सामन्यात प्रथम फलंदाजी करत ४१७ धावांची विश्वचषक स्पर्धेतील विक्रमी धावसंख्या उभारली.
याआधी हा विक्रम टीम इंडियाच्या नावावर होता. २००७ सालच्या विश्वचषकात भारतीय संघाने बर्म्युडा संघाविरुद्ध ४१३ धावांचे विक्रमी लक्ष्य उभारले होते. टीम इंडियाच्या विरेंद्र सेहवागने त्यावेळी ८७ चेंडूत ११४ धावांची तर, युवराज सिंगने ४६ चेंडूत ८३ धावांची महत्त्वपूर्ण कामगिरी केली होती. यावेळी ऑस्ट्रेलियाकडून सलामीवर डेव्हिड वॉर्नरने १७८ धावा ठोकल्या तर, स्मिथने ९५ धावांची खेळी साकारली. अखेरच्या षटकांत ग्लेन मॅक्सवेलने ३९ चेंडूत ८८ धावांची फटकेबाजी करत संघाला ४१७ धावांपर्यंत मजल मारून दिली.
ऑस्ट्रेलियाने मोडला टीम इंडियाचा विक्रम
विश्वचषक स्पर्धेच्या यजमान ऑस्ट्रेलिया संघाने पर्थवर बुधवारी अफगाणिस्तान विरुद्धच्या सामन्यात नवा विक्रम प्रस्थापित केला
First published on: 04-03-2015 at 04:23 IST
मराठीतील सर्व विश्वचषक २०१५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Australia breaks team india record of highest total in world cup