भारताचा फिरकीपटूंची धास्ती ऑस्ट्रेलियाच्या संघाने घेतली असून, गुरुवारी होणाऱ्या उपांत्य फेरीच्या लढतीत कोणतीही चूक होऊ नये याकरिता ऑस्ट्रेलियन कर्णधार मायकेल क्लार्कने ऑस्ट्रेलियाचा माजी फिरकीपटू शेन वॉर्नला खास बोलावून घेतल़े. वॉर्ननेही ऑस्ट्रेलियन खेळाडूंच्या सराव सत्रात सहभागी घेऊन त्यांना फिरकी गोलंदाजी कशी खेळावी, याबाबत कानमंत्र दिला़
वॉर्न मैदानात दाखल झाला आणि जवळपास २० मिनिटे त्याने क्लार्कशी चर्चा केली़ त्यानंतर फलंदाजीचा सराव करत असलेल्या क्लार्कला तो पाहत होता़ त्याने गोलंदाजी करून फिरकीवर खेळण्याचा क्लार्कचा सराव करून घेतला़ त्याने काही गुगली चेंडूही टाकल़े ऑस्ट्रेलियाच्या फिरकीपटूंना त्याने काही सूचना केल्या़
त्यानंतर वॉर्नने जेम्स फॉकनरला फिरकीच्या तालावर नाचवल़े सुरुवातीला सरळ चेंडू टाकणाऱ्या वॉर्नने फॉकनरला अप्रतिम ‘लेग ब्रेक’ चेंडू टाकला आणि त्याच्याच्या बॅटला लागून चेंडू पहिल्या स्लिपमध्ये गेला़ त्यानंतर वॉर्नने ‘झुटर’ टाकला त्यावर फॉकनरला कसे खेळावे हेच कळले नाही़ त्यानंतर वॉर्नने शेन वॉटसन, आरोन फिंच यांनाही गोलंदाजी केली आणि फिरकीपटू झेव्हियर डोहर्टी याच्याशीही चर्चा केली़ सराव सत्रानंतरही वॉर्नने क्लार्कला काही महत्वाचे सल्ले दिले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा