विश्वचषक क्रिकेट स्पर्धेची घोडदौड सुरू झाली आहे. जगभरात करोडो रुपयांचा सट्टा या सामन्यांवर लागला असला तरी भारतात तसा प्रतिसाद थंड असल्याची प्रतिक्रिया सट्टेबाजारात ऐकायला मिळत आहे. सध्या तरी सट्टेबाजांनी ऑस्ट्रेलियाला सरस ठरविले आहे. त्यापाठोपाठ दक्षिण आफ्रिका, इंग्लड, न्यूझीलंड यांच्यानंतर भारताला क्रमांक देण्यात आाला आहे. मात्र भारतीय सट्टेबाजांनी भारताला इंग्लडसोबत चौथा क्रमांक दिला आहे. अनेक आंतराष्ट्रीय सट्टेबाजी वेबसाइट्सही सज्ज झाले आहेत. सर्वानीच ऑस्ट्रेलियालाच सरस ठरवले आहे. भारतीय सट्टेबाज भारताबाबत आशावादी असले तरी ते भाव द्यायला तयार नाहीत. न्यूझीलंड आणि श्रीलंकेत होणाऱ्या पहिल्या सामन्यात सट्टेबाजांनी न्यूझीलंडला पसंती दिली आहे. न्यूझीलंडसाठी ४० पैसे तर श्रीलंकेसाठी पावणेदोन रुपये देऊ करण्यात आले आहेत.
भारतीय सट्टेबाजांनी देऊ केलेला भाव (रुपयांत)
ऑस्ट्रेलिया : २.०५; दक्षिण आफ्रिका : ३.२०; न्यूझीलंड : ५.२० भारत व इंग्लड : ११;  श्रीलंका : १६.५०; पाकिस्तान : २२ आणि वेस्ट इंडिज : ३०
(हा भाग सट्टा सुरू होण्यापूर्वीचा आहे. त्यात चढउतार होत राहतील)
अव्वल नंबरी
फलंदाज : हशिम अमला (७० पैसे),
डेव्हिड वॉर्नर (९० पैसे), ए बी डी’व्हिलियर्स (एक रुपया), केन विल्यम्सन (सव्वा रुपया), आरोन फिंच (दीड रुपया).
भारताचे रोहित शर्मा आणि विराट कोहलीसाठी रुपयाला अनुक्रमे दीड आणि पावणेदोन रुपये

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गोलंदाज : मिचेल स्टार्क (९० पैसे), डेल स्टेन, मिचेल जॉन्सन (प्रत्येकी एक रुपया), लसिथ मलिंगा व मिशेल मॅक्क्लिनॅघम (प्रत्येकी दीड रुपया)
भारताच्या भुवनेश कुमारसाठी सव्वातीन रुपया
आजचा सामना
न्यूझीलंड : ४० पैसे; श्रीलंका : पावणेदोन रुपये.

-निषाद अंधेरीवाला