अँडी बलबिर्नीच्या अष्टपैलू खेळाच्या जोरावर आर्यलडने विश्वचषक सराव सामन्यात बांगलादेशवर ४ विकेट्स राखून मात केली. प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशचा डाव १८९ धावांतच आटोपला. मग आर्यलडने ६ विकेट्सच्या मोबदल्यात हे लक्ष्य गाठले. बलबिर्नीने ६३ धावा केल्या.
अन्य लढतीत वेस्ट इंडिजने स्कॉटलंडविरुद्ध ३१३ धावांचा डोंगर उभारला. दिनेश रामदीनने सर्वाधिक ८८ धावा केल्या. स्कॉटलंडने विजयासाठी सर्वोत्तम प्रयत्न केले, मात्र त्यांना चार धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले. कायले कोटझरने ९६ तर रिची बेरिंग्टनने ६६ धावा केल्या.
सराव लढतीत आर्यलडची बांगलादेशवर मात
अँडी बलबिर्नीच्या अष्टपैलू खेळाच्या जोरावर आर्यलडने विश्वचषक सराव सामन्यात बांगलादेशवर ४ विकेट्स राखून मात केली.
First published on: 13-02-2015 at 04:55 IST
मराठीतील सर्व विश्वचषक २०१५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bangladesh vs ireland ireland bowlers balbirnie sink bangladesh