भारताचा दुखापतग्रस्त मध्यमगती गोलंदाज भुवनेश्वर कुमार पूर्णपणे तंदुरुस्त झाला असून याबाबतची स्पष्टोक्ती संघ व्यवस्थापनाने दिली आहे. त्यामुळे शुक्रवारी भुवनेश्वर सरावासाठी संघाबरोबर मैदानात उतरला होता. पण त्याने भारताच्या मुख्य फलंदाजांना गोलंदाजी केली नाही. युवा अष्टपैलू अक्षर पटेलला त्याने काही चेंडू टाकले. त्याच्या जागी संघात १६वा खेळाडू असलेला मुंबईकर धवल कुलकर्णीने कसून गोलंदाजीचा सराव केला.
विराट कोहलीने फिरकी गोलंदाजांचा सामना केला आणि मोठे फटके मारले. त्याने हवेतून मोठे फटके मारण्यावर अधिक भर दिला. कोहलीला अक्षर पटेल आणि सुरेश रैना यांनी गोलंदाजी केली. दक्षिण आफ्रिका भारताविरुद्धच्या सामन्यात फिरकी गोलंदाजांना संधी देईल की नाही याबाबत संदिग्धता आहे. पण त्यांच्याकडे इम्रान ताहिरसारखा नावाजलेला ‘लेग स्पिनर’ आहे.

Story img Loader