वेस्ट इंडिज विरुद्धच्या सामन्यात सर्वांचे लक्ष होते ते विस्फोटक फलंदाज ख्रिस गेलकडे. आपल्या जोरकस फटक्यांनी स्टेडियमवर कॅरेबियन वादळ निर्माण करण्याची ताकद ठेवणाऱया ख्रिस गेलचा धोका कॅप्टन कूल धोनी देखील तितकाच तयारी निशी मैदानात उतरला होता. ख्रिस गेल फलंदाजीला असेपर्यंत पहिली दहा षटके मोहम्मद शमी आणि उमेश यादव या टीम इंडियाच्या मुख्य वेगवान गोलंदाजांकडून धोनीने करवून घेतल्या. सुरूवातीची चार षटके योग्य टप्प्यात गोलंदाजी करून मोहम्मद शमी आणि उमेश यादवने गेलला मोठा फटका मारण्याची संधीच दिली नाही. धावसंख्येला आळा घालण्यात भारतीय गोलंदाजांना यश येत असल्याने गेलवर दबाव निर्माण झाला आणि दुसऱया बाजूला सॅम्युअल्स देखील धावचित बाद झाला. दबावामुळे गेलच्या फलंदाजीतील संतुलन बिघडल्याचे स्पष्ट दिसून आले. गेलला अनेकदा जीवदानही मिळाले.
उमेश यादव आणि शमी या दोघांनी गेलचा अवघड झेल घेण्याचा प्रयत्न केला मात्र ते यशस्वी होऊ शकले नाही. त्यानंतर गेल २१ धावांवर खेळत असताना शमीच्या गोलंदाजीवर अखेर ख्रिस गेल पुन्हा एकदा झेल देऊन बसला आणि मोहित शर्माने यावेळी कोणतीही गल्लत न करता झेल घेत गेलला तंबूत धाडले.
…आणि असा गेल जाळ्यात फसला
ख्रिस गेल फलंदाजीला असेपर्यंत पहिली दहा षटके मोहम्मद शमी आणि उमेश यादव या टीम इंडियाच्या मुख्य वेगवान गोलंदाजांकडून धोनीने करवून घेतल्या
First published on: 06-03-2015 at 05:28 IST
मराठीतील सर्व विश्वचषक २०१५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chris gayle wicket against team india world cup