बनावट ‘ट्विटर’ अकाऊंटमुळे पाकिस्तानचा अनुभवी फलंदाज युनिस खान याच्या भविष्याबाबतच्या चर्चा सध्या जोरात सुरू आहे. अकाऊंटवर विश्वचषक संपल्यानंतर एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घ्यावी, अशी सूचना युनिसला करण्यात आली आह़े  फलंदाजीत चाचपडणाऱ्या या ३७ वर्षीय खेळाडूवर माजी खेळाडूंनी सडकून टीका केली आहे आणि तसे जाहीर वक्तव्येही त्यांच्याकडून करण्यात आली आहेत.
या टीकेच्या भडिमारात युनिसच्या नावाने बनावट अकाऊंट उघडून एका अवलियाने निवृत्तीची घोषणा केली. त्याने पोस्ट केले की, ‘‘२०१५च्या विश्वचषकानंतर मी वनडे क्रिकेटमधून निवृत्ती घेणार असून कसोटी क्रिकेट खेळत राहीन.’’
‘‘माझे कोणतेही ट्विटर अकाऊंट नसून हे वृत्त चुकीचे आहे. फॉर्म मिळविण्यासाठी कठोर मेहनत घेत असून भविष्याबाबत अद्याप विचार केलेला नाही,’’ असे युनिसने सांगितले.

Story img Loader