भारतीय संघाच्या बैठकीतून मुख्य प्रशिक्षक डंकन फ्लेचर यांना वगळण्यात आले आणि संघाची रणनीती निश्चित करण्यापासूनही त्यांना जाणीवपूर्वक दूर ठेवण्यात येत आहे, या वृत्ताचा भारताच्या संघव्यवस्थापनाने इन्कार केला आहे.
पाकिस्तानवर विजय मिळवल्यानंतर आता भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेविरुद्धचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. ‘लंघम’ या हॉटेलमध्ये संचालक रवी शास्त्री यांनी एक खास बैठक बोलावून साहाय्यक प्रशिक्षकांसोबत रणनीतीबाबत चर्चा केली. या बैठकीला फ्लेचर यांना बोलावण्यात आले नव्हते, अशी माहिती सूत्रांकडून मिळते आहे.
‘‘साहाय्यक प्रशिक्षकांच्या बैठकीला फ्लेचर यांना बोलावण्यात आले नव्हते, या वृत्तात मुळीच तथ्य नाही. अशा प्रकारे कोणतीही बैठक झाली नव्हती, हे मी खात्रीपूर्वक सांगू शकतो. ही कपोलकल्पित कहाणी आहे,’’ असे भारतीय संघाचे प्रसारमाध्यम व्यवस्थापक डॉ. आर. एन. बाबा यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा