‘‘फिरकीच्या बाबतीत भारतीय संघाचा हात कुणीही धरू शकणार नाही. या बळावर फलंदाजांना चकित करण्यात व प्रतिस्पध्र्याच्या फिरकी माऱ्याचा यथोचित समाचार घेण्यात भारतीय संघाचे प्रभुत्व असते. परंतु भारताविरुद्धच्या सामन्यासाठी मी ऑस्ट्रेलियाचा मुख्य फिरकीपटू असेन,’’ असे अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेल सांगितले.‘‘या स्पर्धेत फिरकी गोलंदाजीच्या जोरावर मी काही बळी मिळवले आहेत. त्यामुळे भारताविरुद्धच्या सामन्यात माझ्यावर फिरकीची जबाबदारी देण्यात येईल,’’ असे मॅक्सवेल म्हणाला.
आणखी वाचा