यंदाच्या विश्वचषकात भारतीय संघ सर्वात धोकादायक असून, गतविजेत्यांच्या संघामध्ये बरेच गुणवान खेळाडू आहेत, असे मत ऑस्ट्रेलियाला दोन वेळा विश्वचषक जिंकून देणारा कर्णधार रिकी पॉन्टिंगने सांगितले आहे.
‘‘भारतीय संघात बरेच गुणवान खेळाडू आहेत, पण त्यांच्या संघाकडे अजूनही कोणी गांभीर्याने पाहताना दिसत नाही. त्यांनी जर त्यांच्या गुणवत्तेला साजेसा खेळ केला, तर सर्वात धोकादायक ठरू शकतात.  पहिल्या विजयानंतर त्यांच्या कामगिरीमध्ये सुधारणा होऊ शकते आणि एकामागून एक विजय मिळवल्यावर त्यांचे मनोबल कमालीचे उंचावू शकते,’’ असे पॉन्टिंग म्हणाला.

Story img Loader