पाकिस्तानविरुद्ध रविवारी होणाऱ्या बहुप्रतिक्षित सामन्याच्या दृष्टीने महान क्रिकेटपटू सुनील गावस्कर आणि इयान चॅपेल यांनी भारतीय संघाला मार्गदर्शन केले. आतापर्यत झालेल्या विश्वचषक स्पर्धामध्ये भारताने पाकिस्तानला १९९२, १९९६, १९९९, २००३ आणि २०११मध्ये पराभूत केले आहे. त्यामुळे विश्वचषकात भारताला हरवणे पाकिस्तानसाठी मुश्किल ठरेल, असे मत गावस्कर आणि चॅपेल यांनी व्यक्त केले.
‘‘भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघांची कामगिरी सध्या फारशी समाधानकारक नाही. पाकिस्तानचा संघ झगडताना दिसत आहे. न्यूझीलंडविरुद्ध मालिकेत हा संघ पराभूत झाला होता. परंतु मागील कामगिरीच्या आधारे भारताचे पारडे अधिक जड आहे,’’ असे गावस्कर यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा