गतविश्वविजेत्या भारतीय संघाच्या विश्वचषकाच्या तयारीच्या मर्यादा पहिल्याच सराव सामन्यात स्पष्ट झाल्या आहेत. यजमान ऑस्ट्रेलियाकडून भारताने १०६ धावांनी पराभव पत्करला. ग्लेन मॅक्सवेल व डेव्हिड वॉर्नर यांच्या शानदार शतकांच्या बळावर कांगारू संघाने दिमाखदार विजय संपादन केला.
अॅडलेड ओव्हलवर प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने मर्यादित षटकांत ३७१ धावांचा डोंगर उभारला. वॉर्नरने १०४ धावांचे आणि मॅक्सवेलने ५७ चेंडूंत १२२ धावांचे योगदान दिले. मग भारताचा डाव ४५.१ षटकांत २६५ धावांत आटोपला. अजिंक्य रहाणेने सर्वाधिक ६६ धावा केल्या, तर शिखर धवन (५९) आणि अंबाती रायुडू (५३) यांनी अर्धशतके झळकावली. परंतु भारताच्या बाकीच्या फलंदाजांनी सपशेल निराशा केली. ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सने ३० धावांत ३ बळी घेतले.
संक्षिप्त धावफलक
ऑस्ट्रेलिया : ४८.२ षटकांत सर्व बाद ३७१ (डेव्हिड वॉर्नर १०४, ग्लेन मॅक्सवेल (डाव सोडला) १२२; मोहम्मद शमी ३/८३) विजयी वि. भारत : ४५.१ षटकांत सर्व बाद २६५ (अजिंक्य रहाणे ६६, शिखर धवन ५९; पॅट कमिन्स ३/३०)
सामनावीर : ग्लेन मॅक्सवेल.