‘‘विश्वचषक स्पध्रेतील भारतीय संघाच्या कामगिरीचा आलेख चढता आह़े पाच विजयांनंतर महेंद्रसिंग धोनीचा हा संघ सलग दुसऱ्यांदा जेतेपदाचा चषक जिंकण्यासाठी सज्ज आहे,’’ असा विश्वास भारतीय संघाचे संचालक रवी शास्त्री यांनी व्यक्त केला आह़े
मंगळवारी झालेल्या लढतीत भारताने आठ विकेट्स राखून आर्यलडचा पराभव केला आणि विश्वचषकातील सलग नवव्या आणि यंदाच्या स्पध्रेतील पाचव्या विजयाची नोंद केली़ शास्त्री म्हणाले, ‘‘भारतीय संघ सध्या चांगल्या फॉर्मात आह़े विजयाने सुरुवात केल्यानंतर तुम्ही आनंदात आणि निश्चिंत राहता़ पण, पराभव पत्करल्यानंतर ड्रेसिंग रूममध्ये कोंडून घ्यावेसे वाटत़े सध्या संघ आनंदात आह़े ’’
सुनील गावसकर यांनीही शास्त्री यांच्या मताला सहमती दर्शवली आहे आणि त्यांनी गोलंदाजांना संघाच्या या यशस्वी वाटचालीचे श्रेय दिल़े ते म्हणाले, ‘‘गोलंदाजांना विजयी घोडदौडीचे श्रेय जात़े पाच सामन्यांत ५० बळी, ही अविश्वसनीय कामगिरी आह़े अनेकदा फलंदाजांच्या कामगिरीमुळे गोलंदाज झाकोळले जातात, परंतु आता गोलंदाजांना श्रेय मिळत असल्याचे पाहून आनंद झाला़ ’’
‘‘ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या निराशाजनक कामगिरीनंतर विश्वचषकात दाखल झालेल्या भारतीय संघाचे मनोबल उंचावले आह़े प्रतिस्पर्धी संघांना कुरघोडी करण्याची कोणतीही संधी आम्ही देणार नाही आणि चषक पटकावणार आहोत,’’ असा पुनरुच्चार शास्त्री यांनी केला़.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा