विश्वचषक स्पर्धेआधीच टीम इंडियाच्या गोलंदाजी बुरूजाला मोठा धक्का बसला आहे. भारताचा अनुभवी गोलंदाज इशांत शर्मा गुडघ्याच्या दुखापतीमुळे भारताचा वेगवान गोलंदाज इशांत शर्मा विश्वचषक स्पर्धेला मुकला आहे . विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम १५ जणांच्या संघात त्याला स्थान देण्यात आले होते. मात्र आज झालेल्या फिटनेस टेस्टमध्ये तो अनफिट ठरल्याने त्याला स्पर्धेत खेळता येणार नाही. दरम्यान आता इशांतऐवजी मोहित शर्माला संघात स्थान मिळण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
दुसरीकडे, पाकिस्तानचा आघाडीचा फिरकीपटू याची गोलंदाजी शैली निर्दोष ठरवीत आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) त्याच्या गोलंदाजीवरील बंदी उठविली आहे. मात्र, त्याच्या विश्वकरंडक स्पर्धेतील समावेशाबाबत अद्याप साशंकता आहे.

Story img Loader