ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार किम ह्य़ुज हे भारताचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीचे चाहते आहेत. धोनीने भारताला बरेच ऐतिहासिक विजय मिळवून दिले असले तरी विराट कोहली संघाला नवीन दिशा देईल, असे मत त्यांनी व्यक्त केले.
‘‘एक खेळाडू म्हणून धोनीने मी प्रभावित झालो आहे. पण कोहलीला जेव्हा कसोटी संघाचे कर्णधारपद देण्यात आले तेव्हा मला आनंद झाला. माझ्या मते, कोहली फार मोठय़ा अवधीसाठी भारताचे कर्णधारपद भुषवू शकतो. तो भारतीय संघाला नवी दिशा देईल,’’ असे ह्य़ुज म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, ‘‘कोहलीच्या खेळी पाहताना तो ज्या पद्धतीने धावतो त्यामध्ये बरेच काही समजते. कसोटी मालिकोबरोबर तो विश्वचषकातही चांगल्या धावा करत आहे. त्याची धाव घेण्यासाठीची पद्धत फारच सुरेख आहे. भारतामध्ये फिरकीला पोषक खेळपट्टय़ा असल्यामुळे त्यांना उसळता चेंडू खेळण्याची सवय नसते. कसोटी मालिकेमध्येही त्यांना उसळत्या खेळपट्टीवर खेळवले नव्हते. पण पर्थमध्ये त्याने दमदार खेळी साकारली. कामगिरीमध्ये सातत्य राखल्यास तो फार मोठा फलंदाज होऊ शकतो, कारण त्याच्यामध्ये तेवढी क्षमता नक्कीच आहे.’’

Story img Loader