(संगकाराची जर्सी परिधान केलेला चंपक येतो)
तोताराम : लगेच कशी जर्सी मिळते तुम्हाला अशी?
चंपक : फॅक्टरीच आहे जर्सीची. आवडत्या खेळाडूने चांगली कामगिरी केली की लगेच बनवून घेतो. मजाक करतोय हो, आधीच घेऊन ठेवल्यात खास माणसांच्या जर्सी.
तोताराम : हे बरं केलंत. नंतर धावाधाव नको.
चंपक : तुम्ही वर्णन केलंत संगकारा पेटलाय. अगदी तस्संच खेळला. मॅचमधले बहुतांशी विक्रम त्याच्याच नावावर. वेडा झालाय संगा.
तोताराम : बऱ्या मराठीत याला ‘परपल पॅच’ म्हणतात. हात लावेल ते सोनं म्हणतात ती स्थिती जवळपास. संगकाराच्या कारकीर्दीत असा पॅच येणं म्हणजे प्रतिस्पर्धी भुईसपाट.
चंपक : अगदी मनातलं बोललात. आता एबीची जर्सी घालू?
(विठ्ठलपंत हिरवं कार्ड हाती देतात)
तोताराम : दक्षिण आफ्रिकेचं सीसॉ सुरू आहे. हरले की पुढच्या मॅचमध्ये जागे होतात आणि एकदम दणकेबाज विजय मिळवतात. अमिरातीविरुद्ध हेच होईल. हशिम अमलाला कसोटीसारखी इनिंग खेळायला मिळू शकते. क्विंटन डी कॉकला याच्यापेक्षा सोपं काहीच मिळू शकत नाही. एबीला खिरापत आहे. कायले अॅबॉट अमिरातीला त्रास देऊ शकतो. डेल स्टेन अजून जागा झालेला नाही. अमिरातीसाठी शैमान अन्वर महत्त्वाचा.
चंपक : जर्सीबदलाची वेळ झाली. रजा घेतो तुमची.
सीसॉची वेळ
फॅक्टरीच आहे जर्सीची. आवडत्या खेळाडूने चांगली कामगिरी केली की लगेच बनवून घेतो. मजाक करतोय हो, आधीच घेऊन ठेवल्यात खास माणसांच्या जर्सी.
First published on: 12-03-2015 at 07:08 IST
मराठीतील सर्व विश्वचषक २०१५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kumar sangakkara