युवराज सिंगने २०११च्या विश्वचषकात अष्टपैलू कामगिरी करत भारताच्या जेतेपदामध्ये सिंहाचा वाटा उचलला होता, त्यामुळे त्याच्याच पावलावर पाऊल टाकत मला या विश्वचषकामध्ये त्याच्यासारखी कामगिरी करायची आहे, असे मत भारताचा डावखुरा फलंदाज सुरेश रैनाने व्यक्त केले आहे. ‘‘युवराज आणि महेंद्रसिंग धोनी यांच्याकडे पाहून मी बऱ्याच गोष्टी शिकलो आहे. मी युवराजसारखाच मधल्या फळीत फलंदाजीला येतो. गेल्या विश्वचषकात मला जेव्हा संधी मिळत नसे तेव्हा मी युवराजच्या फलंदाजीचा बारकाईने अभ्यास करत होतो. तो कशा पद्धतीने विजयावर शिक्कामोर्तब करतो हे मी पाहिले आहे. त्यामुळे यंदाच्या विश्वचषकात त्याच्यासारखीच कामगिरी मला भूषवायला आवडेल,’’ असे रैना म्हणाला.

 

Story img Loader