इतिहास काहीही सांगत असो, पण एकदा का आम्हाला खिजवले तर इतिहास बदलण्याची धमकही आमच्यामध्ये आहे, हे भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेला पराभूत करून दाखवून दिले. शिखर धवनचे दमदार शतक, त्याला मिळालेली अजिंक्य रहाणेची सुरेख साथ आणि भेदक गोलंदाजीच्या जोरावर भारताने दक्षिण आफ्रिकेवर तब्बल १३० धावांनी दणदणीत विजय मिळवला. भारताचा गेल्या चार विश्वचषकातील सामन्यांमध्ये हा पहिला विजय आहे.
तत्पूर्वी, भारताने पुन्हा एकदा नाणेफेक जिंकत फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. रोहित शर्मा (०) धावचीत झाल्यावर शिखर धवन डगमगला नाही, त्याने विराट कोहलीच्या (४६) साथीने धावफलक हलता ठेवत संघासाठी विजयाचा पाया रचला. या वेळी अर्धशतक झळकावल्यावर ५३ धावांवर असताना वेन पार्नेलच्या विसाव्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर हशिम अमलाने बॅकवर्ड पॉइंटला धवनचा झेल सोडला आणि त्याने शतक झळकावत त्याचा पुरेपूर फायदा उठवला. कोहली मोठा फटका मारण्याच्या नादात फसला. धवन आणि कोहली या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी १२७ धावांची भागीदारी रचली. या वेळी धोनीने चौथ्या क्रमांकावर अजिंक्य रहाणेला पाठवले आणि त्यानेही त्याचा चांगलाच फायदा उचलला. या दोघांनी दक्षिण आफ्रिकेचा मारा बोथट केला. कडक ‘कव्हर ड्राइव्ह’ मारत धवनने शतकाला गवसणी घातली. धवनने १६ चौकार आणि २ षटकारांच्या जोरावर १३७ धावांची अप्रतिम खेळी साकार संघाला मोठी धावसंख्या उभारून दिली, तर रहाणेने ६० चेंडूंत ७ चौकार आणि तीन षटकार लगावत ७९ धावा फटकावल्या. अखेरच्या ६.३ षटकांमध्ये भारताने पाच बळी गमावत ४६ धावा फटकावल्या.
भारताच्या आव्हानाचा पाठलाग करताना ठरावीक फरकाने दक्षिण आफ्रिकेने फलंदाज गमावले आणि त्यांचा डाव १७७ धावांवर संपुष्टात आला. डेव्हिड मिलरने सर्वाधिक ५५ धावांची झुंजार खेळी साकारली.
आफ्रिकन शिखर सर
इतिहास काहीही सांगत असो, पण एकदा का आम्हाला खिजवले तर इतिहास बदलण्याची धमकही आमच्यामध्ये आहे, हे भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेला पराभूत करून दाखवून दिले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 23-02-2015 at 04:37 IST
मराठीतील सर्व विश्वचषक २०१५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Live cricket score india vs south africa world cup