श्रीलंका संघाने बांग्लादेशवर ९६ धावांनी दणदणीत विजय साजरा केला आहे.
श्रीलंकेच्या ३३३ धावांच्या खडतर आव्हानाचा पाठलाग करताना बांग्लादेश संघाला २४० धावांपर्यंतच मजल मारता आली.
आव्हानाचा पाठलाग करताना बांग्लादेशची सुरूवातच निराशाजनक झाली. सलामीवर तमिम इक्बाल याला शून्यावर त्रिफळा बाद करत मलिंगाने श्रीलंकेला पहिले यश मिळवून दिले. तर, सौम्य सरकार २५ धावांतर आणि मोमीनुल हक केवळ एक धाव करून माघारी परतला. अनामूल हक आणि महंमदुल्लाह रियाझ देखील स्वस्तात बाद झाल्याने बांग्लादेश डाव पूर्णपणे कोसळला. शब्बीर रहेमानने अर्धशतक झळकावून किल्ला झुंझत ठेवण्याचा प्रयत्न केला परंतु, दुसऱया बाजूने त्याला सहकाऱयांची अपेक्षित साथ मिळाली नाही. अखेर ४७ व्या षटकात बांग्लादेशने आपले गाशा गुंडाळला.
दरम्यान, प्रथम फलंदाजी करणाऱया श्रीलंका सघाने दमदार फलंदाजी करत बांग्लादेशसमोर ३३३ धावांचा डोंगर उभारला. सलामीवर तिलकरत्ने दिलशानने १६१ धावांची तर, कुमार संगकाराने १०५ धावांची नाबाद धुंवाधार खेळी साकारली.
बांग्लादेशच्या गोलंदाजांना श्रीलंकेच्या केवळ एका फलंदाजाला बाद करण्यात यश आले आहे. लहिरू थिरीमाने आणि दिलशान यांनी संघाला चांगली सुरूवात करून दिली परंतु, थिरीमाने ७८ चेंडूत ५२ धावा ठोकून माघारी परतला. त्यानंतर संघाच्या धावसंख्येला आकार देत दिलशानने संगकाराच्या साथीने आपले शतक साजरे केले. तर संगकारानेही दिलशानपाठोपाठ शतक गाठले.

Story img Loader