प्रदीर्घ ऑस्ट्रेलिया दौऱ्याने भारतीय खेळाडूंचे नुकसान झाले आहे, मात्र विश्वचषकापूर्वी दहा दिवसांची विश्रांती भारतीय संघासाठी उपयुक्त ठरणार आहे. फलंदाजी भारतीय संघाचा कणा आहे. शिखर धवनचा फॉर्म आणि रोहित शर्माला झालेली दुखापत चिंतेची बाब आहे. दुखापतीतून सावरल्यानंतर रोहितला सूर गवसणे महत्त्वाचे आहे. गोलंदाजी हाच भारतीय संघासाठी काळजीचा विषय आहे. दुखापती आणि सातत्याचा अभाव ही भारतीय वेगवान गोलंदाजीची ओळख झाली आहे. धावा रोखणे आणि नियमित अंतरात विकेट्स काढणे या दोन्ही आघाडय़ांवर त्यांना स्वत:ला सिद्ध करायचे आहे. एकाच क्षमतेवर संघाला एकहाती विजय मिळवून देणारे खेळाडू भारताकडे नाहीत. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंडमधील काही खेळपट्टय़ांवर चेंडू स्विंग होतो. अशा ठिकाणी स्टुअर्ट बिन्नी उपयुक्त ठरू शकतो. गोलंदाजीच्या बरोबरीने बिन्नी फलंदाजीही करू शकतो. चेंडू किती वळवतो यापेक्षा विकेट्सची संख्या वाढवण्यावर फिरकीपटूंना भर द्यायला हवा. विश्वचषकासाठी दमदार वाटचाल करायची असेल तर फलंदाजी शेवटच्या फलंदाजांपर्यंत व्यापक होण्याची आवश्यकता आहे. धावांचा पाठलाग करणे भारतीय संघासाठी फायदेशीर ठरू शकते. गेल्या काही वर्षांतले प्रदर्शन लक्षात घेता एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारतीय संघाने वर्चस्व गाजवले आहे. हाच फॉर्म कायम राखत भारतीय संघ किमान उपांत्य फेरी गाठेल, असा विश्वास वाटतो.
विश्वचषकासारख्या मोठय़ा स्पर्धेत घरच्या खेळपट्टय़ांवर खेळायला मिळणे निर्णायक ठरू शकते. कर्णधारा क्लार्कसह प्रमुख खेळाडू दुखापतींनी ग्रस्त असले तरी ऑस्ट्रेलियाचा संघ जेतेपदासाठी प्रबळ दावेदार आहे. संघाचे सर्वसमावेशक स्वरूप हे त्यांचे बलस्थान आहे. गेल्या वर्षभरात न्यूझीलंडचा संघ अफलातून कामगिरी करत आहे. मोक्याच्या क्षणी खेळ उंचावल्यास न्यूझीलंडचा संघ प्रस्थापितांना धक्का देऊ शकतो. सर्वच खेळाडू जबरदस्त फॉर्मात असलेला, सर्व प्रकारच्या खेळपट्टय़ांवर शानदार प्रदर्शन करणारा दक्षिण आफ्रिकेचा संघ पहिल्यांदा विश्वविजेतेपद पटकावण्यासाठी सज्ज आहे. मात्र निर्णायक क्षणी कच खाण्याची वृत्ती त्यांना सोडावी लागेल. श्रीलंकेच्या संघाकडेही अव्वल गोलंदाजांची कमतरता आहे, मात्र एकत्रित कामगिरीच्या जोरावर ते मोठय़ा संघांना नमवू शकतात. बेभरवशी खेळामुळे पाकिस्तान आणि वेस्ट इंडिज या संघांना विजयात सातत्य राखता आलेले नाही. जगाला क्रिकेटची देणगी देणारा इंग्लंडचा संघ अजूनही पारंपरिक पद्धतीनेच क्रिकेट खेळतो. एकदिवसीय क्रिकेट वेगवान प्रकार आहे. खेळपट्टय़ांचा अभ्यास, गतकामगिरी पाहता भारतासह ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड अंतिम चारमध्ये असतील.
शब्दांकन : पराग फाटक

मिलिंद रेगे, माजी क्रिकेटपटू