न्यूझीलंडच्या ३३२ धावांचे लक्ष्य गाठताना श्रीलंकेचा डाव २३३ धावांवरच आटोपला. क्रिकेट विश्वचषकातील सलामीच्या सामन्यात यजमान न्यूझीलंडने विजयासाठी ठेवलेल्या ३३२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेचा धुव्वा उडाला.  दमदार फलंदाजी आणि भेदक गोलंदाजीच्या बळावर न्यूझीलंड संघाने पहिल्याच सामन्यात श्रीलंकेवर  दणदणीत विजय साकारला. न्यूझीलंड संघाने गोलंदाजी आणि फलंदाजी या दोनही आघाड्यांवर चमकदार कामगिरी केली.
कर्णधार ब्रेंडन मॅक्‌लम, केन विल्यम्सन आणि कोरे अँडरसन यांच्या अर्धशतकांच्या जोरावर न्यूझीलंडने विश्वकंरडक क्रिकेट स्पर्धेत सलामीच्या सामन्यात श्रीलंकेसमोर विजयासाठी ३३२ धावांचे आव्हान ठेवले आहे. या आव्हानापुढे श्रीलंकेच्या संघाला फक्त २३३ धावांपर्यंतच मजल मारता आली. श्रीलंकेच्या लाहिरू थिरीमन्ने याला अर्धशतक करता आले. न्यूझीलंडने विजयासाठी ठेवलेले ३३२ धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या श्रीलंकेची सुरुवात समाधानकारक झाली. संघाने अर्धशतकी टप्पा पार केल्यानंतर सलामीवीर तिलकरत्ने दिलशान बाद झाला. त्याने २४ धावा केल्या. त्यानंतर अर्धशतकी खेळी साकारणाला लाहिरु थिरीमने ६५ धावा करुन तंबूत परतला. हे दोन फलंदाज बाद झाल्यानंतर कुमार संगकारा मैदानावर उतरला आणि सावध फलंदाजीस सुरुवात केली. मात्र तो ३९ धावांवर असताना बोल्टने त्याला बाद केले. महेला जयवर्धने चार चेंडू खेळून भोपळा न फोडताच माघारी परतला. त्यानंतर करुणारत्ने(१४), जीवन मेंडिस(चार), नुवन कालुसकेरा(१०), रंगना हेरथ(१३) धावा करुन बाद झाले आणि श्रीलंकेचा डाव २३३ धावांत संपुष्टात आला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा